आम्ही पहिल्यांदा शेत तयार करण्या साठी ट्रॅक्टर घेऊन तिथे रोटर फिरवले आणि त्या जागेत ले दगड आणि पालापाचोला उचलून फेकून दिला . मग त्याच्या नंतर वाफे तयार करून घेतले.

कोळपणी

कोळपणी यासाठी केली कि जे बारीक लहान गवत राहून जाते ते पिकांना वाढू देत नाही त्यामुळे कोळपणी केली आणि त्याच्या मुळे बारीक दगड पण आणि मोठे दगड पण भायेर झालेत .

खाद्य देणे आम्ही सिंगल सुपर फॉस्फरस [ssp]आणि शेण खत मिक्स करून टाकले आणि त्याच्या वरती आम्ही पाणी मारून दिले खाद्य टाकण्याचे कारण कि झाडाची वाढ लवकर होते

त्या नंतर आम्ही बीजप्रक्रिया केली त्यात आम्ही रोको हे बुरशी नाशक १५ लिटर पाण्यात ५० ग्राम टाकून त्याचे द्रावण तयार केले आणि रोपांच्या मुळ्या त्या पाणीत भिजवून ठेवली .

This image has an empty alt attribute; its file name is 19b0bd79-04b5-4da5-a990-9b9e3dea10d3-768x1024.jpg

त्यानंतर मग आम्ही रोपे लावायला सुरवात केली ६०×६० सेंटीमीटर वरती रोपे लावतात तशे ९० रोपटे लागलीत आणि मग परत पाणी सोडून सर्व हत्यार घेऊन वरती आलो