Powder Coating (पावडर कोटिंग) : पावडर कोटिंग ही धातूच्या वस्तूंवर संरक्षणात्मक आणि आकर्षक थर देण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत द्रवरूप पेंटऐवजी बारीक पावडरचा वापर केला जातो. पावडर इलेक्ट्रोस्टॅटिक पद्धतीने वस्तूच्या पृष्ठभागावर फवारली जाते आणि नंतर वस्तूला ओव्हनमध्ये ठरावीक तापमानावर गरम केले जाते. त्यामुळे पावडर वितळून वस्तूवर मजबूत आणि एकसारखा थर तयार करते.
Powder coating प्रक्रिया : सर्वप्रथम कोटिंग करावयाच्या धातूच्या वस्तूची स्वच्छता केली जाते. वस्तूवरील धूळ, तेल, ग्रीस, गंज आणि इतर अशुद्ध पदार्थ काढून टाकले जातात. त्यानंतर वस्तू पूर्णपणे कोरडी केली जाते.
पुढे पावडर कोटिंग गनच्या साहाय्याने पावडर वस्तूच्या पृष्ठभागावर फवारली जाते. इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जमुळे पावडर धातूच्या पृष्ठभागाला चिकटते. त्यानंतर वस्तूला curing oven मध्ये योग्य तापमानावर गरम केले जाते. पावडर वितळून पृष्ठभागावर मजबूत आणि गुळगुळीत थर तयार करते. शेवटी वस्तू थंड करून कोटिंगची गुणवत्ता तपासली जाते.
पावडर कोटिंगचे फायदे :
- गंजापासून संरक्षण मिळते.
- पृष्ठभाग मजबूत आणि टिकाऊ होतो.
- वस्तूला आकर्षक रंग मिळतो.
- कोटिंग एकसारखे होते.
- योग्य पद्धतीने केल्यास कोटिंग दीर्घकाळ टिकते.
- धातूच्या वस्तूंचे आयुष्य वाढण्यास मदत होते.
- उपयोग : लोखंडी गेट, खिडक्या, वाहनांचे पार्ट्स, फर्निचर, मशीनचे पार्ट्स आणि विविध धातूच्या वस्तूंवर पावडर कोटिंग केले जाते.

