‌                                           प्रकल्प
नाव = गादीवाफा तयार करणे . इनलेट ड्रिप टाकने. मल्चिंग पेपर चा वापर करून वांग्याची रोपे लावणे. शेताला पाण्याचे कनेक्शन देणे.
1) प्रथम आम्ही शेताची साफसफाई केली.
2) त्यानंतर शेतात नांगरणी केली.
3) नांगरणी केल्यानंतर व्यवस्थितपणे गादीवाफे तयार केले.
4) गादी वाफेन्वर इनलेट ड्रीप टाकले.
5) ते व्यवस्थितपणे पाइपलाइनची जोडले.
6) त्यानंतर आम्ही गादीवाफे नवर मल्चिंग पेपर टाकला.
7) तो व्यवस्थित गादीवाफ्यावर सेट करून त्याच्या दोन्ही साईडने माती टाकली.
8) त्यानंतर आम्ही 100 वांग्याची रोपे नर्सरी पाबळ येथून आणली.
9) दोन रोपांमधील अंतर हे दीड फूट होते.
10) रोप लावल्यानंतर त्यांच्यावर ह्युमिक ऍसिड हे त्यांच्या मुळाशी टाकले जेणेकरून त्यांच्या मुलांची वाट लवकर होईल.
11) वरती एक हजार लिटरची पाण्याची टाकी टाकली जी चे कनेक्शन आम्ही ड्रीप याला दिले.
12) त्यानंतर आम्ही एक आठवड्यानंतर त्याच्यावर फवारणी केली कारण झाडाच्या पानांवर थ्रिप्स हा आजार दिसत होता त्यामुळे आम्ही ती फवारणी केली.
13) पाच आठवड्यानंतर आम्ही झाडावरील मोवा हा झाडांच्या पानावर जास्त प्रमाणात झाला होता त्यामुळे आम्ही ती पाण्यात धुऊन काढली .