जर्शी गाय

जर्सी गाय हा एक मध्यम आकाराचा ब्रिटिश गोवंश आहे. याचा उगम ब्रिटन मधील जर्सी बेटावर झाला असल्यामुळे या गोवंशाला जर्सी असे नाव पडले आहे. या गोवंशाच्या गाई दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. या गायी प्रत्येक वितीस स्वतःच्या वजनाच्या १० पट जास्त दूध देऊ शकतात.

गायीच्या जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये गायीच्या जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये भारतातील गायींचे वर्गीकरण त्यांच्या उपयोगितेप्रमाणे करण्यात आले आहे.

१. दुध उत्पादनासाठी – उदा. सहिवाल, रेड सिंधी, गिर, हरियाणा इ.

२. शेती कामासाठी – उदा. खिल्लारी, गवळाऊ, कांगायम, डांगी इ.

३. दुहेरी उपयोगासाठी- थारपारकर, देवणी, ओंगोल, हरियाणा यापैकी काही महत्वाच्या जातींची वैशिष्ट्ये खालील प्रकारे आहेत.

सहिवाल

सहिवालया गायीचा मूळ पंजाबमध्ये व द्क्षिण पंजाबमधील रवी नदीचे खोरे व पाकिस्तानमधील मोंटेगोमेरी जिल्हा आहे. सहिवाल गायीचा दुध देण्याचा कालावधी ३०० दिवस असून सरासरी २१०० लिटर असते. त्यांचे सरासरी आयुष्य १५ वर्षांचे असते.

गीर गाय.

गुजरात राज्यातील काठेवाडच्या दक्षिणेकडील गीर टेकड्या व जंगल हा या जनावरांचा मूळ प्रदेश होय. गायीचा दुध देण्याचा कालावधी ३०० दिवस असून सरासरी उत्पन्न २१०० लिटर व सरासरी आयुष्य १५ वर्ष असते.

खिल्लार गाय .

हा महाराष्ट्रातील लोकप्रिय गोवंशांपैकी एक असून या गोवंशाला महाराष्ट्राची शान असे म्हणतात.[२] या गोवंशात प्रांतानुसार खालील मुख्य उपजाती आहेत – काजळी खिल्लार, कोसा खिल्लार, गाजरी खिल्लार, हरण्या खिल्लार, इत्यादी. या गोवंशाच्या गायी इतर गोवंशापेक्षा कमी दूध देतात अशी समजूत आहे. पण योग्यप्रकारे पैदास केल्यास यांचे दूध कमालीचे वाढते हे सिद्ध झाले आहे. या वंशाची गाय दिवसाला ३ ते ६ लिटर दूध देते. तसेच जर मुक्तगोठा असेल आणि वासरू सोबत असेल तर यांना दिवसातून ५-६ वेळा पान्हा फुटतो. पण इतर गोवंशापेक्षा या खिल्लार गोवंशाचे दूध हे आरोग्यास उत्तम आहे. आज महाराष्ट्रामध्ये दिवसाला १० लिटर दूध देणाऱ्या देखील जातिवंत खिल्लार गाई पाहायला मिळतात.