पनीर बनवण्याची प्रक्रिया:
पनीर तयार करण्यासाठी,लिंबाचा रस, व्हीनेगर सायट्रीक आम्ल किंवा योघर्ट वापरतात. गरम दूधात यापैकी एक आम्ल टाकल्यामुळे ते नासते. तलम कपड्याने ते गाळल्यावर जास्तीचे पाणी निघुन जाते.हा तयार झालेला पनीर मग २-३ तास अति थंड पाण्यात ठेवण्यात येतो.
या पायरीनंतर,वेगवेगळ्या प्रदेशात, त्याच्या वापरानुसार मग त्यावर प्रक्रिया करण्याच्या पद्धती बदलतात. जास्तीत जास्त पद्धतीत,दही हे एका कपड्यात ठेउन मग त्यावर २-३ तासासाठी वजन ठेवल्या जाते.या घट्ट झालेल्या पनीरचे मग एकसारखे तुकडे कापण्यात येतात.कमी वेळेसाठी(सुमारे २० मिनीटे) ठेवल्याने ते मउ चीझ मध्ये बदलते.