अझोला उत्पादन करणे (Azolla Production Practical)

2. उद्देशअझोला तयार करून त्याचा पशुखाद्य म्हणून वापर करणे आणि कमी खर्चात पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध करून देणे.

3. आवश्यक साहित्य प्लास्टिक/ताडपत्रीबांबू किंवा विटा माती शेणखत सुपर फॉस्फेट‌ पाणी ताजे अझोला कल्चर बादली/फावडे

4. अझोला बेड तयार करण्याची पद्धत सावलीची जागा निवडावी.साधारण 2 मी × 1 मी आकाराचा बेड तयार करावा.बेडमध्ये प्लास्टिक ताडपत्री अंथरावी.त्यात सुमारे 10–15 सेमी पाणी भरावेपाण्यात चांगले कुजलेले शेणखत मिसळावेथोडे सुपर फॉस्फेट टाकावेपाण्यात अझोलाचे कल्चर सोडावे.बेडवर थेट सूर्यप्रकाश पडू देऊ नये

.पाण्याची पातळी योग्य ठेवावी आणि आवश्यकते नुसार पाणी भरावे.

5. अझोला काढण्याची पद्धतअझोला साधारण 10–15 दिवसांत चांगला वाढतो. जाळी/टोपलीच्या साहाय्याने अझोला पाण्यातून काढावा आणि स्वच्छ पाण्याने धुवून पशुखाद्यात मिसळावा.

6. अझोलाचे फायदेपौष्टिक हिरवा चारा म्हणून उपयोगी.जनावरांच्या खाद्याची किंमत कमी करण्यास मदत.प्रथिनांचा चांगला स्रोत.गाई, म्हशी, शेळ्या आणि कोंबड्यांना पूरक खाद्य म्हणून वापरता येतो.कमी जागेत उत्पादन घेता येते.जलद वाढणारा वनस्पतीजन्य चारा आहे.

7. काळजीबेडमध्ये पाणी साचलेले व स्वच्छ असावे.अतिउष्ण सूर्यप्रकाश टाळावा.कुजलेले/दुर्गंधीयुक्त साहित्य वापरू नये.नियमितपणे अझोला काढून बेडची देखभाल करावी.