प्रोजेक्ट चे नाव= सोलार ड्रायर
सोलर ड्रायर म्हणजे काय?
सोलर ड्रायर ही अशी उपकरणे आहेत जे पदार्थ विशेषता अन्न सुकविण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करतात. सोलार ड्रायर सूर्यप्रकाशतील उष्णतेचा वापर अन्नपदार्थातील आद्रता कमी करण्यासाठी करतात. सोलर ड्रायर मध्ये काळी शोषगारी पृष्ठभाग असते जे प्रकाश गोळा करते आणि त्याचे उष्णतेमध्ये रूपांतर करते. जे वाळवायचे पदार्थ थेट या पृष्ठभागावर ठेवला जातो. कार्यक्षमता वाढवण्यासाठी या टायर्स मध्ये काचेचे कव्हर किंवा प्लॅस्टिकचे कव्हर लावले जाते.
सोलर ड्रायरचे फायदे:
1)विजेवर किंवा इंधनावर चालणाऱ्या ड्रायर पेक्षा सोलर ड्रायर हा खूपच फायदेशीर असतो.
2)सोलर ड्रायव्हरमुळे वाळवीण्यासाठी ठेवलेल्या पदार्थाचे वारा,धूळ,प्राणी ,माती ह्यापासून संरक्षण होते.
3)पदार्थातील पाणी काढून घेणे हे त्याचे मूलभूत काम आहे.
प्रस्तावना:
सोलर ड्रायर मधे कोणतेही पदार्थ टाकण्याच्या आधी सोलर ड्रायर स्वच्छ करून घेणे. पदार्थ सोलर ड्रायर मध्ये टाकण्याच्या अगोदर त्या पदार्थाचे वजन करून घेणे. कोणत्याही पदार्थ सोलर ड्रायर मध्ये टाकल्यानंतर दिवसभरातील सोलरच्या आतील तापमान याची नोंद ठेवणे आणि बाहेर तापमानाची नोंद घेणे आणि आद्रता यांची नोंद ठेवणे. संध्याकाळी त्याचे किती वजन झाले आहे, त्यांची नोंद ठेवणे. त्यानंतर पूर्ण वाळून झाल्यानंतर त्याच्यातील यल. ओ.डी. (लॉस ऑन ड्राइंग) काढणे. पदार्थातील किती टक्के पाणी कमी झाले आहे आणि किती टक्के पाणी राहिले हे एल.ओ.डी.मधुन कळते.
कृती:
- 1) सुरुवातीला सोलर ड्रायर स्वच्छता करून घेने.
- 2) जो पदार्थ सोलार ड्रायरला वाळवण्यासाठी टाकणार त्याच्यातील सर्व घाण निवडून घेणे स्वच्छ पाण्याने धुऊन घेणे.
- 2) जो पदार्थ सोलर ड्रायरला वाळवण्यासाठी टाकणार आहे त्याचे सुरुवातीचे वजन करून घेणे.
- 3) पदार्थ ड्रायरच्या काळ्या पृष्ठभागावर ती व्यवस्थित पसरवून टाकले पाहिजे.
- 4) दर एका तासानंतर सोलर ड्रायरच्या आतील तापमान यांची नोंद ठेवणे आणि सोलर ड्रायव्हरच्या बाहेरील तापमान यांची नोंद ठेवणे. आद्रता किती टक्के आहे हे पाणी आणि त्याची नोंद ठेवणे.
- 5) संध्याकाळी ड्रायर मधून जो पदार्थ काढतो त्याचे वजन करून ठेवणे.
- 6) जर पदार्थ पूर्णपणे वाळले असे समजले की त्याचे एल.ओ.डी काढणे.
- 7) सर्वात शेवटी जो पदार्थ वाढलेले आहे आणि त्याची वजन केलेले आहे त्याचे मिक्सरमधून बारीक करून घेणे.
- 8) त्यानंतर पॉकेटमध्ये भरून सील पॅक करून वरती डेट एम.आर.पी टाकून ठेवण
एल ओ डी (लॉस ऑन ड्राईंग )चे सूत्र=(सुरुवातीचे वजन➖अंतिम वजन) ➗ सुरुवातीचे वजन✖️100
सोलर ड्रायरला कोणकोणते पदार्थ वाळवण्यासाठी टाकले जाते?
1)मोरिंगा पाला
2)आवळा कॅन्डी
3)आवळा सुपारी
4)मिरच्या
5)मसाल्याचे पदार्थ
6)लिंबूच्या साली.
मोरिंगा पाला कशा पद्धतीने वाळवली जाते त्याचे फ्लो चार्ट:
मोरिंगा पावडर➡️मोरिंगाची पान ➡️साफ करणे➡️ वजन करणे ड्राइंग साठी ठेवणे (पाला वाळवणे)➡️ वजन करणे ➡️ पावडार डर बनवणे ➡️पॅकिंग करणे
मोरिंगा पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
1)मोरिंगाची पान
2)ड्रायर
3)मिक्सर
5)पॅकिंग पाउच
6)सीलिंग मशीन
मोरिंगा चे फायदे:
1)लहान मुलांसाठी फायदेशीर.
2)वजन कमी करण्यासाठी.
3)पचनासाठी फायदेशीर.
4)त्वचेसाठी फायदेशीर.
5)मोरीनग पावडर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
6)रक्तातील साखर नियंत्रक मोरिंगा पावडर.
7)नैसर्गिकरित्या वजन कमी करणारा पदार्थ.
8)केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मोरिंगा पावडर.
9)मोरिंगा पावडर त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते.
10)उच्च रक्तदाब कमी करते.
11)प्रसुतीनंतर महिलांसाठी फायदेशीर.
मोरिंगा पाला ड्रायरला टाकल्यानंतर ड्रायरच्या आतील तापमान आणि ड्रायरच्या बाहेरील तापमान आणि आद्रता किती टक्के होते त्यांची नोंद घेतली खालील प्रमाणे:
अनू क्रमांक | दिनांक | वेळ | ड्रायर च्या बाहेरिल तापमान | ड्रायर च्या आतील तापमान | दिवसभरात किती टक्के अद्रात होती |
1) | 5/12/23 | 10:35 | 27.1 ℃ | 30.3℃ | 55% |
2) | 12:00 | 32.5℃ | 36.6℃ | 48% | |
3) | 1:00 | 29.6℃ | 35℃ | 41% | |
4) | 2:00 | 33.4℃ | 38.7℃ | 39% | |
5) | 3:00 | 30.℃ | 39.1℃ | 38% | |
6) | 4:00 | 28℃ | 31.5℃ | 36% |
एल ओ डी (लॉस ऑन ड्राईंग )चे सूत्र=(सुरुवातीचे वजन➖अंतिम वजन) ➗ सुरुवातीचे वजन✖️100
LOD=2976➖815➗2976✖️100
=71.43%
NO | DATE | DRYING STAFF NAME | TOTAL WEIGHT FOR LIVES | AFTER DRY WEIGHT | DRY | MOISTURE |
1) | 6/12/2023 | MORINGA | 2976GM | 810GM | 28.57% | 71.40% |
2) | 26/12/2023 | MORINGA | 2283GM | 750GM | 33% | 67% |
3) | 29/12/2023 | MORINGA | 1692GM | 750GM | 27.78% | 72.22% |
4) | 21/01/2024 | MORINGA | 4250GM | 1377GM | 32.31% | 67.69% |
5) | 25/12/2023 | AVALA SUPARI | 2000GM | 450GM | 22.5% | 77.5% |
6) | 16/01/2023 | AVALA CANDY | 5000GM | 2385GM | 47.7% | 52.3% |
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-02-08-at-11.04.48-AM-1024x471.jpeg)
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-02-08-at-11.04.46-AM-3-473x1024.jpeg)
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-02-08-at-10.54.18-AM-1024x473.jpeg)
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2024/02/image-471x1024.png)
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-02-08-at-10.54.17-AM-1-1024x473.jpeg)
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-02-08-at-10.54.16-AM-1-471x1024.jpeg)