कोंबडी पालन हे मांस आणि अंडी यासाठी केले जाते. एक कोंबडी वर्षातून 180 ते 270 अंडी देते.
लहान पिल्ले जनमल्या पासून 5 ते 6 महिन्यात अंडी द्यायला सुरवात करतात.
कोंबडी जाती | कोंबड्यांचे प्रकार
1.लेयर कोंबडी
2. बॉयलर कोंबडी
3. देशी कोंबडी
कोंबडी खाद्यामधील घटक
- संतुलित कोंबडी खाद्यातील पौष्टिक तत्त्वांमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, चरबी, खनिज पदार्थांचा समावेश असतो. आपल्याला कोणत्या प्रकारचे खाद्य तयार करावयाचे आहे, याचा निश्चित आराखडा तयार केला पाहिजे. कारण कोंबडी खाद्य चिक, ब्रॉयलर व लेयर अशा तीन प्रकारचे असते.
- कुक्कुटखाद्य ताजे व ओलावा कमी असणे आवश्यक आहे
- मोठ्या कोंबड्यांना थोडे जाडे भरडे खाद्य असावे. सूक्ष्म तत्त्व म्हणजे खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे, अमिनो आम्ल व औषधांचे मिश्रण एक किलो मका या प्रमाणात घेतात. हे मिश्रण पाच-सहा किलोपासून तर 100 किलो खाद्याच्या प्रमाणात असावे.