ॲझोला म्हणजे काय…?

ॲझोला हे जलशैवाळासारखे दिसणारे तरंगते शैवाल आहे. निळे–हिरवे शैवाळ हे पाण्यात मुक्तपणे तरंगलेल्या अवस्थेत आढळते. नत्र स्थिरीकरणाच्या गुणधर्मामुळे आणि नत्राच्या अधिक प्रमाणामुळे हिरवळीचे खत म्हणूनही याचा वापर होतो. पण नत्राबरोबरच या वनस्पतीत प्रथिने, जीवनसत्वे (अ आणि ब) असेच क्षारतत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. ॲझोलामध्ये प्रथिनेचे प्रमाण २५ ते ३० टक्के, १०-१५ टक्के खनिज व ७-१२ टक्के प्रमाणात अमिनो आम्ल असतात. याचप्रमाणे ॲझोलामध्ये पिष्ठमय पदार्थ व तेलाचे प्रमाण अत्यल्प आहे.

ॲझोला

ॲझोलाची गादी तयार करण्यासाठी .

ॲझोलाची एक जात, १ किलो शेण, ssp खत, मिनरल मिक्स्चर, इत्यादी साहित्य आवश्यक आहे.

तसेच फावडे, कुदळ, घमेले, प्लास्टिक कागद, शेडनेट, बादली, इत्यादी साधनेही आवश्यक आहेत.

कृती::

1)ॲझोलाची गादी तयार करण्यासाठी पहिल्यांदा जमिनीचे मोजमाप करून .

. 2)जिथे गादी तयार करायची आहे तिथे आखणी करून घेणे.ठरलेल्या मापानुसार गादी खोदून घेणे.

3)साधारण ठरलेले माप ७५×३×१ फूट असे खोदून घेणे.(गादीचा आकार = ७५×३×१ फूट, मिनरल मिक्स्चर = ९० ग्रॅम, ssp खत = ९० ग्रॅम, शेण खत = ९ किलो, माती = ९ किलो) असे प्रमाण प्रती गादी वापरले.

4)गादीवर प्लास्टिक कागद अंथरल्यानंतर त्यात माती चाळून पसरून घेणे.त्यात शेणाचे पाणी ओतणे.

5)गादी पाण्याने भरून घेणे.त्यामध्ये ssp खत मिक्स करून सोडणे.तसेच मिनरल मिक्स्चरच्या पावडरचे पाणी करून ओतणे .

6)नंतर १ किलो ॲझोला धुवून पाण्यावर पसरवणे.

7)ॲझोला एकावर एक येणार नाही याची दक्षता घेणे.

ॲझोला

ॲझोलाचे फायदे ….

संपादन करापशुखाद्याच्या खर्चात १५ ते २० टक्क्याची बचतजनावरांत गुणवत्ता वृद्धी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आरोग्य सुधारून आयुष्य वाढते .ॲझोलाच्या वापरामुळे फॅट, दूध व वजन यांत वाढपक्षी (बदक, इमू, लव्ही आदी) खाद्यात मिश्रणस्वरुपात ॲझोलाचा वापर केल्यास मांसल कोंबडयांच्या वजनात वाढअंडी देण्याच्या प्रमाण वाढ, तसेच अंड्याच्या पृष्ठभाग चकचकीत होतो.ॲझोलाच्या वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी नत्रयुक्त व खजिनयुक्त असल्याने पिकांसाठी, झाडांसाठी वापरात येते.