1} प्रॅक्टिकल – मशीन व अवजारची ओळख

  1. मिलिंग मशीन

मिलिंग मशीन, एकतर उभ्या किंवा क्षैतिज, सामान्यत: सपाट आणि अनियमित आकाराच्या पृष्ठभागावर गीअर्स, थ्रेड्स आणि स्लॉट्स ड्रिल, बोअर आणि कट करण्यासाठी वापरली जातात

2) Co2 welding

ज्याला गॅस मेटल आर्क वेल्डिंग (GMAW) असेही म्हणतात, एक वायर इलेक्ट्रोड वापरते जे वेल्डिंग गनद्वारे दिले जाते आणि इलेक्ट्रिक आर्कद्वारे वितळले जाते. वातावरणातील दूषित होण्यापासून वेल्डचे संरक्षण करण्यासाठी कार्बन डाय ऑक्साईड वायूचा संरक्षक वायू म्हणून वापर या प्रक्रियेत होतो.

3) लेथ मशीन

लेथ मशीन हे एक स्थिर कटिंग टूल आहे जे प्रामुख्याने लाकूड आणि धातूला आकार देण्यासाठी वापरले जाते, हे एक स्थिर कटिंग टूल आहे जे प्रामुख्याने लाकूड आणि धातूला आकार देण्यासाठी वापरले जाते

2} प्रॅक्टिकल – मापन

मापणाचे 2 प्रकार आहे . ब्रिटिश & मेट्रिक हे २ मोजमपणाचे येणत्रना आहे

ब्रिटिशमॅट्रिक
इंचमिलि मीटर
फूटसेंटी मीटर
मनमीटर
खंडीकिलो ग्रॅम
गुंठालिटर
डझनग्रॅम
ऐकरमिलि लीटर
सव्वा
मेल

25 mm = 2.5 cm

25 mm = 1 inch

2.5 mm = 1 inch

12 inch = 1 foot

3.3 foot = 1 mete

Vernier calliper

3} प्रॅक्टिकल – RCC COLUM

उद्देश – जास्त वजन पेलण्यासाठी rcc कॉलम तयार करणे

साहित्य – मोठी खडी , ग्रीट, सिमेंट , पाणी, ऑइल

साधने – घमेल, फावडे, थापी, कॉलम साचा

कृती -1} rcc कॉलम साठी जागा निवडावी .

2 }कॉलम साचा साफ करून तेल ऑइल लाऊन गयावे

3} माल गोळा करावा

4} पाईप ला तारा बांदुण घ्यावी

5} कॉलम च्या सच्यामद्धे माल टाकावा

6} हा कॉलम चा साचा 24 तास तसंच ठेवावा

7} दुसऱ्या दिवशी तो साचा उघडून त्यावर पाणी मारावे

4} प्रॅक्टिकल  लेथ मशीन

उद्देश :- जॉब तयार करायला शिकणे सरफेस काढणे व कट मारणे

साहित्य :- लाकडी ठोकला

कृती :- 1) सर्वप्रथम मशीन ची माहिती घेतली.

2)मशीन लाकूड सेट केले.

३) लईथ मशीन चालू केली.

4) लाकडाचा सरफेस काढला त्यानंतर प्लेन कट केलं.

5) त्यानंतर हलकासा साईटला कट मारला.

6) त्यानंतर पॉलिश पेपरने घासून घेतले.

7) जॉब झाल्यावर मशीन बंद केले व लाकूड कट करून घेतले

5} प्रॅक्टिकल – अर्क वेल्डिंग

वेल्डिंग हि दोन धातू जोडण्यासाठी केली जाते. अर्क वेल्डिंग हि रॉड च्या सहायाने केली जाते.

प्रक्रिया – Electrical चे फेज व न्यूट्रल ऐकत्र येवून स्पार्क झाले की वेल्डिंग होते .

वेल्डिंग चे प्रकार :- 1) अर्क 2) CO2/MIG 3) TIG 4) SPOT 5) GAS

रॉड – E6016, E7013

कृती – 1} प्रथम आपण जी वस्तु बनवणार त्याची डायग्रॅम कडून घ्यावी . वेल्डिंग

2 }वेल्डिंग चे समान जवळ करून घ्यावे.

3 }सेफ्टी असावी.

4 }वेल्डिंग मशीन चालू करून तिचे तापमान सेट करावे व वेल्डिंग करावी .

5} वेल्डिंग झाल्यावर मशीन बंद करावी .

6} प्रॅक्टिकल – पावर हेक्सा

उद्देश :- लोखंड किवा लाकूड कापणे

साहित्य ;- पॉवर axo मशीन लाकूड व लोखंड

कृती :- 1) मशीन मध्ये करंट जोडावा.

2) वॉइस मध्ये लाकूड सेट करावा.

3) कटर bled लकडवर ठेवावे .

4) लॉक करुन कटर हळुवार पणे लाकडाच्या दिशेने झुकवावे.

5) लाकूड कापल्यावर मशीन बंद करावी.

7} प्रॅक्टिकल – पाइप लाइन

उद्देश :- घरातील किवा इतर ठिकाणची पाइप लाइन करायला शिकणे

साहित्य :- pvc पाइप, लबो, सेलुशन, xo

कृती :- 1) अगोदर ज्या ठिकाणी आपण पाइप लाइन करणार त्या ठिकाणी मोजमाप करावे व अंदाजे खर्च सांगावा , व मटेरियल गोळा करावे.

2) योग्य त्या मापात पाईप कापून घ्यावा.

3) पाईपे चिकटवताना सेलुशन लावले जेणेकरून पाणी लिकेज होणार नाही.

4) पाईपे लाइन झाल्यावर पाणी सोडून चेक करावे

8} प्रॅक्टिकल – पाया आखणी

उद्देश :- भिंत सरल व अचूक बांधणे.

साहित्य :- दोरी, गंज, हातोडा, गुण्या, फक्की, मीटर टेप

कृती :- 1) प्रथम पाया आखणीची जागा निवडावी.

2) जागा साफ करुन घ्यावी.

3) मीटर टेप च्या सहाय्याने जागा मापावी.

4) मापन झाल्यावर गंज ठोकून घ्यावेत.

5) लाइन दोरी ताणून घ्यावी.

6) शेवटी मग फककीने लाइन आउट करावे.

9} प्रॅक्टिकल – विटांचे बांधकाम

उद्देश :- विटांच्या रचना व बांधकाम

साहित्य :- विटा, सिमेंट, मीटर टेप, ओळंबा, थापी, हॅन्ड ग्लोज, वाळू, कुदळ, फावडे.

कृती :- विटांचे बांधकामाची जागा पाहणे

2) ती जागा स्वच्छ करून घेणे

3) पायाची आखणी करून घ्यावी

4) सिमेंट व वाळू यांचे मिश्रण करून घ्यावे

5) ज्या ठिकाणी बांधकाम करायचे त्या ठिकाणी अगोदर मिश्रण लावून घ्यावे व त्यावर विटा लावून घेतात

6) सर्व विटा सरळ लावाव्यात

7) त्यानंतर विटांचे संधि भरून घ्याव्या

बोन्ड चे प्रकार :- हेड स्ट्रेचर इंग्लिश फ्लेमिश व रट्ट्रॅप

10} प्रॅक्टिकल – MOBILE APP

उद्देश :- मोबाईल ॲप द्वारे लेवल घेणे

साहित्य :- मोबाईल

कृती :- 1) बबल लेवल नावाचा ॲप घ्यावा

2) एप ची सेटिंग करून घ्यावी

3) त्यामध्ये दिल्याप्रमाणे लेव्हल चेक करून शकतो

11} प्रॅक्टिकल – CO2 वेल्डिंग

उद्देश :- वेगवेगळ्या प्रकारे वेल्डिंग करायला शिकणे.

साधने – वेल्डिंग हेल्मेट , गॉगल्स , सेफ्टी सूज , मशीन , co 2 गॅस वायर कीड यूनिट

साहीत्य :- लोखंडी ट्यूब , मीटर टेप , खडू

कृती :-1) सर्व प्रथम साहीत्य गोला केल .

2) टेबल तयार करण्यासाठी ट्यूब व पत्रा घेतला .

3) 45 डिग्री मध्ये ट्यूब कापली 1-1 फुटच्या .

4) व त्याला co 2 वेल्डिंग केली .

12} प्रॅक्टिकल – मिलिंग मशीन

उद्देश :- लाकडी किंवा लोखंडी सरफेस ला चावी गाळा डिग्री आकार देणे

साहित्य:- मिलिंग मशीन, लाकडी किंवा लोखंडी जॉब, सरफेस टूल, गाळा टूल, डिग्री, इत्यादी.

कृती:- 1) लाकडी जॉब टूल च्या खाली सेट करून घ्यावा

2) सुरुवातीला सरफेस प्लेन करून घ्यावा

3) चावी गावातून लावून त्याला आकाराचा जॉब वर फिरवावा

4) शेवटी डिग्री टू डाऊन सेट करून जॉबला चारही बाजूने डिग्री मारावी

13} प्रॅक्टिकल – रंग काम

उद्देश :- रंग काम करायला शिकणे व विविध रंग षटांचा अभ्यास करणे

साहीत्य :- रंग , थिनर, प्रायमर, रोलर, पॉलिश पेप, पलटी पत्रा, पुटी, झाडू, बकेट.

कृती :- 1) सर्वप्रथम जागा साफ केली .

2) गॅप मध्ये पुटी भरून लेवळ करून घेतली व पॉलिश पेपर णे घासल .

3) नंतर जागा परत साफ केली .

4) प्रायमर चा एक हात मारला ( वॉल प्रायमर )

5) प्रायमर सुकल्यावर कलर शेड चा हात मारला .

14} प्रॅक्टिकल – सनमायका बसवणे

उद्देश :- प्लाउडला सनमायका बसवायला शिकणे

साहित्य : – फेविकॉल, सनमाईक, प्लाउड, कटर, पत्रा, पेपर .

कृती :- 1) प्लाउडचे मापन करून घेतले.

2) मापाच्या सहाय्याने सन्माईक कट करून घेतली.

3) प्लाउड सनमाइक या दोघांवर फेविकॉल लावला.

4) त्यानंतर त्या दोघांना एकमेकांवर चिटकवले.

5) घट्टपणा साठी पेपर टेपचा वापर केला.

6)24 तासांनी पेपर टेप काढून घेतली व सनमइक वरचा प्लास्टिक काढून स्वच्छ केला.

15} प्रॅक्टिकल – पावडर कोटींग

साहीत्य :- लोखंडी वस्तु

साधने :- पावडर कोटींग मशीन , कलेक्टर, ओहण, स्प्रेगण

कृती :- 1) लोखंडी वस्तूला पहिल थ्री वन लिक्विड लावल.

2) 10 मिनिट थांबून त्याला पाण्याने धुवून घेतल.

3) त्यानंतर कापडाणे पुसून घेतल.

4) कलेक्टर व कॉमप्रेसर चालू करून पावडर कोटींग चा कोट दिला.

5) कोटींग झाल्यावर त्याला ओहण मध्ये ठेवला.

6) ओहण चे तापमान 150 डिग्री

वेळ 45 मिनिट

16} प्रॅक्टिकल – थ्रेडिंग व टॅपिंग

साहित्य :- थ्रेडिंग डाय

कृती :- 1) प्रथम टेबल ला ड्रिल केलं.

2) त्यानंतर त्याला थ्रेडिंग टूलने थ्रेडिंग केलं.

3) ट्रेडिंग करताना त्यावर ऑइल चा वापर केला

17 } प्रॅक्टिकल – फेरो सिमेंट

साहीत्य :- लोखंडी बार , वेल्डमेस्त जाळी , चिकनमेस्त जाळी ,सिमेंट , वाळू , पेपर .

कृती :- 1)ज्या ठिकाणी फेरो सिमेंट करायचे त्याचे माप घेतले. { टाकीचे झाकण }

2) त्या आकाराचा एक गोल किवा चौकीनी साचा तयार करून घ्यायचा.

3) त्यामध्ये वेल्डमेस्त जाळी व चिकनमेस्त जाळी लाऊन घ्यायची .

4) त्यानंतर त्या मध्ये 3:1 या प्रमाणात मिश्रण करून टाकावे .

5) मिश्रण टाकताना एका बाजूला पेपर लावावा .

6) त्यानंतर त्याला वळत ठेवावे व काही दिवस त्यावर पाणी मारावे .