1. माती परीक्षण

यासाठी मी टॉवर जवळची माती परीक्षण केली.

1.माती घेताना मी झिगझाक पद्धतीने घेतली .

माती परीक्षणासाठी माती घेतांना

माती परीक्षण करताना मी पहिले पीएच चेक केला.

PH-7.0

त्यानंतर नत्र चेक केला

नत्र N-295 भेटला

स्पुरत P-35

पालाश K-370

2.गाईची स्वच्छता

१.गाई स्वच्छ धुवून घेण्यासाठी पहीलं गाईवरती पाणी मारले

स्वच्छता करताना

नंतर साबुन लावला व चोळुन पाणी मारले.

गाईची स्वच्छता केली नाही तर गाईला मास्टडी आणि दगडी आजार होऊ शकतो .

3. कलम करणे

यात मी1. सूरी 2. कलम पट्टी 3. नारळाच्या कीस

1घुटी कलम

गुटी कलम करताना मी जास्वंद च्या झाडाला तसेच पेरूच्या झाडाला कलम केला .

2 दाब कलम

दाब कलम हा पेरूच्या झाडाला केला .

3 शाट कलम

जास्वदीच्या झाडाला केलेल्या कलम 15 दिवसणी शाटुन् कुंडीत लावला .

छाट कलम लावताना

4. बीज प्रक्रिया

बीज प्रक्रिया करण्यासाठी आम्ही ज्वरी च्या बियाण्यावर प्रक्रिया केली .

ट्रायकोडरामा 1. kg ज्वारी 3. kg घेऊन प्रक्रिया केली .

ज्वारी पेरताना

त्यामुळे बुरशी लागत नाही .पीकाला व पेरलेले सर्व धान्याला मोड येतील व बुरशी लागणार नाही .

कोळपे फिरवताना

यातून मी ही शिकलो .

5. प्राण्याचे तापमान मोजणे

प्राण्याचे तापमान मोजण्यासाठी थरमामीटर वापरुन तापमान घेतले .

तापमान घेताना

यात मी डिग्री सेल्सिअस फेरनाईड मध्ये कसे करायचे ही शिकलो .

गौरी

घेतलेली तापमान

तापमान 1. राखाडी ताबडी 101’1 F

2.ताबडी 99`.3

6. दूध काढणे

1.दूध काढण्यासाठी गायीची कास धुवून घेतली.

दूध काढताना

7. शेळ्याच्या वजनावरून खाद्य काढणे

यात मी शेळीच्या वाजनवरून खादये काढले .

त्यात मी खुराक25% ,चारा75% हे काढले .

चाऱ्यात दोन प्रकार पडतात 1. सुखा चारा25% 2. ओला चारा 75%

उदा . वजन 30 केजी

30*3/100 =90/100=0.9

खुराक 0.9*25/100=0.22

चारा =0.9*75/100=0.67

सुखा चारा

0.67*25/100=0.67

0.67*2=0.32gm सुखा चारा

ओला चारा =0.67*75/100=0.50

0.50*5=2.5 kg ओला चारा

खुराक 0.22

सुखा चारा 320 gm

ओला चारा 2.5 kg

8. गाईचे वजन मोजणे

यासाठी मी mitter टेप वापरला . व गाईचे वजन काढले.

गौरी .

लांबी 63

छाती 74

वजन=74*74*63/300

1149/2.2

kg =522 kg

लक्ष्मी

छाती -60

लांबी -56

60*60*56/300=672 पाऊंड्स

672/2.2=305 kg

9. पीक लागवडीसाठी चा खर्च

विज्ञान asharm मध्ये 20 गुंठे जागेत 10 kg ज्वारी ची लागवड 4 /07/2023 ते 13/10/2023 याला लागणार खर्च काढला . तो पुढील प्रमाणे

माती परीक्षण -300

नागरणी -1600

साफसफाई- 250

कोळपणी -400

पेरणी करणे -1200

बिया-600

बिजप्रक्रिया -50

काढणी -1500

ट्रॅक्टर भाडे -500

एकूण खर्च -6400

10. सेंद्रिय खत तयार करणे

सेंद्रिय खत तयार करण्यासाठी आम्ही झाडचा पाला गोळा केला .

व 10*4 च्या बेड मध्ये अर्धा फुट पसरवला .

त्या नंतर त्यात 30 टोपले जनावरांची उष्टावळ टाकली . व त्यात 100 kg कुजलेले शेणखत टाकले .

असे परत केले व त्यात पुन्हा 100 kg शेणखत टाकले .

आणि त्यात 4 लिटर कल्चर टाकले .

व त्यात 75 लिटर पानी टाकले .

11. पाणी देण्याच्या पद्धती

  1. वाफे पद्धत
  2. सारी पद्धत सारी पद्धतीत 1 मिनिटात 6000 लिटर पाणी लागले .
  3. ठिबक पद्धत यात 1 मिनिटात 100 ml एका drip मधून पानी पडते .
  4. तुषार सिंचन यामध्ये मी प्रत्यक्ष पणे मी पानी मोजले . त्यात 1 मिनिट मध्ये १स्प्रिंकलर७.५ लिटर पाणी पडते.
  5. यातून मला असे समजले की ठिबक सिंचनला कमी पाणी लागते.

पाणी भरताना

12. पोल्ट्री

1. पोल्ट्री माहिती घेतली.

पोल्ट्री कशी असावी तिचे बांधकाम पूर्व पश्चिम असावे व हाईट 14 फुट असावी .

कोंबड्यांना खाद्य टाकताना

लहान पिलांना ऊब कशी द्यावी ब्रूडिंग ते कसे निर्माण करावे हे पाहिले व प्रत्यक्ष केले .

तसेच कोंबड्यांवर येणारे आजार पाहिले

1. गाऊड

2. सर्दी

लक्षण= चिकट द्रावण नाकावाटे बाहेर येते.

3.कोलाय खराब पाण्यामुळे होतो

लक्षणे =लिव्हर सूज हिरवगार काळीज पडतं हृदयावर पांढऱ्या सा होतो

4. टोकसिटी

लक्षणे=1. हिरवीगार विस्टा

तसेच कोंबड्यांना टीव्ही बी इंजेक्शन दिले

13. पॉलिहाऊस

यात मी ही संकल्पना जाणून घेतली

पॉली अशी चार प्रकार पडतात

1. ग्रीन हाऊस

2. पॉलिहाऊस

पॉलिहाऊस मधील ड्रिप साफ करतांना

3. शेडनेट पॉलिहाऊस

4. ग्लास हाऊस

पॉलिहाऊस चा मुख्य उद्देश म्हणजे पिकांचे संरक्षण करणे. पॉलिहाऊस मध्ये पिकांची एक सारखी वाढ होती. पोलीस बांधताना पोलिहाऊसला पॉलिथिन पेपरचा वापर केला जातो.

पॉलीहाऊस मध्ये आपण टेंपरेचर मेंटेन करू शकतो.

14. रासायनिक सेंद्रिय आणि जिवाणू खते

यात मी रासायनिक आणि सेंद्रिय व जिवाणू होते पाहिली.

1.रासायनिक खते

अ. संयुक्त खते

1.युरिया

आ. मिश्र खते

1. एस एस पी 2. 18:46:00 3.10:26:26

2. सेंद्रिय खते

1. शेणखत 2.गांडूळ खत3. कंपोस्ट खत

3. जिवाणू खते

1. रायझोबियम 2. अझॅक्टोबॅक्टर

15. प्राण्यांचा आहार खाद्य व्यवस्थापन

1. सुका चारा

गाईला चारा टाकताना

ज्वारी मका बाजरी भात नाचणी यांची हिरवी साटे

2. हिरवा चारा

1.एकदल

मका गहू ज्वारी नागली वरई

2. द्विदल हिरवा चारा

भुईमूग शेंगा कडधान्य तू कैरीचा पाला

3. खूराक

दोन-तीन घटक एकत्र केलेले पदार्थ

मका सोयाबीन

16. महाराष्ट्रातील प्रमुख तने गवत

यात मी वेगवेगळे प्रकारची गवत पाहिले .

1. टन टनी

2. धोतरा

3. काँग्रेस 4. लांडगा

5. तरोटा

6. कुरडू 7. इचका 8. लव्हाळा 9. लाजवंती 10. हराळी 11. अमरवेल अशी वेगवेगळी गवत पाहिली

17. कोंबड्यांचे FCR

कोंबड्यांचे एफ सी आर काढताना एका महिन्याच्या नोंदी घेतल्या

एकूण खाद्य310kg

एकूण कोंबड्या70

28/09/2023=1.6kg

22/10/2023=2.1kg

एकूण वजन वाढ=2.1-1.6

. =0.5kg

. =0.5*70

एकूण कोंबड्यांचे वजन=35kg

FCR=एकूण दिलेले खाद्य*एकूण वाढलेले वजन

. =310%35

FCR=8.85

18. कांदा लागवड

कांदा लागवड करताना पंचगंगा हे बियाणे पेरले होते.

बियाणे एक महिन्यानंतर आल्यानंतर ते उपटून घेतले.

कांदा लावण्यासाठी वाफे तयार केले.

हे वाफे तयार करण्यासाठी3.36 गुंठे जागा लागली .

कांदे लावण्यासाठी आम्ही जिवाणू बिजप्रक्रिया केली

त्या साथी आम्ही ट्रायकोडरमा पावडर पाण्यात टाकून मिसळवून घेतले .

नंतर त्या पाण्यात कांद्याचे रोप बुडवून घेतले . कांदे लावण्या आधी कांदे कापून घेतले . व कांदे लावले .

19. प्लांट टिशू कल्चर

हे प्रॅक्टिकल करताना मी शेगवाच्या फानाटीचे काडी काढली .

प्रॅक्टिकल करताना

नंतर ते 10 मिनिट नळाखाली पानी चालू करून ठेवले .

त्या नंतर मशिन detol ने स्वछ केले

व तयार केलेल्या मेडिया मध्ये शेगवाचे फांदी मीडिया मध्ये टाकण्यासाठी गरम केली व त्यावरील बेकटेरिया मारला .

20. नर्सरी

यामध्ये मी नर्सरी मध्ये आपण काय करू शकतो याबदल माहिती घेतली .

रोपांना पानी टाकतांना

त्या मध्ये आंबा जाभुळ असे वेगवगळे झाडांचे रोपे आपण नर्सरी मध्ये लाऊ शकतो .

21. कीड व कीटकनाशक

कीड म्हणजे काय – कोणताही सजीव प्राणी जो पिकाचे आर्थिक नुकसान करतो त्याला कीड म्हणतात.

नाशकाचे प्रकार नियंत्रण करता येणारी कीड

1.कीड नाशक

2.मुष्क नाशक

2.उदिर

3.कोळी नाशक

4.सूत्र कमी नाशक

5.बुरशी नाशक

6.जिवाणू नाशक

. 7.तन नाशक

8. पक्षी नाशक

9. गोगल गाय नाशक

9. गोगल कीडगाय नाशक 10.शेवाळ नाशक

हे सर्व कीडनाशक आहेत.

यातून मी हे शिकलो की कोणत्या किडीवर कोणते औषध फवारायचे.

शॉर्ट टर्म कोर्स

या कोर्समध्ये मी रंगकाम हे काम घेतले होते.

त्यामध्ये आम्ही क्लासरूमला रंग देण्याचे काम घेतले.

काम घेतल्यानंतर क्लासरूमचे क्षेत्रफळ काढले

व त्याचा अंदाज खर्च काढला.

काम करताना आम्ही पहिले साफसफाई केली नंतर पुठठी भरली.

पुट्टी भरताना

पुठ्ठी भरल्यानंतर आम्ही प्रायमर मारले.

प्रायमर मारताना

प्रायमर मारल्यानंतर आम्ही समोरच्या बाजूला लाईट ब्लू हा रंग दिला.

रंग देताना

लाईट ब्लू हा कलर आम्हाला आठ लिटर लागला.

कॉस्टिंग काढलेली

यातून मला असे शिकायला मिळाले की तर कसे देतात व त्यासाठी पहिल्या असा अंदाज कसा काढला जातो. तसेच कलर देताना कोणती काळजी घ्यावी व बॉर्डर मारण्यास शिकलो.

प्रोजेक्ट

विभाग :शेती

प्रोजेक्ट नाव :हायड्रोपोनिक्स

या शेतीमध्ये कप, कोकोपीट,पाईप पाईपांचे स्डड मोटार , पाण्याची टाकी यांचा वापर करून शेती केली जाते.

लागवड करताना

यात मी 385कपमधे पालक लागवड केली. माती विना शेती म्हणजे हायड्रोपोनिक्स शेती होय.

पाण्याचे TDS-1200 EC-2400 PH-6.5 हे मोजण्यासाठी पी एच मीटरचा वापर करावा लागतो

. निरीक्षण करतांना २ते ३ दिवसांनी कोंब आले. हि शेती आपन घरी कमी जागेत करु शकतो. तसेच या शेतीत पाणी वाया न जाता पुन्हा आपन रिस्टोर करु शकतो.

१. लागवड दिनांक 2/10/2023

२.निरीक्षण- २ते३ दिवसांनी कोंब आले.

पालक या पिकाला पाण्याद्वारे खत टाकले.

३.खतांचा पहीला डोस-०६/१०/२०२३

४. खते 1. युरिया-७.५gm 2. CaNo3-233gm 3. 00:52:34-403gm 4. Mgso4-52.5gm 5. 00:00:50-441gm 6. EDTA-168gm 

उंची  १८/१०/२०२३-१२cm

२२/१०/२०२३-१४cm

अनुभव ;यातून मी असं शिकलो की या शेतीतून आपण कमी जागेत जास्त उत्पादन घेऊ शकतो. आणि या शेतीतून मला असे समजले की यात पाणी वाया न जाता ते पुन्हा वापरु शकतो. अनुभव यातून मी यात मला असा अनुभव आला की जमिनीवर शेती करतो तेव्हा बाकीचे खत वाया जाते. हायड्रोपोनिक्स मध्ये शेती केली जाते तेव्हा खताचा पुनरवापर होतो.