शोषखड्डा हा सांडपाण्याची विल्हेवाट करण्यासाठी केलेला खड्डा होय. राहते. परसबाग व शोषखड्डा हे प्रत्येक कुटुंबात करता येते.घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते आणि डासांना अंडी घालायला जागा मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारखे रोग होतात. अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरण्यासाठी परसबाग किंवा शोषखड्डा करता येतो.

शोषखड्डा केल्यामुळे होणारे फायदे

१) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागते व त्यामुळे डासांचे प्रमाण कमी होते व त्रासही कमी होतो.२) मलेरियासारखे डासांपासून पसरणारे आजार होत नाहीत व आरोग्य सुदृढ राहते.३) शोषखड्ड्याजवळ झाडे लावल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो.

उद्देश : शोषखड्डा तयार करणे.

आवश्यक साहित्य :भट्टीच्या विटा , दगडाच्या विटा , खड्डा खोदण्याचे साहित्य इ.

प्रक्रिया :१) असे जागा निवडावे की सगळे पाणी तिथे गोळा होते.२) १ मी. X १ मी. X १ मी. मापाचा खड्डा बनवावा.३) खड्डच्या तळाशी मोठ्या दगडणीने सपाट करून घेणे.४) खड्डच्या मधमधी चित्राप्रमाने सिमेंट टाकी ठेवावी.

५) टाकीच्या बाजूने मोठी दगडी लावावी. सिमेंट टाकीला होला पर्यंत दगडी भरावी.त्याच्या वर छोटी दगडी टाकावी.६) सिमेंट टाकीच्या होल करून त्यात पाईप टाकून टाकीवर ठेवावे. सिमेंट लावून पॅक करावे.