साहित्य = मैदा, पिठीसाखर, डालडा, बटरस्कच फ्लेवर, कलर इ.
कृती = पहिल्यांदा मैदा चाळून घेतले. त्याचे वजन 500 ग्रॅम करून घेतले. नंतर पिठीसाखर 400 ग्रॅम व डालडा 400 ग्रॅम घेतले. मग आम्ही गॅस चालू करून त्यावर कढई गरम करण्यासाठी ठेवली. नंतर त्यामध्ये डालडा घातले. ते वितळल्यावर एका ताटामध्ये डालडा ओतून घेतला. त्यामध्ये पिठीसाखर घातली. ती चांगली हाताने मिक्स करून घेतली. नंतर मैद्याचे पीठ घालून व बटर स्केच फ्लेवर, कलर घालून चांगले मिक्स करून घेतले. नंतर त्याचे गोल गोळे करून हाताने दाब दिला सर्व नानकटाई तयार करून आम्ही ट्रे ला तेल लावून त्यामध्ये सर्व नानकटाई ठेवली. सर्व बनवून झाल्यावर ओहन मध्ये 180 सेल्सिअस मध्ये पंधरा मिनिटे ठेवले. नंतर मग काढून घेतली. मग आमची नानकटाई तयार झाली. व पॅकिंग केली.
कॉस्टिंग =