शेळ्यांच्या जाती
१)उस्मानाबादी
२)सानेन
३)सोजत
४)संगमनेरी
५)सिरोही
६)बीटल
७)आफ्रिकन बोअर
८)बारबेरी
९)जमुनापुरी
१०)सुरती शेळीपालनाच्या पद्धती
1….बंधीस्त शेळीपालन शेळ्यांची चरण्याची पद्धत ही इतर गुरांपेक्षा वेगळी असते.त्या केवळ झाडांची पाने व कोवळे शेंडे ओरबाडतात.यामुळे बकरीने तोंड लावलेल्या झाडांची वाढ खुंटते.तसेच यामुळे झुडपांचा व जंगलाच नाश होतो असा समज आहे. बंदिस्त संगोपनात शेळ्यांची झपाट्याने वाढ होते.यासाठी वातावरणापासून संरक्षणासाठी त्यांचेसाठी गोठा आवश्यक आहे. तो गोठा उंचवट्यावर,मुरमाड जमिनीत व पाण्याचा निचरा होऊ शकेल अशा ठिकाणी असावा.शेळ्यांना प्रत्येकी १० ते १२ चौ.फूट, करडांना (पिल्लांना)२ ते ५ चौ.फू. व बोकडास २५ चौ.फू. जागा लागते. अशा प्रकारे संख्या बघून गोठा उभारावा.याशिवाय गोठ्याबाहेर त्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा असावी
2….अर्धबंदिस्त शेळीपालन शेळ्या या विशेषत: फिरणारे जानवर म्हणून ओळखले जाते. यामुळे जर शेळ्यांना रोज काही वेळ चरण्यासाठी मोकळे सोडले तर त्यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती खाद्यामध्ये मिळतात व त्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते. शेळ्यांना नैसर्गिकपणे फिरुन चारा व झाडपाला ओरबाडण्याची सवय असते. त्यांना गोठ्यात कोंडून ठेवल्यास व्यायाम मिळत नाही. त्यांना फिरवून आणल्याने त्यांचे खूर वाढत नाहीत.