पोल्ट्री शेड खर्च मराठी

पोल्ट्री व्यवसाय कृषी भागात खूप फास्ट मध्ये पसरत आहे, कारण की यासाठी लागणारा खर्च कमी आणि फायदा जास्त आहे. विकासाच्या प्रगतीसाठी सरकार प्रक्रिया, प्रजनन, पालन व उबवणुकीचे काम या प्रक्रियेत गुंतवणूक करीत आहे.

लहान पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी तुम्हाला 50,000 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. मध्यम पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी 1.5 लाख ते 3.5 लाख रुपये आणि मोठ्या प्रमाणात पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी 7 लाख रुपये खर्च लागतो.

यासाठी तुम्हाला सरकार कडून अनुदान तसेच आज पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी बँक कर्ज देण्यासाठी तयार आहेत.

 कोंबड्यांचा प्रकार कसा निवडावा (Poultry Farm Business How To Choose Hens) 

मित्रांनो उत्पन्नामध्ये तुम्ही दोन प्रकारचे कुक्कुटपालन करू शकता. एक आहे गावरान कोंबडी पालन दुसरे आहे ब्रॉयलर कुक्कुटपालन मित्रांनो यामधील तुम्ही कोणत्याही कोंबड्यांचा प्रकार निवडू शकता. कोंबडीच्या प्रकाराबाबत कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीस मांस उत्पादनासाठी किंवा अंडी उत्पादनासाठी कुक्कुटपालन व्यवसाय करायचा आहे. हे अगोदर ठरवावे लागेल कारण जर उद्योजकाला हा व्यवसाय प्रामुख्याने अंडी उत्पादनासाठी सुरू करायचे असेल तर त्याला लेयर म्हणजेच गावरान कोंबडीचा फार्म सुरू करावी लागेल. जर उद्योजकाला प्रामुख्याने मांस उत्पादन करायचे असेल तर त्याला ब्रॉयलर चिकन फार्म उघडावे लागेल.

यामुळे तुम्ही आधीच ठरवावे आपल्याला कोंबड्या विकून पैसे कमवायचे आहेत की अंडी विकून नंतर ब्रॉयलर आणि लेयर पोल्ट्री फार्म दोन्हीचे स्वतःचे वेगळे फायदे आणि तोटे देखील आहेत. याबाबत प्रशिक्षणात सांगितले जाऊ शकते. याचा अर्थ असा आहे की कोंबडीचा प्रकार निवडण्याआधी उद्योजकाने त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती गोळा करावी व अधिकृत माहिती घेणे आवश्यक आहे. हे आपल्या डोक्यात असावे तथापि जर उद्योजकाची इच्छा असेल तर तो लेयर आणि बॉयलर दोन्ही आपल्या व्यवसायाचा भाग बनवू शकता. व दोन्ही कोंबड्या पालन करू शकता व त्याची देखभाल करून त्या कोंबड्या विकू शकतात.