1) मापन करणे .
उद्देश :-
- मापन करण्यास शिकणे .
- क्षेत्रफळ काढणे .
- घनफल काढणे .
साहित्य :-
व्हाइट बोर्ड , टाकी ,वही ,पेन इ .
साधने :-
मीटर टेप


व्हर्नियर कॅलिपर चा वापर
कृती :-
- मीटर टेप वरील विविध मापनाच्या पद्धती समजून घेतल्या .
- मापनाच्या दोन पद्धती असतात :- 1) ब्रिटिश पद्धत 2) मॅट्रिक पद्धत
- ब्रिटिश पद्धतीचा वापर करून व्हाइट बोर्डची लांबी ,रुंदी मोजून क्षेत्रफळ काढले .
- मॅट्रिक पद्धतीचा वापर करून टाकीचे घनफल काढले .

1) 1 CM | 10 MM |
2) 10 CM | 1 डेसीमीटर |
3) 100 CM | 1 मीटर |
4) 10 डेसीमीटर | 1 मीटर |
5) 10 मीटर | 1 डेकामीटर |
6) 10 डेकामीटर | 1 हेक्टोमीटर |
7) 10 हेक्टोमीटर | 1 किलोमीटर |
2) फॅब्रीकेशन मटेरियल ( साहित्य )
उद्देश :-
- फॅब्रीकेशन मटेरियल ओलखण्यास शिकणे .
- मार्केटमध्ये मटेरियल खरेदी करता येणे .
- फॅब्रीकेशन मटेरियलचे उपयोग समजून घेणे .
साहित्य :-
square tube , round tube, d -tube ,l – angle ,c -channel ,GI pipe ,weld mesh ,chicken mesh ,nut bolt ETC.
साधने :-
मीटर टेप
सुरक्षा :-
सेफ्टी शूज , हँडग्लोज


कृती :-
- सुरुवातीला square tube , round tube, d -tube ,l – angle ,c -channel यांची ओळख करून घेतली .
- तसेच ते मटेरियल आपण मार्केट मधून कसे खरेदी करू शकतो त्याचा अभ्यास केला .
- नंतर मग आश्रमात कोठे कोठे मटेरियल वापरले आहे त्याची पाहणी केली .
कौशल्ये :-
- फॅब्रीकेशन मटेरियल ओलखण्यास शिकलो .
- मार्केटमध्ये ते मटेरियल कसे खरेदी करावे ते शिकलो .
3) प्लंबिंग करणे
उद्देश :-
- प्लंबिंग साहित्य ओळख करणे .
- प्लंबिंग करण्यास शिकणे .
साहित्य :-
PVC, U- PVC, C- PVC, टेपलॉन टेप , सोल्यूशन , इ .
साधने :-
HEXA BLADE, PIPE CUTTER, प्लंबिंग पाना , ड्रिल मशीन इ .


बेसिंन बसवताना
कृती :-
- सुरुवातीला प्लंबिंग साहित्य ओळख करून घेतली .
- तसेच प्लंबिंग करण्यासाठी लागणाऱ्या मटेरियल ची यादी तयार केली .
- ते मटेरियल खरेदी करून agriculture रूम मधील टॉयलेट मध्ये फ्लश आणि बाथरूम मध्ये बेसिंग बसवली .
- अशाप्रकारे प्लंबिंग करण्यास शिकलो .
कौशल्य :-
- प्लंबिंग करण्यास शिकलो .
4) FRP
उद्देश :-
दरवाजा lamination आणि FRP
साहित्य :-
रेझिन , हार्डनर , कोबाल्ट ,प्लायवूड
साधने :-
पत्रा ,रोलर ,वूड कटर इ .


कृती :-
- सर्वप्रथम 74 *36 इंच ,प्लायवूड कट करून घेतला .
- त्यानंतर ते घासून घेतले . व त्यावर wallpaper चिकटवला .
- मग 1 लीटर रेजिन +30 ml कोबाल्ट ,+ 30 ml हार्डनर मिक्स करून सोल्यूशन बनवले .
- ते सोल्यूशन वॉलपेपर च्या मध्यभागी ओतले . व ते मिश्रण पत्र्याच्या मदतीने पसरवले .
- व त्यावर फिल्म फ्रेम ठेऊन त्यावरून रोलर फिरवले .
- 15 ते 20 मिनिटे ते तसेच ठेवले .
सुरक्षा :-
- हाथमोजे घालणे .
- हार्डनर व कोबाल्ट जवळ ठेऊ नये .
- तयार केलेले सोल्यूशन शरीरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी .
5) बिजागरी व स्क्रू .
उद्देश :-
बिजागरिचा वापर करून दरवाजा बसवणे .
साहित्य :-
लॅमिनेटेड door , ब्लॅक स्क्रू , टकरी बिजागरी ,कडी ,टॉप कडी ,हॅंडल , वेल्ड रॉड इ .
साधने :-
ड्रिल मशीन ,वेल्डिंग मशीन ,वूड कटर , मीटर टेप , हातोडी , मार्कर .


कृती :-
- सुरुवातीला ज्याठिकाणी दरवाजा बसवायचा आहे त्या फ्रेमचे मापन केले व लॅमिनेटेड door चे पण मापन केले .( 77*36 इंच )
- लॅमिनेटेड door छ माप जास्त होत . ते आम्ही दोन्ही बाजूने 1.5 इंच वूड कटरणे कट केले .
- नंतर दरवाजा ला टकरी बिजागरि ड्रिल मशीन ने ब्लॅक स्क्रू वापरुन लावले .
- लोखंडी फ्रेम वर ज्याठिकाणी बिजागरी लावायची आहे तिथे मार्क केले .
- व लोखंडी फ्रेम वर लॅमिनेटेड door बसवून बिजागरीच्या एक बाजूला वेल्डिंग केले .
- वेल्डिंग करून झाल्यावर दरवाजा बसला आहे की नाही ते चेक केले .
कौशल्य :-
बिजागरीचा वापर करून दरवाजा बसवण्यास शिकलो .
6) कोबा करणे .
उद्देश :-
New food lab building समोरील कोबा करणे .
साहित्य :-
सीमेंट ,वाळू ,खडी ,पाणी ,बादली ,हातमोजे इ .
साधने :-
सिमेंट मिक्सर, थापी , रंदा , घमेळे , फावडा इ .

costing :-
अ . क्र | मटेरियल | वर्णन | नग | दर | किंमत |
1) | सिमेंट | OPC | 23 घमेळे | 50 | 1150/- |
2) | खडी | अर्धा + 1 इंच | 44 घमेळे | 7 | 308/- |
3) | वाळू | कच | 88 घमेळे | 8 | 704/- |
4) | बिजली | 240 वोल्ट | 0.75 यूनिट | 10 | 7.5 /- |
5) | मजुरी 25% | 543/- | |||
एकूण | 2713/- |


कृती :-
- सर्वप्रथम साहित्य गोळा केले .
- त्यानंतर 1:4:2 या प्रमाणात सिमेंट + वाळू +खडी घेऊन सिमेंट मिक्सर मध्ये टाकून काँक्रीट तयार केले .
- व ज्या ठिकाणी कोबा करायचं आहे त्याठिकाणी पाणी मारून घेतले . लेवल टुब् वापरुन लाईन डोरी लावून घेतली .
- नंतर तयार केलेले काँक्रीट ओतले .
- ते माल रांद्याच्या मदतीने सगळीकडे पसरवले .
- सगळीकडे लेवल करून घेतली . ते झाल्यावर सुखण्यास ठेवले .
- अशाप्रकारे कोबा तयार केले .
कौशल्य :-
- कोबा तयार करण्यास शिकलो .
- बांधकामातील साहित्यांचा उपयोग केले .
7)बांधकाम करणे .
उद्देश :-
- बांधकाम करण्यास शिकणे .
- प्लास्टर करण्यास शिकणे .
- पायरी तयार करणे .
साहित्य :-
वीटा , सिमेंट , वाळू , खडी , घमेळे , पाणी इ .
साधने :-
सिमेंट मिक्सर, मीटर टेप , थापी , रंदा , लाईन डोरी , इ .
costing :-
अ क्र | मटेरियल | वर्णन | नग् | दर | किंमत |
1) | सिमेंट | OPC | 15 घमेळे | 50 | 750/- |
2) | वाळू | 86 घमेळे | 8 | 688/- | |
3) | विटा | मातीची भाजलेली वीट | 58 | 11 | 638/- |
4) | खडी | अर्धा +1 इंच | 4 घमेळे | 7 | 28 /- |
5) | बिजली | 240 वोल्ट | 0.75 यूनिट | 10 | 7.5/- |
6) | मजुरी 25% | 528/- | |||
एकूण | 2640/- |



कृती :-
- सर्वप्रथम सरानी काम समजून सांगितले .
- प्रत्येकाला काम वाटून दिले .
- प्रथम आम्ही विटा भिजवून घेतल्या .
- त्यानंतर सिमेंट +वाळू यांचे मिश्रण करून mortar तयार केले .( सिमेंट + वाळू 1:6 या प्रमाणात घेतले .)
- ते mortar सुरुवातीला खाली ओतले व विटा ठेवत गेलो . असे आम्ही विटांचे 3 थर बांधले .
- तसेच काही बांधकामाला प्लास्टर करून घेतले .
- त्याचप्रमाणे न्यू फूड लॅब समोर पायरी तयार केली .
- पायरी तयार करन्या अगोदर तयार केलेल्या पायरीचे माप घेऊन त्या पायरीपासून घेतलेल्या मापावरून विटा लाऊन घेतल्या .
- विटांच बांधकाम झाल्यावर विटांच्या मधील space मध्ये विटांचे तुकडे टाकून त्यावर mortar टाकले व प्लास्टर करून घेतले .
- अशाप्रकारे प्लास्टर ,पायरी तयार करणे ,आणि बांधकाम करण्यास शिकलो .
कौशल्ये :-
- बांधकाम करण्यास शिकलो .
- प्लास्टर करण्यास शिकलो .
- पायरी तयार करण्यास शिकलो .
8) थ्रेडिंग , टॅपिंग , ड्रिलिंग करणे .
उद्देश :-
- 18 TPI चे आटे 6 mm बार वरती बनवणे .
- 18 TPI चा टॅपिंग करणे .
- 50*10 mm पट्टीवर ड्रिलिंग मशीनने होल पाडणे .( 6 mm )
साहित्य :-
बार , पट्टी (50*10 mm )
साधने :-
ड्रिल मशीन ,पंच ,हॅमर , बेंच व्हाईस , टॅपिंग पाना , डाय , डाय स्टॉक

थ्रेडिंग करणे :-
- प्रथम डाय स्टॉक मध्ये डाय बसवले .
- ते फिक्स करून घेतले . ते डाय स्टॉक टॉर्शन बार वरती ठेवले .
- ते फिरवले . दोन ते तीन वेळ फिरवल्यावर ऑइल टाकले . त्यानंतर दोनदा पुढे एकदा मागे असे फिरवत राहिलो
- अशाप्रकारे टॉर्शन बारला 18 TPI चे थ्रेडिंग केले .

टॅपिंग करणे :-
- 50*10 mm ची पट्टी घेतली .
- त्या पट्टीला 6 mm चे ड्रिल मशीन ने होल मारले .
- त्यानंतर टॅप पाना घेऊन त्यात first tap बसवला . व तो होल मध्ये ठेऊन फिरवला . व आटे पाडले .
- नंतर second टॅप ने आटे पाडले . नंतर थर्ड टॅप ने आटे पाडले .
- अशाप्रकारे 3 टॅपचा वापर करून होलच्या आतून टॅपिंग केले .

ड्रिलिंग करताना :-
- 50*10 mm ची पट्टी घेतली .
- जिथे होल मारायचा आहे तिथे पंच व हॅमर च्या मदतीने पंच केले .
- नंतर सेंट्रल ड्रिल मशिनचे कार्य व त्या मशीनच्या पार्ट्स विषयी समजून घेतले .
- नंतर मग ती पट्टी मशीनच्या टेबलवर ठेऊन पंच केलेल्या जागी ड्रिल बीट सेट केले .
- मग मशीन चालू करून पट्टीवर ड्रिल मशीन ने होल मारले .
कौशल्ये :-
- थ्रेडिंग व टॅपिंग करण्यास शिकलो .
- सेंट्रल ड्रिल मशीन ने पट्टीवर होल मारण्यास शिकलो .
9) आर्क वेल्डिंग करणे .
उद्देश :-
- वेल्डिंग करणे .
- new food lab समोरील शेड बांधणे .
साहित्य :-
वेल्डिंग रॉड , वर्क पीस
साधने :-
चिपींग हॅमर , आर्क वेल्डिंग मशीन , वायर ब्रश


NEW FOOD LAB समोर शेड बांधणे .

costing :-

कृती :-
10) रंगकाम करणे .
उद्देश :-
नवीन फूड लॅब ला रंग देणे .
साहित्य :- ( costing )


कृती :-
- सर्वप्रथम फूड लॅबच्या भिंती सॅंड पेपरच्या साहाय्याने घासून घेतले .
- तसेच काही भिंतीन pop लावले .
- त्यानंतर wall primer घेतले . 1 लिटर कलर ला 300 ते 400 ml पाणी घेऊन डोंगणचे मिश्रण करून कलर बनवले .
- मग रोलर च्या साहाय्याने सर्व भिंतीना कलर दिले . व भिंतीच्या कोपऱ्याना ब्रश ने रंग दिले .
कौशल्ये :-
रंगकाम करण्यास शिकलो .
11)लेथ मशीन
उद्देश :-
लेथ मशीनचा वापर करून लाकडावर डिझाईन काढणे .
साहित्य ;-
लाकूड , मार्कर , गॉगल, हातमोजे , सेफ्टी बूट , लेथ मशीन इ .


कृती :-
- सर्वप्रथम सरानी मशीनची ओळख करून दिली .
- तसेच मशीनच्या विविध भागांचे कार्य समजून सांगितले .
- नंतर लाकूड घेतले . ते लाकूड हेड स्टॉक व टेल स्टॉक च्या मध्ये सेट केले .
- मग मशीन चालू केली . आणि कटींग टुल मागे पुढे करून आपल्या ला हवी तशी डिझाईन काढली .
कौशल्ये :-
लेथ मशीनचा वापर करून लाकडावर डिझाईन काढण्यास शिकलो .
12) वीट तयार करणे .
उद्देश :-
mortar चा वापर करून वीट तयार करणे .
साहित्य :-
सिमेंट ,वाळू , घमेळे , पाणी .
साधने :-
फावडे , थापी , बादली , breaks मशीन , इ .

कृती :-
- सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले .
- सिमेंट +वाळू 1:3 या प्रमाणात घेऊन mortar तयार केले .
- breaks मशीनमध्ये वितेच्या साच्याना ऑइल लाऊन घेतले .
- मग त्या साच्या मध्ये सुरुवातीला mortar नंतर दगड पुन्हा mortar असे थर टाकले .
- वरुण प्रेस केले . त्यानंतर त्या साच्या मधून वीट बाहेर काढली . अशा आम्ही दोन विटा तयार केल्या .
- आणि 21 दिवस curing करणे .

costing :-

13) फेरोसिमेंट
उद्देश :-
फेरोसिमेंटचा झाकण बनवणे .
साहित्य :-
l angle , torshn bar , weld mesh , welding rod , binding tar , cement , sand , water etc .
साधने :-
वेल्डिंग मशीन , थापी , रंदा , फावडे , घमेळे , ट्रे


कृती :-
- सर्वप्रथम 48 इंचचे 2angle व 43 इंचचे 2 angle कट करून घेतले . व 4 angle यांची फ्रेम तयार करून वेल्ड केल .
- त्या फ्रेम ला सपोर्ट साठी मध्ये बार लावले आणि त्यावर वेल्ड मेष जाळी लावली .
- त्यानंतर सिमेंट + वाळू यांचे 1:3 प्रमाणात घेऊन mortar तयार केले . ते mortar सुरुवातीला फ्रेम खाली ओतले .
- त्यावर फ्रेम ठेवली . पुन्हा फ्रेम वरुण mortar ओतले व थापी ,रंदाच्या साहाय्याने सगळीकडे पसरवले .
- व ते झाकण curing करण्यास ठेवले .
costing :-

14) नवीन फूड लॅब च्या येथे प्लंबिंग करणे.

पाइप ला सोल्यूशन लावताना .

आउट लेट काढताना .

costing :-


प्लंबिंग करण्यास शिकलो .तसेच विविध प्लंबिंग च्या साहित्य ओळख झाली .प्रत्यक्ष काम करत शिकलो . या कामामुळे प्लंबिंग चा नवीन अनुभव मिळाला .या अनुभवामुळे मी प्लंबिंग ची विविध कामे करू शकतो .
15) प्लाझमा कटर
उद्देश :-
- प्लाझमा कटर चालवण्यास शिकणे.
2) प्लाझमा कटरचा वापर करून पत्र्यावर विविध डिझाइन काढणे.
साहित्य:-
पत्रा , हँडग्लोज, सेफ्टी शुज, गॉगल
साधने :-
प्लाझमा कटर

कृती :-
1)सर्वप्रथम घनश्याम दादाने आम्हाला मशिनच्या विविध भागांविषयी माहिती समजून सांगितली. 2) त्यानंतर ती मशिन oprate कशी करायची ते सांगितलेव्यात वापर होणारा controller, com. pressor laser cutter point, माहिती घेतली. 3) त्यानंतर मशिनमध्ये आधीपासून असलेलेकाही Drawings काढले. Controller चे Commands समजून ठेवून, त्याची Testing करण्याचा प्रयत्न केला. 4)Test घेतल्यानंतर पत्रा त्या डिझाइनचा कट केला. 5)अशाच पद्धतीने तयार करून तो Computer वर डिझाइन pendrive मध्ये Copy करून आपण cnc plazma cutter मध्ये वेगवेगळ्या व आपल्याला आवश्यक असणाऱ्या डिझाईन तयार करू शकतो.
कौशल्ये :-
प्लाझमा कटर वर पत्र्यावर विविध डिझाईन काढण्यास शिकणे..
16) पत्रेकाम करणे.
उद्देश :-
- Gi पत्र्याचा डब्बा तयार करणे.
- Gi पत्र्याचा नरसाळे तयार करणे.
साहित्य :-
gi पत्रा, कटर, पेन्सिल, पट्टी, पक्कड, हातोडी, कंपस,
साधने :-
पत्रा बेंड मशीन
कृती :-
1)पत्र्याचा डब्बा तयार करणे.


सर्वप्रथम gi पत्रा घेतला. पत्र्यावरती पेन्सिल व पट्टीने व32 x 8mm चा आयत काढला. त्या आयताच्या 4 ही बाजूने 6 बाहेर लाईन मारली.तसेच 8×8 चा squire आखल व 6m बाहेर लाइन मारली. (चारहीबाजू). त्यानंतर ते दोन्ही पत्रे कटर ने कट करून घेतले. 6 mm लाइन वरून काही पत्र्याची बाजू आत बेन्ड केली आणि काही बाजू बाहेर बेन्ड केली. 32*8cm च्या आयताचे चार भाग करून ते बेन्ड केले. व एकात एक अडकवले.(समोरासमोरील बाजू) तयार झालेला डब्बा 8x8mm च्या squareवरील bend केलेल्या भागात बसवला.व पक्कडीने सर्व बाजू press केल्या.
2)पत्र्याचे नरसाळे बनवणे.



- प्रथम योग्य मापाचे ड्रॉईंग काढून घेतले.
- 10mm व्यास घेतला
- 10 cm उंची घेतली. तसेच 8 cm ची नळी तयार केली
- परीघ 31.4 ठेवला.
- ड्रॉईंगनुसार पत्रा कापून योग्य मापाचे फनेल तयार केले.
कौशल्ये :-
- Gi पत्र्यापासून डब्बा बनवण्यास शिकलो.
- Gi पत्र्यापासून नरसाळे बनवण्यास शिकलो.
17) प्लायवुडला सन्मायका चिटकवणे.
उद्देश :-
प्लायवुडला सनमायका चिकटवने.प्लायवुडपासून Key storage box तयार करणे.
:साहित्य :-
प्लायवुड, सनमायका, सनमायकाकटर, पेन्सिल, पट्टी, मीटर टेप,फेविकॉल
साधने :-
wood cutter



कृती : –
1) सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा केले.
2) त्यानंतर 5X4 इंचाचे 2 तुकडे ply- ७०० चे कट केले. तसेच 3 तुकडे कट केले. 3) 15×2 इंचाचे3व 15X5 इंचाचा एक तुकडा कट केला. 4) 15X5 इंचाच्या तुकड्यावर 5X4 इंचाचे ‘दोन्ही टुकडे विळ्यानी समोरासमोर बसवले. 5)05X4 इंचाच्या तुकड्यांना जोडून 15×2 इंचाच्या दोन पट्ट्या ठोकल्या. व एक पट्टी समोरच्या बाजूने ठोकली. (6) तयार केलेल्या key Storage box समोरील पट्टीला फेविकॉल लावले व सन्मायका चिटकवली . आणि त्या बॉक्स ला touchwod मारले.
कौशल्ये :-
- प्लायवुडला सन्मायका चिटकवण्यास शिकणे.
- प्लायवुड पासून key storage बॉक्स तयार करणे.
18) RCC कॉलम तयार करणे .
साहित्य /साधने :
सीमेंट , वाळू, खडी ,ऑइल , torsion बार , तार , थापी , साच्या , मेजर टेप


कृती :
1.प्रथम torsion बार कापून घेतले .
2.साच्याला ऑइल लावला.
3. सीमेंट ,वाळू, खडी यांचे 1:2:4 या प्रमाणात मिश्रण घेतले.
4. साच्या मध्ये concret तसेच बार टाकून कॉलम तयार केला .
5. 21 दिवस पाणी दिले .

RCC : RAINFORCED CEMENT CONCRET
RCC तत्व : लोखंड ही तानात मजबूत असते , तर concert हे दाबत मजबूत असते .