कोंबडी पालन हे मांस आणि अंडी यासाठी केले जाते. एक कोंबडी वर्षातून 180 ते 270 अंडी देते. 

लहान पिल्ले जनमल्या पासून 5 ते 6 महिन्यात अंडी द्यायला सुरवात करतात.

कोंबडी जाती | कोंबड्यांचे प्रकार 

1.लेयर कोंबडी 

2. बॉयलर कोंबडी  

3. देशी कोंबडी

कोंबडी खाद्यामधील घटक

  1.  संतुलित कोंबडी खाद्यातील पौष्टिक तत्त्वांमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्‌स, चरबी, खनिज पदार्थांचा समावेश असतो. आपल्याला कोणत्या प्रकारचे खाद्य तयार करावयाचे आहे, याचा निश्‍चित आराखडा तयार केला पाहिजे. कारण कोंबडी खाद्य चिक, ब्रॉयलर व लेयर अशा तीन प्रकारचे असते.
  2. कुक्कुटखाद्य ताजे व ओलावा कमी असणे आवश्‍यक आहे
  3. मोठ्या कोंबड्यांना थोडे जाडे भरडे खाद्य असावे. सूक्ष्म तत्त्व म्हणजे खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे, अमिनो आम्ल व औषधांचे मिश्रण एक किलो मका या प्रमाणात घेतात. हे मिश्रण पाच-सहा किलोपासून तर 100 किलो खाद्याच्या प्रमाणात असावे.