आलेपाक तयार करणे

साधन :

गॅस , कढई , ताट  , पक्कड , वाटी , चाकू , मिक्सर , उलाथन 

साहित्य: 

  • आले सोलून व चिरून – १०० ग्रॅम . 
  • गुळ – २०० ग्रॅम . 
  • इलायची पावडर – ५ ग्रॅम 
  • साजूक तूप – १ छोटा चमचा ( ५ ग्रॅम ) 

कृती :

१) बारीक केलेले आले व कापलेला गुळ मिक्सरमध्ये गुळगुळीत बारीक वाटून घ्यावे . 

२) एक ताट घेऊन त्याला तूप लावून घेणे .

एक जाड बुडाच्या किंवा नॉन – स्टिक पॅनमध्ये वाटलेले आले , गूळ आणि आलं पेस्ट एकत्र करा . 

३) मंद आचेवर गॅस वर ठेऊन सतत हलवत रहा . हळूहळू गूळ विरघळून घट्ट होऊ लागेल . त्यात इलायची पावडर घालावी . 

४) लक्षपूर्वक हलवत रहा . मिश्रण भांड्याच्या कडेपासून सुटू लागेल . याचा अर्थ ते व्यवस्थित तयार झाले . गॅस बंद करावा .

५) मिश्रण ताटात घेऊन एका वाटीला खालच्या बाजूने तूप लावून मिश्रण ताटात एक सारखे पसरून घ्यावे . 

६) चाकुच्या मदतीने चौकीनी काप करून घ्यावे . थंड झाल्यावर त्याच्या वडया कराव्यात . 

७) सर्व वड्या एक स्वच्छ हवा बंद बरणीत भरून ठेवावे . 

आले वडी शरीराला होणारे फायदे : – 

  1. सर्दी खोकल्यावरील गुणकारी औषध म्हणून प्रचलित आहे.
  2. कफ नाशक , पित्त नाशक म्हणून गुणकारी आहे . 
  3. पचन क्रिया सुधारण्यासाठी उपयोगी ठरते . 
  4. भूक वाढवण्यास मद्दत करते . 
  5. अपचन , करपट ढेकर जिभेला चव नसणे यावर आले पाक वडया उपयुक्त ठरतात . 
  6. आयर्न जास्त प्रमाणात मिळते . 
  7. तापावर सुद्धा आले पाक गुणकारी ठरते .