उददेश :- बिस्कीट तयार करणे .
सामग्री :- पिठी साखर , गव्हाचे पीठ , नाचणीचे पीठ , दूध , बटर , मिल्क पावडर , बेकिंग पावडर , . साहित्य :- परात , ओव्हन , मेजरींग कप , चमचा , बिस्कीट साचा , ट्रे , भांड , चाळणी , पोळपाट , लाटण , वजनकाटा , फ्लेवर .
कृती :- १ -पहिलं दिलेली सामग्री वजनकाट्यावर वजन करून घेणे .
२-ओव्हन १८०वर सेट करणे .
३- परातमध्ये पिठी साखर व बटर मिक्स करणे .
४-एका भांडयात नाचणीचे पीठ व गव्हाचे पीठ चाळून घेणे . त्यामध्ये मिल्क पावडर व बेकिंग सोडा टाकणे .
५- त्यामध्ये १मिली फ्लेवर टाकणे .
६- पिठी साखर व बटर च्या मिश्रणात हे सगळे चाळून टाकणे . ते सगळे एकत्र करून घेणे .
७- मिश्रण करतानी दूध टाकून त्यांचा गोळा बनवणे .
८- ते सॉफ्ट झालं कि पोळपाट ठेऊन योग्य थिकनेस होईपर्यंत लाटणे .
९- त्यांचा बिस्किटांचे साच्यात वापर करून योग्य आकार काढणे .
१० -हे सगळे ट्रे मध्ये ठेऊन ओव्हन मध्ये ७ मिनटे ठेवणे .