साहित्य = गव्हाचे पीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, कंडेन्सड मिल्क, पिठीसाखर, बटर, पाणी, दूध, व्हॅनिला इसेन्स, टुटी फ्रुटी इ.

कृती = पहिल्यांदा आम्ही गव्हाचे पीठ हे 140 ग्रॅम घेतले. नंतर त्यामध्ये पिठीसाखर पाच ग्रॅम घेतली. नंतर ब्रेकिंग सोडा 1/2 tsp व ब्रेकिंग पावडर हे 1+1/2 tsp घातले. मग ते चाळणीने चाळून घेतले. मग एका पात्रामध्ये कंडेन्सट मिल्क 200 ग्रॅम घेतले. व त्यामध्ये बटर unsalted हे 70 ग्रॅम घेतले. मग त्यामध्ये व्हॅनिला इंसेस वन टीस्पून घातले. मग हे सर्व हॅन्ड बिटर ने चांगले मिक्स करून घेतले. एका साईडने हलवून घेणे. मग नंतर हे मिश्रण गव्हाचे पीठ, बेकिंग सोडा, पिठीसाखर, बेकिंग पावडर हे चाळणीने चाळून त्यामध्ये घेणे. नंतर हॅन्ड बिटर ने मिक्स करून घेणे. नंतर मग त्यामध्ये दूध 10ml व पाणी 10ml घेतले. ते थोडे थोडे घालून स्प्याचुला ने मिक्स करून घेणे. मिश्रण चांगले तयार करून घेणे. मग नंतर त्यामध्ये टूटीफ्रूटी हे 20 ग्रॅम घालून मिक्स करणे. केक टीन घेतल. त्याला बटर लावून घेणे. व गव्हाचे पीठ थोडे लावून घेणे. मग त्यामध्ये सर्व मिश्रण घालून घेणे. थोडे सेट करून घेणे. नंतर झाल्यावर वरून टूटीफ्रूटी घालून घेणे. नंतर ओव्हन मध्ये 35 मिनिटं 180 सेल्सियस मध्ये ठेवणे.

कॉस्टिंग =