Dec 29, 2021 | Uncategorized
Dec 29, 2021 | Uncategorized
ऊर्जा निर्मिती आणि वापराशिवाय आधुनिक समाजाचे क्षणभरही निभणार नाही. आपण वापरलेल्या विजेसाठी आपल्याला दरमहा वीज बिल भरावे लागते, घरात लागणारे तेल, स्वयंपाकाच्या वायू आणि मोटारीसाठी वापरलेल्या पेट्रोलची किंमत चुकती करावी लागते. यापैकी काही किंमत आपण प्रत्यक्ष वापरलेल्या गोष्टींची असते तर काही अप्रत्यक्षपणे वापरलेल्या गोष्टींची असते. उदाहरणार्थ एखादी वस्तू आपण बाजारात खरेदी करतो तेव्हा त्यामध्ये ती वस्तू बनण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचा खर्च आणि ती कारखान्यापासून दुकानापर्यंत आणताना लागलेल्या इंधनाचा खर्च धरलेला असतो. याशिवाय ऊर्जा निर्मिती आणि वितरणामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणाची किंमतही आपण मोजत असतो. वातावरणा (हवा, पाणी, जमीन) तील आपल्याला नको असलेला बदल म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण, अशी त्याची व्याखा करता येईल. पर्यावरणीय प्रदूषणामुळे नेमका किती आर्थिक तोटा होतो अथवा ऊर्जा निर्मिती आणि वितरणाचे नेमके आणखी कोणते तोटे आहेत हे पैशाच्या स्वरुपात व्यक्त करणे अवघड आहे. मोटारगाडीतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे मनुष्याच्या तब्येतीवर काय दुष्परिणाम होतात याची किंमत कशी करणार? कोळसा मिळवण्यासाठी खाणकाम केल्यामुळे शेतजमिनीचे नुकसान होते आणि पाण्याचे प्रदूषण होते त्याची किंमत कशी ठरवणार? समुद्रात होणाऱ्या तेलगळतीमुळे समुद्र किनाऱ्याची किती हानी झाली हे कसे योजणार? किंबहुना ऊर्जेची निर्मिती आणि वापर करताना हे दुष्परिणाम ओढवणार आणि त्याची किंमत आपल्याला भरावी तर लागणारच. प्रश्न आहे तो किती किंमत भरायची आपली तयारी आहे ?खनिज इंधनाचे धोके जगात वापरली जाणारी सध्याची जवळ जवळ सर्व ऊर्जा खनिज इंधन जाळून तयार केलेली असते. कोळसा, नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम पदार्थ ही इंधने बनवताना, त्यांची वाहतूक करताना आणि ती वापरताना अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होतात.
ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमताकोणतेही कार्य करण्यासाठी ऊर्जा हस्तांतरण होणे गरजेचे असते .ऊर्जा पासून प्रकाश ,गती , उष्णता , ध्वनी इत्यादी मिळतात .ऊर्जा आपण कॅलरी किंवा ज्युल मध्ये मोजतात .स्तितीत ऊर्जा प्रकार ग्रॅव्हिटेशनल ऊर्जा हि ऊर्जा पृथ्वीच्या ग्रॅव्हिशनल फोर्स मुळे प्राप्त झालेली असते .रासायनिक ऊर्जा अणूंच्या बांधामुळे साठवलेली ऊर्जा हि ऊर्जा पदार्थाच्या अणूंना बांधून ठेवते .अणुऊर्जा अणूंच्या केंद्रात साठवलेली ऊर्जा हि ऊर्जा इलेट्रोन , प्रोटॉन , न्यूट्रॉन .
अशा प्रकारे ऊर्जा आणि पर्यावरणाचा योग्य समतोल साधणे मनुष्याच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे.