- विभागाचे नाव – अभियांत्रिकी
- प्रकल्पाचे नाव – टेबल
- प्रकल्पाचा उद्देश – शिलाई मशीन ठेवण्यासाठी
- प्रकल्प बनवणाऱ्याचे नाव -1सुमित लोहार
. 2विशाल मधाळे
. 3ओमकार पावडे
- मार्गदर्शक- 1लक्ष्मण जाधव सर
. 2अनिल गाडे सर
- प्रकल्पाचे दिनांक 2- 6-11-24 ते 29-11-24
अनुक्रमणिका
1 उद्देश
2 साहित्य
3 कृती
4 अनुभव
5 आकृती
6 प्रात्यक्षिक खर्च
• विषय टेबल बनवणे
•उद्देश – अस्मिता भवन मध्ये मशीन ठेवण्यासाठी मला तीन टेबल्स कॉन्ट्रॅक्ट भेटले व आम्ही ते पूर्ण केले
•साहित्य –
1पाईप
2वेल्डिंग मशीन
3रोड
4कटिंग व्हील
5ग्राइंडिंग विल
6ड्रिल मशीन
7थ्री इन वन लिक्विड
8प्लायवूड
•कृती –
1 सर्वात आधी आम्ही पाईप आणले व माप घेऊन 90° व 45° कट करून घेतले
2 मग कटर मशीनच्या मदतीने कट केले
3 मग जे कट केलेले पाईप होते ते राईट अँगल लावून व्यवस्थित वेल्डिंग केले
4 मग वेल्डिंग झाल्यावर त्याला ग्राइंडर ने घासून घेतले
5 मग त्याला पॉलिश केले
6 पॉलिश करून झाल्यावर ते पावडर कोटिंग करायला नेलं
7 पहिल्या त्या पाण्याने धुतले
8 मग त्याला थोड्यावेळ सुखायला ठेवले
9 मग टेबल सुकल्यावर त्यावर थ्री इन वन लिक्विड लावले
10 लिक्विड लावताना हँड ग्लोज व मास्क घातले
11 लिक्विड लावल्यावर परत टेबल चुकायला ठेवला
12 टेबल सुकल्यावर परत त्याला धुन घेतले
13 कारण लिक्विड लावल्याने त्यावरील गंज निघून जातो
14 मग टेबल ला पावडर कोटिंग केले
15 पावडर कोटिंग झाल्यावर टेबल ओव्हन मध्ये 180°c वर ठेवले कारण हे ठेवून पावडर वितळते व चिटकून बसते
•अनुभव –
1 वेल्डिंग करताना टेंपरेचर किती ठेवावे हे समजत नव्हते तर ते आम्ही शिकलो
2 वेल्डिंग करत असताना टेंपरेचर जास्त असल्यामुळे पाईप जळत होता व होल पडत होते तर ते नीट वेल्डिंग करायला आम्ही शिकलो
3 ग्राइंडिंग करताना ब्लेड चुकीचं लावल्याने ते तुटलं तर ब्लेड कसा लावायचा ते शिकला
4 वेल्डिंग किंवा ग्राइंडिंग करत असताना हॅन्ड ग्लोज घालने गरजेचे आहे कारण एका मुलाचा बोटाला कापलं त्यामुळे सेफ्टी घालून काम केले पाहिजे
5पावडर कोटिंग करताना मास्को अँड ग्लास न घातल्यामुळे एक मित्र आजारी पडला कारण लिक्विड मुळे साईड इफेक्ट होतात तर ते देखील आम्ही शिकलो
6 टेबलवर क्लाऊड बसवत असताना स्क्रू च साईज छोटी घेतली होती त्यामुळे आम्हाला डबल खर्च झाला मग ते देखील शिकलो की नेहमी माप घेऊन काम केले पाहिजे