Dec 1, 2021 | Uncategorized

साहीय्तः कापलेले चारा ,गूळ पानी , नमक ,plsitec ची बॅग

मुरघास निर्मिती साठी एकरी मक्याची लागवड 

 प्रत्यक्ष मुरघास निर्मिती शिकण्यासाठी आपण २ एकर मका लागवडीचे गणित पाहू. 

एका एकरात किती चारा तयार होतो ? 

 एका एकर  जागेत ४० गुंठे असतात. आणि एका गुंठामध्ये ५०० किलोपर्यंत चारा तयार होतो. या हिशोबाने आणि आमच्या सायलेज स्क्वाड च्या अनुभवातून लक्षात येते कि एका एकरात १८ ते २२ टन मुरघास बनेल इतका मका तयार होतो. 

मक्याची लागवड कशी करावी ?

 त्यासाठी आपण एका एकरात १० किलो मका पेरावा.  २ फूट रुंदीचे सरी घेऊन ८ इंचावर बी पेरावे. 

किती दिवसात मक्याचे पीक मुरघास चाऱ्यासाठी तयार होते ?

 पेरणीपासून साधारणतः ८०-९० दिवसांत मका पीक मुरघास बनविण्याच्या उद्देशासाठी अनुकूल होते.

मका मुरघासासाठी तयार झाला का हे कसे ओळखावे ?

 मुरघास बनविण्यासाठी आपल्याला चिकातील मक्याची आवश्यकता असते.   बॅग किंवा बांधकामातील सायलेज  (मुरघास ) साठी ६०-६५% ओलावा असलेलं मक्याचे पीक गरजेचं असते. आता हे ६५% ओलावा कसा काय बरं ओळखावा ?  तर मक्याचं कणीस आडवा कापल्यावर दुधाची रेघ दिसते (मिल्क लाईन )  ती मक्याच्या दाण्याच्या अर्धा आणि पाऊण भाग याच्या मध्ये असली पाहिजे.   तसेच  मक्याचा पाला हातात घेऊन चोळला तर ओल लागली पाहिजे. 

कम्पोस्ट खत

`

कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतिजन्य व प्राणिजन्य पदार्थ असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थापासून सूक्ष्म जिवाणूंच्या साहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय. कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिरळ्या पद्धती आहेत. यामध्ये इंदूर पद्धत, बेंगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप पद्धत इत्यादी पद्धतींचा समावेश होतो.

भारत देशात रासायनिक खताचे आगमन व त्यांचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत, निरनिराळया पेंडींचा वापर, पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे. कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करू लागले व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीत दिसून येऊ लागला. पर्यायाने शेतकरी, पाणी, प्राणी, पक्षी मानवी आरोग्य व गांडूळ मित्रांचे अस्तित्वच धोक्यात आले.

शेळीपालन

पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेळयांना इतर जनवरांपेक्षा जसे की गाई , म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणार्‍या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे.खाद्याचे , शेळयांच्या आरोग्याचे , निवार्‍याचे व पिण्यासाठी लागणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो.बंदिस्त तसेच अर्ध बंदिस्त या प्रकारे भारतामध्ये हा व्यवसाय केला जातो. बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्यासाठी लागणारा चारा हा शेळयांना गोट्या मध्येच पुरवला जातो.अर्ध बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्या चरण्यासाठी काही वेळ बाहेर मोगळ्या सोडल्या जातात. यामध्ये शेळयांना चार्‍याबरोबर शेतातील व बांधावरील बर्‍याच वनस्पती मिळतात यामुळे शेळयांचे आरोग्य खूप चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते यामुळे हा प्रकार जास्त फायदेशीर आहे.