सनमायक बसवणे

Dec 12, 2021 | Uncategorized

अपेक्षित कौशल्य ;- फ्लाऊंट कापणे सनमायक कापणे सनमायक चिटकवणे

साहित्य ;-फ्लाऊंट ,सनमायक ,तार ,चुका ,फेविकॉल ,स्टील टेप ,गुण्या, पेन्शील, करवत, सेंटर पंच ,सनमायक कटर , हातोडी , रंधा , इत्यादी

कृती ;- दिलेल्या मापानुसार फ्लाऊंट वर काटकोनात आणखी करून घ्या हात करून त्याच्या साहायाने फ्लाऊंट कापून घ्या फ्लाऊंट च्या आकाराचे सनमायक कापून घेणे फ्लाऊंट सर्व बाजूने तीन बार अंतरावर चुका ठोका फ्लाऊंटला सर्व बाजूनी फेविकॉल लावून धुवून त्यावर सनमायक लावून घेणे आणि ते एक जीव घेण्यासाठी त्यावर वजनदार वस्तू ठेवणे किंवा पेपर टेप चिटकवणे जेणेकरून ते परत उचकट नये

उपकरणाची निवड ;-१ ) पेटी तयार करणे
२ )चौरंग तयार करणे
३) बोर्ड तयार करणे
४ ) डायनिंग टेबल तयार करणे
५) टेबल तयार करणे

शेळी पालन

शेळ्यांच्या जाती 

१)उस्मानाबादी 

२)सानेन 

३)सोजत 

४)संगमनेरी 

५)सिरोही 

६)बीटल 

७)आफ्रिकन बोअर 

८)बारबेरी 

९)जमुनापुरी 

१०)सुरती 

शेळीपालनाच्या  पद्धती

1….बंधीस्त शेळीपालन 

शेळ्यांची चरण्याची पद्धत ही इतर गुरांपेक्षा वेगळी असते.त्या केवळ झाडांची पाने व कोवळे शेंडे ओरबाडतात.यामुळे बकरीने तोंड लावलेल्या झाडांची वाढ खुंटते.तसेच यामुळे झुडपांचा व जंगलाच नाश होतो असा समज आहे. बंदिस्त संगोपनात शेळ्यांची झपाट्याने वाढ होते.यासाठी वातावरणापासून संरक्षणासाठी त्यांचेसाठी गोठा आवश्यक आहे. तो गोठा उंचवट्यावर,मुरमाड जमिनीत व पाण्याचा निचरा होऊ शकेल अशा ठिकाणी असावा.शेळ्यांना प्रत्येकी १० ते १२ चौ.फूट, करडांना (पिल्लांना)२ ते ५ चौ.फू. व बोकडास २५ चौ.फू. जागा लागते. अशा प्रकारे संख्या बघून गोठा उभारावा.याशिवाय गोठ्याबाहेर त्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा असावी

2….अर्धबंदिस्त शेळीपालन

शेळ्या या विशेषत: फिरणारे जानवर म्हणून ओळखले जाते. यामुळे जर शेळ्यांना रोज काही वेळ चरण्यासाठी मोकळे सोडले तर त्यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती खाद्यामध्ये मिळतात व त्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते. शेळ्यांना नैसर्गिकपणे फिरुन चारा व झाडपाला ओरबाडण्याची सवय असते. त्यांना गोठ्यात कोंडून ठेवल्यास व्यायाम मिळत नाही. त्यांना फिरवून आणल्याने त्यांचे खूर वाढत नाहीत.