स्टार्टर (Starter)
स्टार्टरSTARTER म्हणजे काय?
स्टार्टर हा इलेक्ट्रिक मोटर सुरक्षितपणे सुरू (Start) करण्यासाठी वापरला जाणारा विद्युत उपकरण आहे. तो मोटरला जास्त करंट, शॉर्ट सर्किट व ओव्हरलोडपासून संरक्षण देतो.
१. प्रस्तावना :
विज्ञान आश्रममध्ये इलेक्ट्रिकल कोर्स करत असताना आम्ही जुनी मोटर व स्टार्टर यांचे कार्य, भाग, कनेक्शन व वायरिंग प्रत्यक्ष प्रॅक्टिकलद्वारे शिकलो. स्टार्टरमुळे मोटर सुरक्षित व नियंत्रित पद्धतीने सुरू होते हे समजले.
२. उद्देश :
- स्टार्टरचे कार्य समजून घेणे.
- स्टार्टरमधील भाग ओळखणे.
- मोटर–स्टार्टर कनेक्शन व वायरिंग शिकणे.
- बिघाड शोधून दुरुस्ती करणे.
३. कृती :
- वीजपुरवठा बंद केला.
- स्टार्टर उघडून कॉन्टॅक्टर, ओव्हरलोड रिले, पुश बटण तपासले.
- मोटरच्या टर्मिनल बॉक्समध्ये वायरिंग तपासली.
- सैल/जळालेले कनेक्शन दुरुस्त केले.
- योग्य कनेक्शन करून चाचणी घेतली.
४. निरीक्षण :
- सैल कनेक्शनमुळे मोटर सुरू होत नव्हती.
- ओव्हरलोड रिले चुकीच्या सेटिंगवर होते.
- दुरुस्तीनंतर मोटर सुरळीत सुरू झाली.
५. निष्कर्ष :
या प्रॅक्टिकलमधून स्टार्टरचे महत्त्व, भाग, वायरिंग व संरक्षण पद्धती समजल्या. मोटर सुरक्षितपणे सुरू करण्याचे ज्ञान मिळाले व आत्मविश्वास वाढला.
तर आम्ही स्टार्टर्स रिले व पट्ट्या चेंज केल्या होत्या
| टोटल खर्च | 920 |
| मजुरी | 120 |
| TOTAL= | 1040₹ |