बीज प्रक्रिया हा लागवड पूर्वी करायची महत्त्वाची प्रक्रिया आहे. 

या मुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पीक पाणी वर परिणाम होत असतोस. 

बीज प्रक्रिया पेरणी च्या दिवशी करावी. 

बीज प्रक्रिया करताना विविध साहित्याचा एक सुधारित क्रम असतोस.

सरळ सोप्या भाषेत समजावून सांगितले तर पहिले बुरशीनाशक, कीटक नाशक त्या नंतर जिवाणू संवर्धक उदाहरणात रायजोबीयम,ईत्यादी. 

 बिजप्रक्रियेचे फायदे

* जमिनीतुन व बियाणाद्वारे पसरणारया रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.

* बियाण्याची उगवण क्षमता वाढते.

* रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात.

* कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मकउपाय करून पेरणी करता येते.

सोयाबीन / तुर बियाण्यास बीज प्रक्रिया करा ( Soybean & Redgram : Seed treatment )

* पिकाच्या उत्पादनात वाढ होते.

(१) रासायनीक बीजप्रक्रिया : सोयाबीन व तुर बियाण्यास रासायनीक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करण्यासाठी प्रती किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम किंवा म्यांकोझेब हळूवारपणे लावून बीजप्रक्रिया करावी.

(२) जैवीक बीजप्रक्रिया : 

सोयाबीन व तुरीच्या प्रती किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा पावडर ४ ग्रॅम किंवा ५ ग्रॅम 

 अधिक रायझोबियम जपोनिकम १० मिली अधिक पी. एस. बी १० मिली गुळाच्या पाण्यात मिसळून

(२०० मिली पाण्यात ५० ग्रॅम गुळ वापरावा ) लावावे व सावलीमध्ये सुकवून त्याच दिवशी पेरणीसाठी वापरावे. 

 सोयाबीन बियाण्यास बीज प्रक्रिया करतांना घ्यावयाची काळजी :

 (१) रासायनीक व जैवीक बीजप्रक्रिया एकत्रितपणे मुळीच करु नये.

 (२) जर पेरणीच्या दिवशीच रासायनीक व जैवीक बीजप्रक्रिया करायचे काम पडल्यास रासायनीक बीजप्रक्रिया केल्यानंतर दोन तासांनी जैवीक बीजप्रक्रिया करावी.

 (३) बीज प्रक्रिया करतांना सोयाबीनचे बियाणे जोराने घासू नये कारण बियाण्याची उगवण शक्ती कमी होते.

???? ट्रायकोडर्मा बुरशीचे फायदे

 नैसर्गिक घटक असून, या बुरशीचा पर्यावरणावर विपरीत परिणाम नाही.

बीजप्रक्रियेने उगवणशक्ती वाढून अंकुरण चांगले होते.

पिकाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते.

प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याची शक्यता कमी.

ट्रायकोडर्मा बुरशीचा प्रभावी वापरासाठी आवश्यक बाबी  

रोगकारक बुरशीचा संहार करते.

जमिनीत सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात असावेत.

ट्रायकोडर्मा चे पाकीट/द्रावण थंड जागेत सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे.

रासायनिक बुरशीनाशक लावलेल्या बियाण्यास ट्रायकोडर्माची मात्रा दुप्पट करावी.

ट्रायकोडर्मा सोबत रायझोबीअम/अॅझोटोबॅक्टर/अॅझोस्पिरीलम तसेच स्फुरद विरघळविणारे जिवाणू या जैविक खतांची बीज प्रक्रिया करता येते.