उद्देश:-
1.फॅब लॅब इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये रुची निर्माण होणे.
2. वेगवेगळे मॉडेल बनवून शिकणे व समजून घेणे
कृती:-
1. Arduino UNO: कोडिंग करून LED ब्लिंक बनवले
पहिल्या आम्ही LED चालू/ बंद कसे सिग्नल वरती होतात त्याप्रमाणे बघितले. त्याच्यामध्ये कोडींग करून किती वेळ एलईडी ओनर झाला पाहिजे ते बघितले पहिल्या एक एलईडी बघितला नंतर सरांनी कोडींग मध्ये चेंज करून दोन तीन असे एलईडी चेंज करायला लावले व वर्क करून दाखवायला लावले.
2. Arduno uno
या सर्किट बोर्ड इनपुट पिन कोड पण लावता येते. कोडींग टाकण्यासाठी कोड उपयोग होतो. त्याला 5 इनपुट द्यावी लागते अनलॉक पिन आणि डिजिटल पिन अशा दोन प्रकारचे पिंड राहतात इनपुट घेण्याचा काम करतात आणि डिजिटल पिन आऊटपुट देण्याचे काम करतात. त्याला एक रिसीट बटन पण राहते.
3. पेपर ग्राफी
पेपरग्रा फीमध्ये सर्किटचे कार्ड पेपर वरती बनवले होते त्याच्यावर तांब्याची पट्टी लावून एलईडी आणि दोन रजिस्टर असे सिरीज आणि समांतर मध्ये जोडले व शोल्डिंग तारेने शोल्डिग केली त्याला नऊ हॉलच् बॅटरीचा सप्लाय दिला व सर्किट चालू झाले.
4. लेझर कटर मशीन चालवणे
फुलांची वेगवेगळी डिझाईन कॅम्पुटर वरती बघितली. याच्यामध्ये एक डिझाईन डिसाईड करून पेपरच्या मापा एवढे डिझाईन सेट केले व ते लेझर कटिंग मशीन ला टाकले डिस्प्ले वरती आल्यावर लेझर कटिंग पूर्ण शेप मारून बघितला व नंतर कटिंग ल सुरुवात केली. त्याच्यामध्ये पहिल्यांदा लेझर कटिंग मशीन सगळीकडे फिरले काही फुले कापली नव्हती तर ती कापण्यासाठी डबल लेझर कटिंग चालू केले व पूर्ण होईपर्यंत थांबितलं . एक काढशील वरील सर्व फुले किंवा डिझाईन कापण्यासाठी तिला पाच मिनिटं लागतात. तिला एकदा शेप केले तर डबल डबल चेंजेस करावे लागत नाही. गणपतीसाठी भरपूर फुलं बनवली होती. कोणतेही आश्रम मध्ये डिझाईनचे काम राहिले की टेबलेट मध्ये फुलं बनवण्यासाठी लेझर कटिंग मशीन चा चांगलाच उपयोग होतो.
5. 3D प्रिंटिंग मशीन
पहिल्यांदा वहीमध्ये पेंटिंग काढायला लावले व नंतर सर्वांची चेक केली कोणाचे ड्रॉईंग भारी आहे व कोणाचे आपण करू शकतो त्याच्यानंतर 3D प्रिंटिंग मशीन मध्ये आम्ही कोणकोणते फिचर राहतात ते बघितले व स्वतःचे किचन बनवण्यासाठी कशी सेटिंग करावी ते बघितले त्याच्यामध्ये किती वेळ लागेल हे पण दाखवले जातात आपण एकदा मशीन चालू केली का तेवढ्या वेळात त जावून ते बघावे लागते.
निष्कर्ष:-
आम्हाला इलेक्ट्रॉनिक मध्ये आवड निर्माण झाली. फॅब लॅब मधील वेगवेगळ्या मशीन बघून त्यांना शिकण्याची इच्छा निर्माण झाली. यामध्ये आरडी नो याच्याबद्दल भरपूर माहिती घेतली.