पोलिहाऊस मालकाचे नाव= जयेश धायेकर आणि चेतन घारे

मी तेथे गेल्यानंतर त्यानी जीप्सो फुलाचे पीक घेतले होते. त्यानंतर आम्ही फुले कशी हारवेस्ट करायची हे पाहून फुले हारवेस्ट करायला सुरवात केली.

फुले हारवेस्ट करताना फुलाची काडी दोन बोटे वर तोडावे यामुळे तेथील फांदी पुन्हा चांगली फुटते व मुळाला धक्का बसत नाही.

त्यानंतर फुले पॅकिंग कशी करायची पाहून 400gm चे बंच रबर ने बांधून त्याच्यावर पिशवी घातली त्यानंतर ती फुलांचे बंच मोठया बादल्या मध्ये पाणी भरुण २० बंच बादलीत ठेवले यामुळे फुले टवटवीत राहतात.

फुलांच्या पानावर बुरशी सारखा आजार येतो त्याला भुरी असे म्हणतात त्यासाठी नेटीओ नावाचे औषध फवारणी केली. त्यानंतर सर्व फुले संपल्यानंतर झाडे मुळा पासून थोडेसे वरती सर्व कट केली त्यानंतर बेड साफ करून त्यावर निंबोळी खत / 13/34/13 ही खत टाकून भेसळ डोस दिला.

त्यानंतर नवीन पॉलिहाऊस च्या ठिकाणी जाऊन खत पांगवले व ट्रॅक्टरने

फन पाळी घातली.

अर्धा एकर क्षेत्राचा अंदाजे खर्च

कामाचे स्वरूप अदांजे खर्च
१) पॉलिहाऊस भाडे12000
२) बेड तयार करणे5000
३) खत व फवारणी20000
४) रोपे विकत घेणे10000
५)लागवडीचा खर्च8500

हार्वेस्टिंग चा अंदाजे खर्च

बंच उत्पादन
पहिली हार्वेस्ट1000000
दुसरी हार्वेस्ट600000
तिसरी हार्वेस्ट2000000