१. पत्रा काम

आज मी तुम्हाला आम्ही केलेल्या पत्रा कामा बद्दल माहिती देणार आहे. यामध्ये आम्ही पत्र्या पासून सुपली बनवली आहे.

सर्वात पहिल्यांदा GI च पत्रा घ्यायचा. या पत्राच्या आत MS पत्रा असतो त्यावर GI पत्र्याचा थर असतो. ह्या पत्र्यावर सुपलीसठी लागणारे मोजमाप करायचे. मग पत्रा लागेल तेवढा कापायचा. नंतर पत्रा कापताना जर वाकडा झाला असेल तर त्याला grinding माशीनच्या मदतीने किंवा हातोडीच्या मदतीनं सरळ करायचा मग त्याच्या वरचे दोन टोक हे एका बाजूने कापायचे. नंतर पत्रा bending मशिनने मोजमाप केलेल्या रेषेवर पत्रा bend करून घ्यायचा. आता हान्डेल बनवण्यासाठी मोजमाप करून पत्रा कापून त्याला bend करून घ्यायचे व दोघांना रेबिटच्या मदतीने जोडायचे ज्याच्याने तुमची सुपली तयार होईल.

आम्ही केलेल्या सुप्लीचा फोटो :-

२. मापन उपकरणे

आज मी तुम्हला मापन पद्धती व मापनाच्या प्रकर बद्दल माहिती देणार आहे.

मापनासाठी आपण पट्टी, मेजरिंग टेप, वजन काटा इ. उपकरणांचा वापर करतो.

मापनाच्या एकूण दोन पद्धती आहेत १) ब्रिटीश पद्धत २) मॅट्रिक पद्धत

१] ब्रिटीश पद्धत :- आधीच्या काळात जेव्हा ब्रिटिशांनी आपल्यावर राज केलेले तेव्हा ते काही मापनाच्या पद्धती वापरायचे म्हणून या पद्धतीचे नाव ब्रिटीश पद्धत पडले.

उदा.) फूट, इंच, मन, खंडी, नग, आणे, शेर इ.

2] मॅट्रिक पद्धत :- जेव्हा भारत स्वतंत्र झाला