1) कृत्रिम श्वसन
उद्देश ~ कृत्रिम श्वसन मध्ये शेफिएअर आणि सिलव्हिस्टर या दोन पद्धतीचे कार्य कसे करायचे.
साहित्य ~ चटई, दोन स्वयंसेवक, मार्गदर्शक
उपयोग ~ जेव्हा एखाद्या व्यक्तीला करंट लागतो त्या वेळेस या दोन पद्धतीचा वापर केला जातो.
१) सेफीएअर पद्धत~ जेव्हा एखाद्या व्यक्तीला पाठीच्या मागे करंट लागलेला असतो. अश्या वेळेस या पद्धतीचा वापर करतात.
२) सिलव्हिस्टर पद्धत~ जेव्हा एखाद्या व्यक्तीला समोरच्या बाजूने करंट लागलेला असतो. अश्या वेळेस या पद्धतीचा वापर करतात.


2) इलेक्ट्रिकल टूल्स आणि सेफ्टी
उद्देश~ इलेक्ट्रिकल लॅबमध्ये वापरले जाणारे सर्व टूल्स बद्दल माहिती घेणे,त्याचा उपयोग कोणकोणत्या ठिकाणी होतो याची माहिती घेणे. टूल्स वापरताना कोणती काळजी घ्यावी लागते, स्वतःचे सेफ्टी कशी घ्यायची .
इलेक्ट्रिकल टूल्स ~ पकड,टेस्टर,स्क्रू ड्राइव्ह,टेप,हात मोजे,स्ट्रिपर,हातोडी,ओळंबा,पॉवर ड्रिल,कटिंग प्लायर इयतादी
इलेक्ट्रिकल टूल्स वापरताना घ्याची काळजी १) काम करताना टूल्स जपून वापरने.
२) काम झाल्यावर टूल्स घेतलेल्या जागेवर परत ठेवणे .
इलेक्ट्रिकल काम करताना घ्याची काळजी १) ज्या ठिकाणचे काम करणार आहोत त्या ठिकाणचे माहिती नसल्याशीवाय काम करू नये .



3) डिझेल इंज़िन
उद्देश~ विज्ञान आश्रमातील जनरेटर मधील इंजिनचे कार्य कसे चालते हे पाहणे.
साहित्य ~ इंजिन जनरेटर, इंजिन जनरेटर बद्दल माहिती सांगणारे मार्गदर्शक.
डिझेल इंजिनचे कार्य कसे चालते?
डिझेल इंजिन हे एक मशीन आहे जे इंधनाच्या रासायनिक ऊर्जेचे यांत्रिक उर्जेमध्ये रूपांतर करते.चे ऊर्जा रूपांतरण डिझेल इंजिन खालील चार टप्प्यांतून किंवा प्रक्रियेतून जाणे आवश्यक आहे: सेवन प्रक्रिया, सिलेंडरमधील ताजी हवा;कॉम्प्रेशन प्रक्रियेत, सिलेंडरमध्ये शोषलेली हवा त्याचे तापमान आणि दाब वाढवण्यासाठी संकुचित केली जाते;विस्तार कार्याच्या प्रक्रियेत, इंधन सिलेंडर गॅसमध्ये इंजेक्ट केले जाते जे संकुचित केले गेले आहे आणि तापमान इंधन उत्स्फूर्त ज्वलन तापमानापर्यंत पोहोचते आणि इंधन त्वरीत हवेत मिसळले जाते आणि तीव्रपणे जाळले जाते;एक्झॉस्ट प्रक्रियेत, एक्झॉस्ट गॅस जो बर्न झाला आहे आणि काम केले आहे तो सिलेंडरमधून सोडला जातो.खालील तपशीलवार वर्णन आहे:




4) बेसिक इलेक्ट्रिकल सीमबॉल
उद्देश्= बेसिक इलेक्ट्रिकल सीमबॉल कोणत्या ठिकाणी वापरले जातात आणि त्यांचे कार्य काय असते ते समजून घेणे.
साहित्य= मोबाईल,इलेक्ट्रिक कोंपोनंटस,
उदा= बलबचा सीमबॉल,बॅटरी सीमबॉल,डायोड सीमबॉल,निगेटिव सीमबॉल,पोजीटीव सीमबॉल इत्यादि



5) वायर गेज
उद्देश = वायर ची जाडी किती आहे ते वायर किती करंट वाहते हे पाहणे.
साहित्य=वायर गेज, स्ट्रिपर, वायर.
वायर गेज म्हणजे वायरचे गेज त्याच्या जाडीच्या संदर्भ देते. एका संख्येद्वारे दर्शिविला जातो. ज्यामध्ये लहान संख्या जाड वायर गेज दर्शविते आणि उच्च संख्या पातळ वायर दर्शवतात.हे वायर सुरक्षित पणे वाहून नेणारे विद्युत प्रवाहाचे प्रमाण तसेच त्याच्या विद्युत प्रतिकार आणि वजन निर्धारित करते.

6) सूक्ष्म मापी
उद्देश= कोणत्याही वायरचे व्यासाचे जाडी मोजण्यासाठी याचा उपयोग होतो.
साहित्य= सूक्ष्म मापी, वायर स्ट्रीपर इत्यादी.
सूक्ष्म मापीचा उपयोग बारीक तारेचा व्यास किंवा धातूच्या पत्र्याची जाडी अचूकपणे मोजण्यासाठी वापरले जाते. सर्वात छोटी म्हणजे ज्याचे परिमान 0.01mm इतके लहान आकाराच्या छोट्या वस्तूचे मोजमाप काढू शकतो.

7) पर्जन्यमापक
उद्देश= पावसाळ्यामध्ये पाऊस किती पडला आहे याची मिलिमीटर मध्ये मोजमाप कशा पद्धतीने केले जाते हे शिकणे.
साहित्य= पर्जन्यमापक हे एक साधन आहे ज्याचा वापर हवामानशास्त्रज्ञांनी द्रव पर्जन्य गोळा करण्यासाठी आणि मोजण्यासाठी केला आहे – पाऊस आणि बर्फ. पर्जन्यमापकांना udometers आणि ombrometers असेही म्हणतात. पर्जन्यमापक
स्वयंचलित किंवा मॅन्युअल असते.


8) मोबाईल ॲप
उद्देश=मोबाईलच्या साह्याने हवामानातील तापमान पर्जन्यमान इत्यादींचे ऑनलाईन समजून घेणे.
साहित्य= मोबाईल इंटरनेट आणि लॅपटॉप इत्यादी
जर ऑनलाईन तापमान प्रचंड मन आणि हवेच्या दिशेतील बदल याची माहिती आम्ही इलेक्ट्रिकल मध्ये बसून कशा पद्धतीने ऑनलाईन घेता येईल याची माहिती सरांनी आम्हाला दिले.
विज्ञान आश्रमातील हवामान विभागातील जे पर्जन्यमापक आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन त्यावेळेस चे तापमान, पर्जन्यमान आणि हवेचे दिशा इत्यादींचे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन प्रॅक्टिकल केले त्यानंतर परत ऑनलाईन पडताळणी केली दोघातील फरक समजून घेतला.
9) प्लग पिन टॉप पीन ला जोडणे
उद्देश= प्लग पिन टॉप पिन ला कशा पद्धतीने जोडणी केली जाते हे शिकणे.
साहित्य= प्लग पिन,3 पीन, वायर बोर्ड,टेस्टर, इंशुलेशन टेप इत्यादि.
याची जोडणी कशी केली जाते तर प्रथम साहित्य व साधने गोळा केली. त्यानंतर प्लगची लाईन पिन ला दिली. मेन लाईनची लाईन पिणला जोडली. व न्यूट्रल प्लगच्या न्यूट्रल ला दिले. करंट देऊन टेस्टर च्या साह्याने चेक केले.
Live आणि neutral हे दोन वायर एल आणि एन लाच द्यावे. करंट चेकिंग करताना सावधानी बाळगावी.


10) उपकरण सॉकेट ला जोडणे
उद्देश= कोणत्याही विद्युत उपकरणाचे जोडणे सॉकेटला करणे.
साहित्य=स्त्रीपर, टेस्टर, थ्री पिन,थ्री कोर केबल, सॉकेट, इन्सुलेशन टेप, वायर.
याची जोडणी करताना सुरुवातीला स्ट्रिपरच्या सहाय्याने वायर एक सेंटीमीटर एवढा छीलून घेणे. थ्री पिन च्या न्यूट्रल, लाईव्ह, आर्थींग नुसार वायर ची जोडणी करणे. थ्री पिन सॉकेट पूर्णपणे फिटिंग करून घेणे. यानंतर उपकरणाची पिन सॉकेटला जोडणे.
उदा = 16 एंपियर चा बोर्ड तयार केला, सोईल लॅब मध्ये फ्रिज साठी पॉवर पॉइंट बसवला.

11) वीज बिल
उद्देश= घरातील आणि आजूबाजूच्या घरांमधील किंवा दुकान अश्या ठिकाणचे वीज बिल कसे काढायचे असते हे शिकणे.सही
साहित्य=मीटर,टेस्टर, मोबाईल,जुनी वीज बिल पावती.
वीज बिल मोजायचे एकक युनिट आहे.1000 w व्याट मंजे 1युनिट.
जर कोणतेही एखादे उपकरण जर 1तास चालविला तर 1 युनिट वीज खर्च होते.
वीज बिल काढायचे सूत्र=वॉट× नग× तास/1000
12) प्लेट अर्थिंग करणे
उद्देश=अर्थिंग करणे.
साहित्य= अर्थिंग प्लेट,1mm ग्रीन वायर, टिकाव, खोऱ्या, स्ट्रिपर, मल्टीमिटर, टेस्ट लॅम्प, टेस्टर, कोळसा, मीठ वीट, पाणी इत्यादी.
कृती= 1)प्रथम ज्या ठिकाणी आर्थिक करायचे आहे त्या ठिकाणचे जागा स्वच्छ करून घेणे अर्थिंग साठी जागा आखणी करणे. 2)आखणी केलेल्या जागेचे तीन ते चार फिट खोल खड्डा करून घेणे. 3) अर्थिंग प्लेटला व जय पाईपची जोडणी योग्य पद्धतीने केली पाहिजे. 4)अर्थिंगला ग्रीन कलरची वायर जॉईंट केले. अर्थिंग प्लेटला खड्ड्यामध्ये उभे ठेवले यामध्ये अर्थिंग पावडर टाकली. 5)साईडने विटांचा थर लावला व खड्डा पूर्णपणे मातीने भरून घेतले त्यानंतर प्लेट अर्थिंगला पाईपच्या सहाय्याने 30 लिटर पाणी नरसाळ्याच्या साह्याने ओतले.
अर्थिंग दोन प्रकारच्या असतात 1) प्लेट अर्थिंग.
2) पाईप अर्थिंग
करंट लिकेज पासून होणाऱ्या धोक्यापासून संरक्षण मिळणे आणि उपकरणाचे नुकसान कमी होण्यासाठी अर्थिंग करण्यामागचा उद्देश असतो.




13) बायोगॅस
उद्देश= बायोगॅस कशाप्रकारे मिथेन आणि कार्बन वायू निर्माण करण्याचे कार्य कसे चालते हे समजून घेणे.
साहित्य=ताज सेन, पाणी, मीटर टेप, कॅल्क्युलेटर, इत्यादी
बायोगॅस म्हणजे जैविक प्रक्रिया मधून बाहेर पडणारा वायू जर एखादी जैविक प्रक्रिया ऑक्सिजन विरहित वातावरणात झाली तर बायोगाची निर्मिती होते. सेंद्रिय पदार्थाचे जिवाणू द्वारे हवा विरहित अवस्थेत झालेल्या विघटनानंतर निर्माण होणारे वायू साठवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साधनास बायोगॅस संयंत्र म्हणतात.
बायोगॅस वायूमध्ये मिथेन 55 टक्के ते 70 टक्के आणि कार्बन डाय-ऑक्साइड 30ते 40 टक्के अल्प प्रमाणात नायट्रोजन व हायड्रोजन सल्फाईड या वायूंचा समावेश असतो यातील मिथेन हा वायू ज्वलनशील आहे कोणत्याही प्रकारचे टाकाऊ पदार्थ जे कुजतात त्यांच्यापासून बायोगॅस तयार होतो.
बायोगॅस मेंटेनेस=बायोगॅस मध्ये दररोज 21 केजी सेन आणि 21 लिटर पाणी याचे मिश्रण तयार करावे लागते. ज्या पायपातून वायू बाहेर पडतो ते पाईप पाटील आठवड्यातून दोन वेळेस पाणी बाहेर सोडावे आणि स्लरी बाहेर काढावे दररोज.




14) शोष खड्डा
उद्देश=शोषखड्डा मध्ये जे दैनंदिन पाणी वापरून अस्वच्छ झालेले पाणी उदाहरणात आंघोळीचे, कपडे धुण्याचे या सर्वांचे पाणी एकत्र करून एका खड्ड्यामध्ये मुरवणे.
साहित्य=हटिकाव,घमेले, पार, मीटर टेप, फक्की, विटांचे तुकडे, जाड वळू, मोठे दगड, कोळसा, माती, व सिमेंटचे 5 फुटाचे टाकी इत्यादी.
शोष खड्ड्याचे उपयोग 1) शोष खड्ड्यापासून रोगराई पसरत नाही.2) सुस खड्ड्यामध्ये सोडलेले पाणी पुनर्वापर करता येतो.3) सोच खड्ड्यामुळे आजूबाजूचे परिसर किंवा वातावरण सुंदर आणि स्वच्छ असते. शोषखड्ड्यापासून अस्वच्छ पाणी स्वच्छ झालेले हे पाणी आपण झाडांना वापरू शकतो.
कृती=ज्या ठिकाणी सांडपाणी सोडले जाते त्या ठिकाणी शोषखड्डा बांधले पाहिजे. त्या ठिकाणी शूज खड्डा खोदण्यासाठी आखणी करून घेणे. खड्डा हा सात फुटाचा असला पाहिजे. खड्डा पूर्ण झाल्यानंतर खड्ड्याच्या सर्वात खालच्या बाजूला मोठे आकाराचे दगड टाकले पाहिजे. त्यानंतर छोटी दगड टाकले पाहिजे. त्याच्यावरती लहान आकाराचे वाळू आणि मातीचे थर टाकले पाहिजे. परत त्याच्यावरती कोळसाचा थर असला पाहिजे त्यानंतर या कोळशाच्या थरावरती पाच फुटाचा सिमेंट टॅंक उभा करून घेतला पाहिजे सिमेंट टॅंक होती दगडांचे थरचले पाहिजे. जिथून अस्वच्छ पाणी ते तिथून पायपाच्या साह्याने शोशखड्डे पर्यंत ते पाणी आणले पाहिजे. हे पाणी शोश खड्डा मध्ये सोडले पाहिजे.


15) केबल इन्सुलेशन काढणे
उद्देश= कोणत्या पद्धतीने आणि कशाप्रकारे आणि किती सेंटीमीटर केबल इन्सुलेशन काढले पाहिजे हे शिकणे.
साहित्य= केबल, चाकू,स्ट्रीपर इत्यादी
जॉईंट देण्यासाठी जास्तीत जास्त तीन सेंटीमीटर का केबल छिलून घेतला पाहिजे.
एखाद्या उपकरणात कनेक्शन देताना कमीत कमी 1 सेंटीमीटर एवढा केबल छिलुन घेतली पाहिजे.
16) बॅटरीच्या पाण्याची घनता मोजने
उद्देश=बॅटरीच्या पाण्याचे घनत्व मोजणे.
साहित्य=हायड्रोमीटर, बॅटरी, डिस्टिल्ड वॉटर इत्यादी
कृती=1)बॅटरी पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावी. 2)नंतर बॅटरीच्या पृष्ठभागावरील जे पॉईंट असतात ते ओपन करावे.3) त्यानंतर त्यामधील पाण्याची घनता हायड्रोमीटर च्या साह्याने तपासावी. जर हायड्रोमीटरचे पाणी लाल रंगापर्यंत गेले तर ते बॅटरी खराब झाली असं समजायचे जर पिवळा रंग किंवा निळ्या रंगावर पाणी येऊन थांबल्यास तर बॅटरीची आरती क्षमता संपली आहे आणि हिरव्या रंगावर पाणी असेल तर बॅटरीचे अजून चांगले असे समजले जाते.




17) सौर पॅनलचे व्यवस्थापन
उद्देश=सोलर पॅनल व्यवस्थित निवडता येणे व सोलरची जोडणी व त्याची वीज बनवण्यापर्यंतची पद्धत समजून घेणे.
साहित्य=सौर पॅनल,मल्टीमीटर, बॅटरी, सोल्डरिं गन इत्यादि मटेरियल.
कृती=सौर पॅनल उभारण्यासाठी आधी सौर पॅनलची निवड करणे. या सर्व पॅनलवर किती लोड देणार आहे याची यादी काढणे आवश्यक आहे. सौर पॅनलची निवड झाल्यावर त्याची जूळणी करणे व त्याला उभारणे हे गरजेचे आहे ते पॅनल किती किलो वॅट ऊर्जा निर्माण करते ते माहिती असणे गरजेचे आहे निर्माण झालेली सौर ऊर्जा हे बॅटरीमध्ये साठवून ठेवावे.
सोलर पॅनलचे नियोजन कसे करावे. 1)योग्य सोलर पॅनल निवडणे योग्य बॅटरी निवडणे कनेक्शन व्यवस्थित जागी जोडणे.2) अर्थिंग व्यवस्था असणे गरजेचे आहे त्यानंतर सगळे सौर पॅनल जोडणे झाल्यानंतर त्याची महिण्यातून दोन वेळेस स्वच्छता करण्याची गरज आहे.


18) सौर कुकर
उद्देश=अन्न शिजवण्यासाठी सौर कुकर कसा वापरला जातो असे समजून घेणे.
साहित्य=सौर,कुकर, थर्मामीटर, पाणी, तांदूळ इत्यादि.
कृती= 1) सोलर कुकर चे काचेचे झाकण आणि आरशाची योग्य व्यवस्था करा आणि थेट सूर्यप्रकाशात ठेवा सोलर कुकरमध्ये काळा भांड्यात शिजवायचे अन्न ठेवा आणि योग्य प्रमाणात पाणी घाला.2)काळे भांडे बंद करून बॉक्समध्ये ठेवा आणि कुकरचे झाकण बंद करा.3) काच मध्ये थर्मामीटर व दर पंधरा मिनिटांनी चेक करा.
हेतू = हे सौर कुकरची प्रक्रिया केल्याने आम्हाला कळले की बिना इंधनाचा वापर करून अन्न शिजवता येतो.

19) निर्धुर चूल
उद्देश=चुलीतून जास्त धूर निघतो का नीर्धुर चुलितून जास्त धूर निघतो यांच्यातील फरक जाणून घेणे.
साहित्य= निधुर चूल, माचिस, लाकुड, इत्यादि.
कृती=सर्वप्रथम नेतृत्व कार्य व महत्त्व समजून घेणे नंतर यामध्ये लाकूड टाकून आग लावली व त्यावर.
निर्दोष चे फायदे निवृत्ती चुलीमुळे आपल्याला धुराचा त्रास होत नाही इंधन लाकूडची बचत होते पुढच्या वाया जात नाही ज्वलन व्यवस्थित होते शोषणाचे आजार कमी होतात
निरीक्षण=निर्धर लीतून कमी धूर निघतो असे समजले.

प्रोजेक्ट
प्रोजेक्टचे नाव:Wire Fitting (वायर फिटिंग)
उद्देश : वायर फिटिंग शिकणे
साहित्य : पट्टी , वायर , स्प्रिंग, पाईप , ड्रिल मशीन, स्क्रू , राहूल प्लग,
स्ट्रिपर , स्क्रू ड्रायव्हर , टेस्टर , सेलो टेप ,
मी केलेले काही काम 1)शिवमुद्रा हॉटेल मध्ये वायर फिटींग व कल्सिंग वायरिंग केली.
शिवमुद्रा हॉटेल मध्ये आम्ही पट्टी फिटिंग शिकलो ,कल्सिंग वायरिंग केली.
2) मेमोरियल हॉलमध्ये आम्ही केसिंग पट्टी फिटींग केली. वायर ओढून ईनव्हरटर कनेक्शन केले.
कशी करायची त्याला लागणारे साहित्य या सर्वांची माहिती घेतली व कल्सिंग वायरिंग
करायला शिकलो.
आम्ही तिथे ऐकून १)२३ पट्ट्या मारले
२) ८ आरपार होल पाडले
३) कल्सिंग वायरिंग साठी पाइप घातले व त्यातुन पॉइंट काढून दिले
४) व पाईप मधून वायर ओढले
५) बोर्ड साठी पॉइंट काढले
प्रोजेक्ट मधून काय शिकलो : आम्ही या प्रोजेक्ट मधून वायर फीटिंग कशी करावी हे शिकलो
वायर फिटिंग करताना घायची काळजी,
कल्सिंग वायरिंग कशी करावी त्यला किती खर्च येतो याचा अंदाज कळलं





अ. क्रमांक | वस्तूचे नाव | नग | दर | किमत | |
1) | 16 ah बोर्ड | 2 | 250 | 500 | |
2) | 6 ah बोर्ड | 1 | 100 | 100 | |
3) | LED 20 watt बल्ब | 1 | 220 | 220 | |
4) | केसिंग पट्टी | 3 | 50 | 150 | |
5) | 6 ah बोर्ड | 1 | 40 | 40 | |
6) | 1.5 mm वायर | 18 मिटर | 25 | 450 | |
7) | 2.5 mm वायर | 21 मीटर | 30 | 630 | |
8) | 35*8 स्क्रू | 25 | 1 | 25 | |
9) | 35*8 रावळ प्लग | 25 | 10 | ||
10) | वायर टेप् | 1 | 20 | 20 | |
मटेरियल खर्च | 1942 | ||||
मजुरी | 420 | ||||
लाईट फिटींग साठी लागलेला एकूण खर्च | 2365 |