प्रयोग क्र . 1. कृत्रिम श्वसन ( शेफर पद्धत , सिल्वेस्टर पद्धत )

 • उद्देश : कृत्रिम श्वसनाच्या विविध पद्धती शिकणे .
 • आवश्यक साहित्य : चटई , स्वयंसेवक
 • कृती :1. शेफर पद्धत : यामध्ये पाठीमागून फुप्फुसाच्या ठिकाणी दाब दिला जातो . एका मिनटाला 12 ते 15 वेळा दाब द्या .

2. सिल्वेस्टर पद्धत : यामध्ये हात वर करून पुन्हा छातीवर ठेवून छातीवर दाब दिला जातो .

निरीक्षण : प्राथमिक उपचार म्हणून वरील पद्धतीचा वापर करतात . ह्या पद्धतीचा वापर केल्यावर व्यक्ति शुद्धीवर येतो . शुद्धीवर आल्यास डॉक्टरांकडे न्यावे .

कृत्रिम श्वसनाचे फायदे : 1. प्राथमिक उपचार होतो .

2. अपघाती व्यक्तीचा जीव वाचतो .

प्रयोग क्र . 2. पर्जन्य मापक

 • उद्देश : पर्जन्य मापक तयार करून आणि पावसाचे प्रमाण मोजणे .
 • आवश्यक साहित्य : बॉटल किवा बरणी, स्केल, मार्कर ,
 • कृती : 1. बॉटल कापून घ्या .

2. बॉटलकचा वरचा भाग खालच्या भागामध्ये उलटा ठेवा .

3. बॉटलमध्ये सीमेंट टाका , जेणेकरून पाणी सारख राहील आणि स्केल ने मोजायला सोपे जाईल .

4. बॉटलला स्केल चिकटपटीने चिकटवा

5. बॉटल असा ठिकाणी ठेवा की झाडच पाणी त्या पर्जन्य मापकामध्ये जाणार नाही .

6. पाऊस हा नेहमी mm मध्येच मोजला जातो .

 • पाऊस मोजण्याचे सूत्र : पाऊस = मिळालेले पावसाचे पाणी भागिले घनफळाचे क्षेत्रफळ गुणिले 10
 • निरीक्षण : 1. पाऊस मोजून नोंदी ठेवणे आवश्यक

2. याचे अनेक फायदे व उपयोग देखील आहेत .

प्रयोग क्र . 3. वायर गेज मोजणे .

 • उद्देश : वायर गेजचा वापर करून तारेचा गेज काढण्यास शिकणे .
 • आवश्यक साहित्य : वेगवेगळ्या गेजच्या वायर , वही , पेन , मानक तार मापी , सूक्ष्ममापी
 • कृती : 1. प्रथम वेगवेगळ्या गेजच्या वायर घेतल्या

2. वायरचे एनसुलेशन काढने .

3. एक तार घेऊन त्याला गेजमध्ये टाकल .

4. ज्या हॉलमध्ये परफेक्ट बसते तो त्याचा गेज असतो .

 • अनुमान : गेज पुढील प्रमाणे लिहितात .
 • निरीक्षण : 1. वायर गेज मोजणे महत्वाचे आहे .

2. वायर गेजमुळे आपणास किती mm ची वायर घ्यायची आहे टी कळते .

प्रयोग क्र . 4. इनसुलेशन काढणे .

 • उद्देश : वायरचे इनसुलेशन काढण्यास शिकणे .
 • साहित्य : वायर
 • साधने : वायर स्ट्रिपर
 • कृती : 1. प्रथम एक वायर घेतली .

2. वायर स्ट्रिपरच्या साहायाने एनसुलेशन काढले .

वायर पिन मध्ये जोडण्यासाठी ,बोर्ड मध्ये जोडण्यासाठी किवा बल्प जोडण्यासाठी एनसुलेशन काढव लागत .

प्रयोग क्र . 5. शोष खड्डा .

 • उद्देश : शोष खड्डा बांधण्याची पद्धत शिकणे .
 • आवश्यक साहित्य : टाकी ,दगडी ,खोदण्यासाठी ,टिकाव ,फावडे ,घामेले , पाइप
 • कृती : 1. वापरलेले पाणी गोळा होईल अशी जागा शोधा .

2. टाकी पेक्षा खोल आणि रुंद असा खड्डा खोदा .

3. खड्ड्यात एक थर दगडी रचा .

4. दगडीवर टाकी ठेवून , टाकीला मध्यभागी हॉल पाडा .

5. आणि टाकीला पाईप जोड जेणेकरून सर्व पानी त्या टाकीत जाईल .

6. टाकीचा वरचा भाग व बाजूचा भाग पूर्ण दगडाने भरून घ्या .

 • निरीक्षण : वापरलेले पाणी त्या टाकीत जात . टाकीच्या मध्यभागी होळमधून पानी बाहेर पडत आणि जमिनीत मुरूम व गाळ त्या टाकीत जमा होतो .

प्रयोग क्र . 6 . प्लग पिन टोपला जोडणे .

 • उद्देश : प्लग पिन टोपला जोडण्यास शिकणे .
 • साहित्य : प्लग ,काली वायर ,लाल वायर , 3 पिन , 2 पिन , स्ट्रिपर , स्क्रू डायवर
 • कृती : 1. प्रथम सर्व साहित्य व साधने गोळा केली .

2. वायरचे एनसुलेशन काढले .

3. लाल वायर फ्यूजला दिली

4. काळी वायर न्यूट्रलला दिली .

5. ग्रीन वायर अर्थिगला दिली .

 • अनुमान प्लग पिन जोडण्यास शिकणे एलेक्ट्रिक मधील महत्वाचा भाग आहे .

प्रयोग क्र . 7. बेटरीच्या पाण्याची सापेक्ष घनता मोजणे .

 • उद्देश : बेटरीच्या पाण्याची ( एलेक्ट्रॉ लाईट ) सापेक्ष घनता मोजणे .
 • आवश्यक साहित्य : हायड्रोमिटर , मल्टिमीटर distil water ईत्यादी .
 • कृती : 1. मल्टिमिटरने बेटरीचे d . c व्हॉलटेज मोजा .

2. हायड्रोमीटरचा वापर करून बेटरीची घनता मोजली .

3. बेटरीत distil water टाकले .

 • बेटरी आविष्कार : सन 1800 मध्ये वोल्टा यांनी केला .

प्रयोग क्र . 8. सेल आणि बेटरीचे वोल्टेज मोजणे .

 • उद्देश : विविध सेलाचे वॉलटेज मोजण्यास शिकणे .
 • साहित्य : 6 v , 4 v च्या बेटऱ्या , सेल , वही , पेन , ईत्यादी .
 • कृती : 1. प्रथम बंद पडलेली बेटरी घेतली .

2. तिला + – टर्मिनल असतात .

3. त्या टर्मिनलला मल्टिमीटरच्या वायरी जोडल्या व वोल्टेज चेक केले .

4. त्याच प्रमाणे सेल चे पण वोल्टेज चेक केले .

 • अनुमान : बेटरी व सेल याचे वोल्टेज चेक करण्यास शिकलो .

प्रयोग क्र. 9. लेवल ट्यूब ने समांतर पातळी काढणे .

 • उद्देश : लेवल ट्यूब चा वापर करण्यास शिकणे .
 • साहित्य : पाणी
 • साधने : लेवल ट्यूब , मार्कर .
 • कृती : 1. प्रथम लेवल ट्यूब मध्ये पाणी भरून घेतले .

2. त्यातील हवेचा बल काढून टाकणे .

3. जेवढी आपल्याला ऊंची हवी आहे तिथे मार्क केले .

4. त्या प्रमाणे लेवल ट्यूब ने भिंतीवर 5 पॉईंट मार्क केले .

5. असा प्रकारे लेवल ट्यूबचा वापर केला .

प्रयोग क्र . 10. बायोगॅस

 • उद्देश : बायोगॅस चे महत्व समजून घेणे . त्याचे फायदे समजून घेणे .
 • साहित्य : सेण , पाणी , पाळा पाचोळा ईत्यादी .
 • कृती : 1. प्रथम शेण व पाणी घेतले .

2. त्याचे प्रमाण 25 kg शेण तर 25 लीटर पाणी घ्यावे .

3. टाकीत टाकून ते मिक्स करायचे .

4. त्यातून निर्माण होणारा गॅस आवशकतेनुसार वापरा .

 • बायोगॅस चे फायदे : 1. स्वच्छ इंधन

2. धूर विरहित

3. पाइप द्वारे पुरवण करण्यास योग्य

4. घरगुती वापर करण्यास योग

5. वीज निर्मितीसाठी पण बायोगासचा वापर होतो .

 • जर गॅस 1 m3 तर गोबर 25 kg , पाणी 25 लीटर

2 m3 तर गोबर 50 kg , पाणी 50 लीटर

प्रयोग क्र . 11. प्रेशर स्टोव्ह व वातिचा स्टोव्ह ची माहिती जाणून घेणे .

उद्देश : प्रेशर स्टोव्ह व वातीचा स्टोव्ह ची माहिती जाणून घेणे .

 1. वातिचा स्टोव्ह : त्या स्टोव्ह मध्ये केशकर्षना मुळे तेल वातीतून वर चढते . केरिसीन पूर्ण पणे जळण्यासाठी हवा लागते . ही हवा ज्योतीला मिळाली नाही तर ज्योत पिवळी येते . व भांड्यावर काळजी जमते . ही थांवण्यासाठी वातिच्या वर दोन लंबगोलाकार जाळ्या असतात . त्या जाळ्या गरम झाल्यावर तेलाचे संपूर्ण ज्वलन होत आहे . असे समजावे . असा निळ्या ज्योतीपेक्षा जास्त असते .
 2. प्रेशर स्टोव्ह : टाकी पंप बर्नर ही स्टोव्ह चे मुख्यभाग आहेत . स्टोव्ह पेटवताना थोडे केरोसिन पेटवून बर्नरची पेटी गरम करतो . उष्णतेमुळे ते तेल फुटते .

कार्य : 1. स्टोव्ह पेटवताना बर्नर गरम करा

2. आता किल्ली बंद करून पंपमारा हवा भरल्यावर टेलावर दाब येतो व तेल नळीतून बर्नरकडे चढते . तिथे होवून वायूरूपात जाते .

प्रयोग क्र . 12 . डिझेल इंजिन

डिझेल इंजिनचा शोध : अल्फेट डिझेल यांनी लावला .

कृती : 1. डिझेल इंजिनची पूर्ण साफसफाई केली .

2. भाग ओळखायला शिकलो .

3. इंजिन चालू करून बघितला .

इंजिनचे प्रकार : 1. अंतर्गत ज्वलन : दाबावर पेटणारे

उदा . डिझेल इंजिन

2. बाह्य ज्वलन : विजेच्या ठिणगीवर पेटणारे .

उदा . पेट्रोल इंजिन

 • 1. 2 स्ट्रोक इंजिन
 1. फवारणी पंप
 2. स्कूटी

2. 4 स्ट्रोक इंजिन

 1. कार , ट्रॅक्टर

प्रयोग क्र . 13. प्लेन टेबल सर्वे

उद्देश : 1. नकाशा काढणे .

2. किती जागा आहे हे ओळखणे व क्षेत्रफळ काढणे .

साहित्य : प्लेन टेबल , ड्रॉइंग पेपर , पेन्सिल . टाचणी , मीटर टेप इ .

कृती : 1. ज्या भागाचा नकाशा काढायचा आहे त्या मध्यभागी प्लेन टेबल फिक्स केला . दिशा निश्चित केली .

2. नंतर ड्रॉइंग पेपर फिक्स केला .

3. ओळंब्याच्या साहयाने जमीनिवरचा पॉइंट काढला .

4. एका भागावर कोठेही 1 पॉइंट घेतला . व अलीटेड पट्टीच्या साहयाने तो रॉड सरळ रेषेत घेतला . व कागदावर रेष मारली .

5. प्रत्यक्ष अंतर मीटर टेपच्या साह्याने मोजले व त्या प्रमाणे बिंदु निश्चित केले .

6. या प्रकारे 4 पॉइंट गहेवून बिंदु मार्क केले . व अंतर मोजले .

7. निश्चित केलेले . बिंदु सरळ रेषेत जोडले . असाप्रकारे नकाशा तयार केला .

प्रयोग क्र . 14. निर्धुर चूल

उद्देश : निर्धुर चुळीचे महत्व समजून घेणे .

साहित्य : 1. ज्वलनासाठी लाकूड

2. माचिस

कृती : 1. चुलीचे निरीक्षण केले .

2. चुलीबद्दल माहिती घेतली .

3. सुरक्षतेबद्दल माहिती घेतली .

4. लाकड लावून माचिसणे पेटवले .

5. त्याची आग कशी पेटते हे निरीक्षण केले .

निर्धुर चुलीचे फायदे : 1. धुराचा त्रास होत नाही .

2. श्वसणाचे आजार होत नाही .

3. इंधन बचत होते .

4. ऊर्जा वाया जात नाही .

5. ज्वलन व्यवस्थित होते .

प्रयोग क्र . 15 . उपकरण सोकेटला जोडणे .

उद्देश : उपकरणांचे सोकेट जोडण्याची पद्धत जाणून घेणे .

साहित्य : केबल क्लॅम्प , सोकेट , नोज पक्कड , चाचणी , दिवा इ .

कृती : 1. उपकरणाच्या सोकेटचे संपर्क कव्हर काढून टाकले .

2. सोकेट वरील केबल क्लॅम्प सोडवला .

3. चाकुच्या पद्धतीने केबलचे टॉक कापून टाकले .

4. नोज पक्कडणे पिलरची टॉक योग्य शॉकप्रूफ सोकेट मध्ये बसवली .

5. ड्रायव्हरच्या टोकाणा अटिकीक कव्हरसह दोन्ही सोकेट मधून जोडले .

6. केबलचे टॉक काढले व केबल क्लॅम्प् घट्ट केले .

7. संपर्क बिंदुवर केबलचे टॉक योग्य लंबीपर्यंत धरून ठेवले गोलाकार आकारात वळवून सोलडर केले . व त्याचा स्क्रू घट्ट केला . 8. कॉनटॅक्ट कव्हर बदलला आणि

l . n . e . ची टेस्ट दिव्यास जोडणी केली .

प्रयोग क्र . 16. अर्थिग करणे .

साहित्य : अर्थिग प्लेट , कोळसा , मीठ , पाईप , वीटा , पाणी इत्यादि .

साधने : टिकाव , फावडे ,इ .

कृती :1. प्रथम साहित्य गोळा केले .

2. ज्या घराची अर्थिग करायची आहे त्या घरापासून 1.5 लांब खड्डा केला .

3. नंतर पाईप मधून अर्थ वायर टाकून प्लेटचा जाइंट केली .

4. व खड्डा मधोमध प्लेट उभी धरली .

5. प्लेटच्या बाजूने वीट टाकल्या त्यानंतर अर्थिग पावडर टाकली . व पाणी ओतले .

6. व खड्डा मातीने भरून घेतला .

7. असा प्रकारे अर्थिग करायला शिकलो .

प्रयोग क्र.17. सौर कुकर

साहित्य : सौर कुकर तापमापी , पाणी तांदूळ इ .

कृती : 1. सुरुवातीला सौर कुकर उन्हात ठेवला

2. तसेच झाकण उघडले ते सेट केले. जेणे करून सूर्य प्रकाश परावर्तित होवून आला गेला पाहिजे

3. दुसऱ्या काचेच्या आत काळ्या डब्यात तांदूळ शिजवण्यासाठी ठेवले .

4. व ते झाकण बंद करून तापमान मोजले .

5. दोन तासानंतर बंद केलेले झाकण उघडले व त्यातील तापमान मोजले . काळ्या डब्यातील भात शिजलेले होते .

सौर कुकरचे फायदे : 1. इंधन बचत

2. प्रदूषण कमी होते .

3. अन्न शिजवताना अन्नतील पोषकतत्वे नष्ट हॉट नाही

तोटे : 1. वेळ जास्त लागतो .

2. रात्री व पावसाच्या वेळेत वापर करू शकत नाही .

प्रयोग क्र . 18. विजबिल काढणे .

साहित्य : वही , पेन ,घरातील उपकरणाचे watt माहीत असणे . इ .

 • 1 यूनिट = 1000 watt

1000 watt = 1 kw

 • विजबिल काढण्याचा महत्वाचा टेबल :

0 ते 50 यूनिट = 4.25

51 ते 100 यूनिट = 7.00

101 ते 150 यूनिट = 10.50

151 ते 200 यूनिट = 15.00

200 पुढे यूनिट = 20.00

सूत्र =वॅट x नग x तास / 1000

प्रयोग क्र. 19 . डम्पी लेवल

साहित्य : डम्पी लेवल , ट्रायपॉड स्टँड , नोंदवहि , पेन, इ .

कृती : 1. प्रथम ठरवलेल्या जागेच्या मध्यभागी ट्रायपॉड स्टँड उभा करा

2. त्यावर डम्पी लेवल ठेवले .

3. डम्पी लेवल समांतर व काटकोनात ठेवून स्पिरीट लेवल मधील बुबुडा बरोबर मध्यभागी आणला .

4. नंतर डम्पी लेवल पासून दूर अंतरावर स्टाप ठेवला .

5. व डम्पी लेवल मधून पाहून अप्पर , माध्यम , लोंअर चे माप नोंद केले .

6. ज्या ठिकाणी स्टाप ठेवले त्या ठिकाणी मार्क केले .

7. व मिडल चे माप समान ठेवून असे आम्ही पॉइंट काढले .

8. शेवटी अप्पर – लोंअर केले व आलेले अंतर स्टपच्या मध्यभागा पासून ते मार्क पर्यंत बरोबर तेवढेच आहे की नाही पहिले .

प्रयोग : क्र . 20. सौर दिवे बसवणे .

साहित्य : मल्टिमीटर , सोलर पॅनल , बॅटरी

कृती : 1. उपकरणासाठी आवश्यक शक्ति गणना

2. योग्य साेेेर पॅनल निवडणे .

3. योग्य बॅटरीची निवड .

4. योग्य प्रकाशन साधन निवडणे .

5. कनेक्शन आणि स्थापना .

6. व्हॉल्टमिटर वापरुन वाचन घेणे .

 • types of solarpanel
 1. मोनोक्रिस्टलाईट

2. पोलोक्रिस्टलाईट

 • सेोर सेल हे सिलिकॉनपासून बनवलेले असतात .
 • types of solar system
 1. ऑन ग्रिड system : यामध्ये नेटमिटरिंगचा वापर .
 2. ऑफ ग्रिड सिस्टम : बॅटरीचा वापर केला जातो .
 • solar installation मध्ये power reqwirement चे सूत्र .

सूत्र : p = v x i

p = 230 x ४

power = ९२० watt

प्रयोग क्र . २१. Dol स्टाटर .

 • 1. स्टाटर मधील महत्वाचे भाग : 1. एन . यू . सी : ही कॉइल सेरीज टेस्ट लॅम्प वर चेक करावी . चेक करताना शक्यतो टेस्ट लॅप चा दिवा पेटत नाहि. परंतु त्यावेळेस कॉइलच्या पुढील भागात लोखंडी भागात तुकडा घेऊन मॅडनेट तयार होतो किंवा नाही ते चेक करावे

2. कॉन्टॅक्ट पट्ट्या यावर जमा झालेल्या कार्बन काळजीने वेळोवेळी पोलीस पेपरने साफ करणे

3. ओव्हरलोड रीले बायटल म्हणजे दोन धातूंची पट्टी ही पट्टी गरम केली असता ती वाकणे असा तीन पट्ट्या असतात फेज

मधील व लाल बटना जवळील सर्किट तुटते सप्लाय बंद होतो थोड्यावेळाने पट्टी थंड झाल्यावर लाल बटन दाबल्यावर पिन जागेवर येते हिरवा बटन दाबल्यावर मोटार परत चालू करता येते

डॉल स्टार्टर चे फायदे:-

1. मोटर जळत नाही.

2. एकच फेज चालू असल्यास मटेरियल धोका नाही.

3. मोटर चालू बंद करणे सोपे.

4. चालू बंद करण्यास बटन दूर ठेवता येते.

1. लाल बटन – मोटर बंद करणे.

2. हिरवा बटन- मोटर चालू करणे.

प्रयोग क्र 22. एक सर्व समांतर वायरिंग.

A) एकसर जोडणी

1.दोन किंवा दोन पेक्षा जास्त दिवे लावल्यास प्रकाश मंद पडतो

2.वोल्टेज विभागला जातो.

3. एक बल्प बंद पडला तर संपूर्ण सर्किट बंद पडते ..

4.दोन पॉईंट मधील EMF च्या फरकाला संभाव्य फरक म्हणतात .

5.कमी वोल्टेज वापरून उपकरण चालवू शकतो.

वोल्टेज = v1 + v2 + v3

I =I1 =I2= I3

उदा. लाईट माळ ख

B) समांतर जोडणी

 1. दोन किंवा दोन पेक्षा जास्त दिवे लावल्यास प्रकाश प्रखर पडतो
 2. एक बल्प बंद पडला तर संपूर्ण सर्किटवर कधीच परिणाम होत नाही.
 3. उदाहरणार्थ: इलेक्ट्रिक फिटिंग.
 4. ओहम चा नियम
 5. विद्युत मंडळात वाहणारा करंट हा त्या मंडळाला दिलेल्या वॉल्टेजच्या समप्रमाणात
 6. तसेच तो करंट विद्युत मंडळातील विद्युत रोधाच्या व्यस्त प्रमाणात असतो

;