सूर्य – सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत

सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. सौर ऊर्जा घेण्यासाठी घरात कुठल्याही प्रकारचे  मीटर बसवावे  लागत नाही व कुठलेही बिल भरावे लागत नाही. मोठ्या प्रमाणात सूर्याची ऊर्जा उपलब्ध असून त्याची जाणीव ग्रामीण भागातील लोकांना नाही. उलट स्वयंपाक करण्यासाठी लोक निसर्गातील झाडांची तोड करून घरे भरून ठेवतात. प्रतिवर्षी असे करून एकीकडे पर्यावरणाचा ह्रास तर दुसरीकडे वाढते प्रदूषण. परंतु यावर लोक फारसा विचार करत नाहीत. म्हणून जर सर्वच लोकांनी सूर्यापासून मोफत मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करून दैनंदीन जीवन जगण्याची शपथ घेतली तर कालानुरूप लोकांमध्ये बदल घडण्यास वेळ लागणार नाही. सौर कुकर व सौर बंब, सौर दिवे यांचा जर लोकांनी वापर करावयास सुरुवात केली तर आपल्या निसर्गात असलेले पर्यावरण धोक्यात येणार नाही व प्रदूषणाला देखील आळा बसेल व संपूर्ण मानवी जीवन सुखमय होऊन जाईल यासाठी मानव जातीचे पाऊल आपोआप उचलले जाईल.

सौर उर्जेचे महत्व

विद्युत ऊर्जा, पवन ऊर्जा या महागड्या दरात मिळणाऱ्या ऊर्जा आहेत. परंतु, सौर ऊर्जा मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. दिवसातील १२ तास सौर ऊर्जा आपल्या बरोबरच असते. उरलेल्या १२ तासांसाठी आपण सौर ऊर्जेची साठवण करून रात्रीच्या वेळी ती उपयोगात आणू शकतो. यासाठी खर्च सुद्धा अल्पप्रमाणात येतो. विद्युत ऊर्जा जेंव्हा अतिशय महत्त्वाची असते. त्या दिवशी मिळत नाही. परंतु सुर्यापासून मिळणारी ऊर्जा आपला दिवस व वेळ बदलत नाही. म्हणून बदलत्या काळानुसार आपण जास्तीत जास्त प्रमाणत सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यास शिकले पाहिजे.


None3/8/2020, 10:23:34 AM

निकृष्टचे फोटोउत्तर


प्रणिल निखाते1/25/2020, 3:15:52 PM

सौरऊर्जा एक काळाची गरज आहे हा माझा प्रकल्प आहेउत्तर


भास्कर दहातोंडे1/5/2020, 7:17:12 AM

मला माझ्या विहीर व बोर ची पंप चालवण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासाठी काय करावे लागेल 94043*****/79724*****उत्तर


Vaibhav jadhav12/15/2019, 5:50:04 AM

शेतीसाठी सौर ऊर्जा निर्मिती करणार आहे मला माहीती पाहीजेउत्तर


आपली टिप्पणी पोस्ट करा

(आपल्याकडे वरील सामग्रीवर काही टिप्पण्या / सूचना असल्यास त्या कृपया येथे पोस्ट करा)पूर्ण नावआपली टिप्पणीसबमिट करा