अझोला सामान्य सखल प्रदेशात आणि उथळ पाण्याच्या ताज्या स्त्रोतांमध्ये आणि लहान वाहणाऱ्या जलकुंभांमध्ये दिसू शकतो. हे फर्न निळ्या-हिरव्या असतात ज्यांना अॅनाबेना अझोला म्हणतात. पृथ्वीवरील ऊर्जेचा वापर करून वातावरणातील नायट्रोजन काढून टाकते आणि दरवर्षी सुमारे 100-150 नायट्रोजन तयार करते. 40-60 टन बायोमास
अझोला शेती- दुग्ध उत्पादनाकारता शेतकरी पाळत असलेल्याला दुभत्या जनावरांना लागणाऱ्या महागड्या खुराकामुळे दुग्ध उत्पादनावरील खर्च वाढत असतो . खर्च कमी करण्यासाठी घरच्या घरी कमी खर्चात अधिक चांगला नैसर्गिक वनस्पतिजन्य चारा म्हणजेच अँझोला वनस्पती दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशिर ठरत आहे
अझोला काय आहे ? आणि अझोला ची निर्मिती कशी करतात :
ही पाण्यावर वाढणारी शैवालवर्गीय वनस्पती आहे. जनावरांच्या खाद्यामध्ये त्याचा पूरक म्हणून वापर करण्यात येतो. तसेच, भातशेतीमध्ये खत म्हणून गाडल्यास त्यातून नत्र उपलब्ध होते.
- झाडाच्या सावलीत किंवा ५० टक्के शेडनेटचा वापर करून ९ फूट लांब व ६ फूट रुंद व ९ इंच खोलीचा खड्डा करावा.
- पाणी झिरपू नये म्हणून खड्डा चांगल्या प्रतीच्या प्लॅस्टिक किंवा पॉलिथिनने आच्छादून घ्यावा
- १२-१५ किलो माती प्लॅस्टिकवर पसरवून घ्यावी. त्यावर ३-४ किलो चांगले कुजलेले गाईचे शेण व ३०-४० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट १० लिटर पाण्यात चांगले मिसळून हे मिश्रण खड्यात सोडावे,
- खड्डयात ८-१० सें.मी. पाणी राहील, याची काळजी घ्यावी.
- तयार खड्ड्यातील पाण्यात.५ ते १ किलो अँझोलाचे कल्चर सोडावे.
- ८-१० दिवसांत खड्डा अँझोलाने भरून जातो. अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी असे एकापेक्षा अधिक खडडे तयार करावेत.
अझोला मधील विविध घटक
- शुष्क अँझोलात प्रथिने (२५ ते ३५ टक्के),
- आवश्यक अमिनो आम्ले (७ ते १० टक्के)
- जीवनसत्त्वे, खनिजे (कॅल्शियम, फॉस्फरस,पोटॅशियम, लोह, तांबे, मॅगेशिअम) (१० ते १५ टक्के)
- अँझोलामध्ये अन्नपचनास उपकारक घटक असल्याने उच्चदर्जाची प्रथिने असल्याने अझोला जनावरे सहज पचवू शकतात.
अझोलाचे फायदे :
- दुग्ध उत्पादनात १५-२० टक्के (अर्धा ते एक लिटर प्रति जनावर ) वाढ होते.
- प्रचलित पशुखाद्यावरील खर्च २०-२५ टक्क्यांनी कमी होतो.
- दुभत्या जनावरांसोबतच ही वनस्पती मांसल (ब्रॉयलर) कोंबड्या तसेच अंडी देणाऱ्या कोंबड्यांनाही पुरवून उत्पादन वाढवू शकतो. याचबरोबर शेळ्या, मेंढ्या, वराह यांना पुरविल्यास त्यांच्याही उत्पादनात चांगली वाढ होते.
- अँझोला उत्पादनावरील खर्च अत्यंत कमी असून, त्यातुलनेत अझोला उत्पादन अधिक आहे.
- अझोला पुरविलेल्या जनावरांची वाढ व उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
- ही सेंद्रिय व नैसर्गिक वनस्पती आहे; त्यामुळे जनावरांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत नाही.
- कमी जागेत उत्पादन घेता येते. प्रकल्प सुरू करायला लागणारी गुंतवणूक ही कमी आहे. दुधाची गुणवत्ता वाढते. जनावरांची प्रकृती सुधारून आयुष्यमानही वाढते.
अझोला देण्याची पद्धत व प्रमाण
- अझोला थेट जसेच्या तसे जनावरांना किंवा इतर खुराकात मिसळून देता येते.
- दुधाळ जनावरांना रोजच्या आहारात २ ते ३ किलो अँझोला शेतकरी देऊ शकतात. अँझोला जनावरांना देण्यापूर्वी स्वच्छ धुऊनच द्यावे.
प्रकल्प उभारणी खर्च :
२५० ते ३०० रु. प्रति खड्डा असून, हा खर्च फक्त एकाच वेळी करावा लागतो.
खलील बाबींची काळजी घ्यावी:
- खड्याचीजागा सावलीत, पण भरपूर सूर्यप्रकाश मिळणारी असावी. दर २५-३० दिवसांनी खड्याची ५ टक्के माती ताज्या काळ्या मातीने बदलावी.
- अझोला चे वाळवी, मुंग्या, किडे यांपासून संरक्षण करावे.
- दर ५ दिवसांनी खड्ड्यातील २५-३० टक्के पाणी काढून त्यात ताजे पाणी टाकावे.
- खड्यातील पाण्याची पातळी कायम ८-१० सें.मी. असणे गरजेचे आहे.
- उन्हाळ्यात कडक उन्हामुळे अझोलाचा रंग हिरवट तांबडा किंवा विटकरी होतो. त्याच्या वाढीवर परिणाम होतो.
- अझोला निर्मिती खडडयाच्या गारव्याला कुत्री व अन्य प्राणी येऊन बसतात, त्यांच्यासाठी बाजूने खांब रोवून दोरी किंवा कापड किंवा गॅबियन मेशचे कुंपण करून घ्यावे.
- झाडाखाली खडडा केला असल्यास पालापाचोळा पडून कुजल्याने अझोला खराब होऊ शकतो. त्यासाठी वरून आच्छादन आवश्यक आहे.
- शेण उपलब्ध आहे म्हणून अधिक वापर होतो. त्यामुळे अमोनिया निर्माण होऊन त्याचा वास अझोला ला येतो; त्यामुळे योग्य प्रमाणात शेणखत टाकावे.
- पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यामध्ये बाहेरून पाणी येऊन अझोला वाहून जाऊ शकतो. त्यामुळे अधिक पावसाच्या ठिकाणी खडडे अधिक उंचावर करावेत किंवा विटांच्या सहाय्याने ९ इंची टाकी करावी.
- पावसापासून संरक्षणासाठी खड्ड्यावर छत म्हणून ५० टक्के शेडनेटचा वापर करावा