साहित्य = आवळे, जिरी, हिंग, ओवा, मीठ काळे मीठ, काळीमिरी इ.
कृती = पहिल्यांदा आवळे निवडून घेतले. व खराब बाजूला काढले. नंतर एका टोपामध्ये पाणी घेऊन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवले. नंतर मग चांगले आवळे त्या पाण्यामध्ये घातले. आवळे उकडून घेतले. उकडल्यानंतर ते काढून एका टोपामध्ये घेतले. व गार पाणी घातले. मग आम्ही त्यामधील बिया काढल्या.व त्याच्या फोडी करून घेतल्या. नंतर मग सुरीने त्याचे तीन तुकडे करून घेतले. नंतर त्याला मीठ लावून घेतले. रात्रभर मीठ लावून ठेवले. सकाळी आम्ही जिरी,ओवा व काळी मिरी गरम करून घेतली. नंतर ते मिक्सर मध्ये बारीक करून त्याची पावडर बनवून घेतली. नंतर मग आम्ही त्या आवळ्याच्या फोडींमध्ये हिंग, जिरी, ओवा,काळीमिरी व काळ मीठ हे सर्व साहित्य मिक्स केले. मग ते दिवसभर झाकून ठेवले. नंतर संध्याकाळी ड्राय ला ठेवले जोपर्यंत ड्राय होत नाही, तोपर्यंत ठेवले. नंतर ड्राय झाले व मग पॅकिंग करून ठेवले.
कॉस्टिंग =