प्रकल्पाचे नाव : आवळा प्रक्रिया करणे.


विद्यार्थ्याचे नाव : ऋतिक टेमकर.


सहभागी विद्यार्थी: विशाल सुरूम.


मार्गदर्शक: रेश्मा हवालदार मॅडम.


उद्देश :

 1. आवळ्यावर प्रक्रिया करण्यास शिकणे.
 2. प्रक्रिया केलेल्या प्रॉडक्टचे महत्व समजून घेणे.
 3. ड्राय प्रॉडक्टचे महत्व समजून घेणे.
 4. सोलर ड्रायरचे महत्व समजून महत्व घेणे.
 5. प्रॉडक्टचे विक्री करण्यास शिकणे.
  नियोजन :
 6. प्रकल्प समजून घेतला.
 7. प्रकल्पाचा उद्देश समजून घेतला.
 8. साहित्य साधने गोळा केली.
 9. प्रक्रिया पद्धत समजून घेतली.
 10. कोणते प्रॉडक्ट बनवायचे आहेत ते ठरवले.
 11. प्रकल्पावर काम सुरू केले.
  आवळा फायदे:
  ● विटामिन सी जास्त प्रमाणात असते.
  ● आवळ्याचे सेवन केल्याने अन्न पचन क्रिया जास्त चांगली होते.
  ● केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.
  ● फायबर जास्त प्रमाणात मिळते.
  ● मानसिक स्वास्थ्य चांगले राहते.

प्रक्रिया :

आवळा कॅन्डी

साहित्य :
● आवळा
● साखर
● मीठ
● गॅस
साधने :
● पातेले
● झारी
● चमचा
● गॅस शेगडी
कृती

 1. सर्वप्रथम आपला स्वच्छ धुऊन घेतला.
 2. त्याला होल म्हणजेच प्रीक करून घेतल्या.
 3. 60% मिठाच्या पाण्यात त्याला 24 तास ठेवले.
 4. त्याला शंभर डिग्री सेल्सिअस पाण्यामध्ये उकळले.
 5. त्यातील बिया काढल्या.
 6. त्याचे बारीक तुकडे केले.
 7. तुकड्यांना साखरेच्या पाकात दोन दिवस ठेवले.
 8. साखरेच्या पाकातून काढून त्यांना सुट्टे केले.
 9. त्यांना तीन दिवस सोलार ड्रायरला ड्राय केले.
 10. त्याची पॅकिंग केली.
  खर्च :

मजुरी = 35% = 173
एकूण = 667.29 रुपये

आवळा लोणचे

साहित्य :
● आवळा
● मीठ
● तेल
● हळद
● लोणचे मसाला
● विनेगर
साधने :

● बरणी
● पातेले
● पळा
● झारी

● गॅस शेगडी
कृती :

सर्वप्रथम आवळा स्वच्छ धुऊन घेतला.

त्याला होल करून घेतल.

60 टक्के मिठाच्या पाण्यात त्याला 24 तास ठेवले.

त्याला शंभर डिग्री सेल्सिअस पाण्यात उकळले.

त्यातील बिया काढल्या.

त्याचे तुकडे केले.

त्याला हळद व मीठ लावून दोन तास उन्हात तापवणे.

नंतर त्याला मसाला लावून घेतला.

तेल लावून बरणीत भरला.
खर्च :

मजुरी = 35 % = 129.60 रुपये
एकूण = 259.87 रुपये

आवळा सुपारी

साहित्य :
● आवळा
● काळी मिरी
● जीरा
● हिंग
● ओवा
● साधे मीठ
● काळे मीठ
● गॅस
साधने :
● पातेले
● पळा
● झारी
● गॅस शेगडी
कृती :

सर्वप्रथम आवळा स्वच्छ धुऊन घेतला.

त्याला होल करून घेतले

60 टक्के मिठाच्या पाण्यात त्याला 24 तास ठेवले

24 तासानंतर त्याला शंभर डिग्री गरम पाण्यात उकळले

त्याच्या बिया काढल्या

त्याचे बारीक तुकडे केले.

हिंग सोडून सगळे साहित्य भाजून घेतले.

भाजलेल्या पदार्थाची पावडर करून ती पावडर आवळ्याच्या तुकड्यांना लावली व 24 तास
ठेवले.

सोलार ड्रायरला त्याला दोन दिवस वाळवले.

त्याची पॅकिंग केली.

आवळा सुपारी विक्रीसाठी तयार झाली.
खर्च :

मजुरी = 35% = 45.07रुपये
एकूण खर्च = 173.86 रुपये

निरीक्षण :

एक किलो आवळ्यापेक्षा प्रोसेस केलेला एक किलो आवळा महाग असतो.

अनुभव :
नवीन शिकायला मिळालं. नवीन प्रॉडक्ट बनवायला शिकलो. विक्री करायला शिकलो. ड्रायरचे महत्व

समजले. ड्राय प्रॉडक्टचे महत्व समजले.