साहित्य = 1. भगर 300 gm

. 2. साबुदाणा 60 gm

. 3. मीठ 8 gm

4. शेंगदाणा कूट 44 gm

5. दही 25 gm

6. मिरची 6 gm

कृती = इडली बनवण्यासाठी एक कप प्रीमिक्स घेतले. ते आम्ही एका बाऊलमध्ये घेतले नंतर एक कप पाणी घातले. मग दही तीन चमचे घातले. नंतर सोडा हा टीस स्पून घालून चांगले ढवळून घेतले. चांगले मिक्स केल्यावर दहा मिनिटे झाकून ठेवले. नंतर गॅसवर एका टोपामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले. मग इडलीच्या पात्रामध्ये ते मिश्रण ओतून घेतले. ते झाल्यावर ते पात्र टोपामध्ये ठेवले. वरून झाकण ठेवले. नंतर दहा ते पंधरा मिनिटाने इडली तयार झाली.

कृती = आप्पे बनवण्यासाठी प्रिमिकस मिश्रण एक कप घेतले. भगर व साबुदाणा मिश्रण एका बाऊलमध्ये घेऊन त्यामध्ये चार ग्रॅम मीठ घातले. व त्यामध्ये दही पाऊण कप, दोन मिरच्या बारीक करून घेतल्या नंतर शेंगदाणा कूट हे 20 ग्रॅम घालून चमच्याने मिक्स केले. नंतर ते मिश्रण दहा मिनिटे झाकून ठेवले. दहा मिनिटं झाल्यावर अप्पेचे पात्र हे गॅसवर थोडे गरम करून घेतले. नंतर त्या पात्राला तेल लावून घेतले. व त्यामध्ये मिश्रण घालून घेतले. व वरून झाकण ठेवले. मग चमच्याने उलटेपालटे केले. थोडासा लालसर रंग आल्यावर काढून घेतले. मग तयार झाले आमचे आप्पे.

कॉस्टिंग =