व्हेज पफ
साहित्य:-
- मैदा = 500 gm
- कस्टर्ड पावडर = 14 gm
- साखर = 14 gm
- मार्गरीन = 320 gm
- दूध = 2ml
- तेल = 2ml
- पाणी = 160ml
- बटाटे, हळद, मिरची पावडर, मीठ, जीरा, लसूण, आल, तेल.
कृती:-
- मैदा, कस्टर्ड पावडर, साखर हे मोजून घेणे व मिक्स करणे.
- मिश्रण मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी टाकून घट्ट पीठ मळून घेणे.
- मळून घेतल्यानंतर 50 ग्रॅम मार्गरीन (डालडा) घेऊन मळून घेणे.
- हे झाल्यानंतर एक कापड भिजवून घ्या व घट्ट पिळून घ्या.
- कापडामध्ये मळून घेतलेले पीठ ठेवा.
- त्यानंतर फ्रिजमध्ये एक ते दीड तास ठेवा.
- एक दीड तासानंतर बाहेर काढा आणि लाटण्याच्या साह्याने चौकोनी आकारामध्ये लाटून घ्या.
- लाटून घेतल्यानंतर left and right side ने लेयर करून घ्या,
- समोरच्या side ने आणि मागच्या side ने लेयर करून घ्या.
- लेयर करून घेतल्यानंतर लाटण्याने चौकोनी आकारांमध्ये लाटून घ्या.
- 25 ग्रॅम मार्गरिन घ्या व त्याचे चार गोळे करा.
- लाटून घेतलेल्या लेयर वर एक गोळे लावा.
- मार्गरीन लावल्यानंतर समोरून roll करत येणे आणि right side ने fold करून घेणे आणि लाटण्याने लाटून घेणे.
- असेच step दोन वेळा repeat करणे.
- बटाट्याची भाजी बनवून घ्या.
- चौकोनी आकारामध्ये लाटून घेतलेली पीठ कटरने छोट्या छोट्या चौकोनी आकारात कट करून घ्या.
- ट्रे ला तेल लावा.
- कट करून घेतल्यानंतर त्यामध्ये बटाट्याची भाजी भरा आणि फोल्ड करून ट्रेमध्ये ठेवा.
- ट्रेमध्ये ठेवल्यानंतर ब्रश ने वरून दूध लावून घ्या.
- ओव्हन 180°c डिग्रीला ठेवणे.
- सर्व ट्रे ओव्हनमध्ये 15 ते 20 मिनिट ठेवावे.
- 20 मिनिट झाल्यानंतर व्हेज पफ बाहेर काढून घ्या.
- डिश मध्ये ठेवा आणि सॉस सोबत enjoy करा.


•दूषित पाण्यामार्फत होणारे आजार
- पोट दुखी
- सर्दी
- खोकला
- ताप
- त्वचा रोग
- गॅस्ट्रो
- किडनी स्टोन
- पित्त होणे
- कावीळ
- केस गळणे
- डोळ्यांचे आजार
• दूषित पाण्यावर उपाय:-
- फिल्टर लावणे.
- तुरटी फिरवणे.
- फ्लोरिंनची पावडर वापरणे.
- मेडिक्लोर वापरणे.
- पाणी गाळून पिणे
- पाणी उकळून पिणे.
• दूषित पाण्यात आढळणारे जिवाणू \ किटाणू
- E. Coli
- salmonella sp.
- streptococcus aureus
- shigella sp.
- mycobacterium tuberculosis ( टी.बी )
बटाटा भजी
साहित्य:- बटाटे, बेसन, मिरची पावडर, हळद, जिरा, ओवा, मीठ, तेल
कृती:-
- बटाटे चिरून घेणे व पातील्यात पाणी घेऊन त्यात टाकणे.
- एका भांड्यात बेसन, मिरची पावडर, हळद, जिरा, ओवा, मीठ, पाणी टाकून मिक्स करुन घेणे.
- तयार झाल्यावर त्यात चिरून घेतलेले बटाटे टाकणे.
- कढईत तेल तापण्यासाठी ठेवणे.
- तेल तापल्यानंतर त्यामध्ये एक एक करून बटाटेचे पीस सोडणे.
- चांगल्या पद्धतीने तळून घेणे.
- एका ताटात काढून ठेवणे.
पपया बॉल
साहित्य:
कच्ची पपई खिस – १ kg
साखर – ७५० gm
दूध पाऊडर -५० gm
डेसीकेटेड कोकोनट – १५० gm
सुखामेवा – २० gm
व्हॅनिला इसेन्स- 2 ml
कृती:-
१. कच्ची पपई धुवून घेणे, साल काढून घेणे आणि आतील बिया काढून , पपई खिसून घेणे.
२. खिसलेली पपई मिक्सर् मध्ये टाकून बारीक करून घेणे .
३. पपई चा गरमध्ये साखर टाकून शिजवायला ठेवणे .
४. थोडे पानी आटत आल्यावर त्यामध्ये दूध पाऊडर आणि ५० ग्रॅम डेसीकेटेड कोकोनट आणि सुखामेवा टाकून शिजवने.
५. पानी पूर्ण आठल्यावर गॅस बंद करणे आणि २ ml व्हॅनिला ईसेन्स टाकणे.
६. थंड झाल्यानंतर हातानी गोला आकारातबॉल तयार करणे आणि डेसीकेटेड कोकोनट मध्ये घोळसून काढणे.
७. पेपर मोल्ड मध्ये ठेवणे.
खारे शेंगदाणे
साहित्य:-
1.शेंगदाणे
2.मीठ
कृती :-
1.10% concentration असलेल्या मिठाच्या पाण्यात शेंगदाणे 3-4 तास भिजत घालणे.
- त्यानंतर ते अर्धवट सुकवले
- आणि मीठ गरम करून घेतले
- त्यानंतर शेंगदाणे मंद आचेवर भाजून घेतले
- मग थंड झाल्यावर पॅक करुन घेणे
पिझ्झा
साहित्य:
- २ कप मैदा
- १ चमचा इन्स्टंट यीस्ट
- १ चमचा साखर
- १/२ चमचा मीठ
- १/२ कप गूळ (गरम पाण्यात विरघळवलेला)
- २ चमचे ऑलिव ऑईल
- १/२ कप थंड पाणी
- टॉपिंगसाठी:
- १ कप पनीर (कुंडाळीत कापलेला)
- १ कप भाज्या (बेल पेपर, कांदा, टमाटर, मशरूम इ.)
- १ कप मोझरेला चीज
- १ चमचा ऑरेगॅनो
- १ चमचा लाल मिरी पूड (चवीनुसार)
- मीठ चवीनुसार
कृती:
- पिझ्झा बेस तयार करणे:
- एका भांड्यात गरम पाण्यात साखर आणि यीस्ट मिसळा. 10 मिनिटे झाकून ठेवा.
- दुसऱ्या भांड्यात मैदा आणि मीठ घाला. त्यात यीस्ट मिश्रण आणि ऑलिव्ह ऑईल घाला. चांगले मळा.
- लोणीत भांडे ठेवून 1-2 तास तापलेल्या ठिकाणी ठेवा, जेणेकरून पिठात वाढ होईल.
- पिझ्झा बनवणे:
- बेस तयार झाल्यावर, त्याला थापून पिझ्झा आकार द्या.
- त्यावर टोमॅटो सॉस लावा.
- त्यावर भाज्या आणि चीज पसरा.
- ऑरिगॅनो आणि चवीनुसार मीठ-मिरी घाला.
- पिझ्झा भाजणे:
- ओव्हन 200°C (400°F) वर गरम करा.
- पिझ्झा ओव्हनमध्ये 15-20 मिनिटे भाजा, जोपर्यंत चीज वितळून आणि पिझ्झा सोनेरी होत नाही.
- सर्व्हिंग:
- पिझ्झा थंड झाल्यावर तुकडे करा व पॅकिंग करून ठेवणे. .
शेंगदाण्याची बर्फी
साहित्य:
- १ कप शेंगदाणे
- १ कप साखर
- १/२ कप पाणी
- १/४ कप तूप
- १/२ चमचा वेलदोडा पूड
- चवीनुसार किंचित मीठ
कृती:
- शेंगदाण्यांना मध्यम आचेवर भाजा भाजल्यानंतर, त्यांचे साली काढा.
- एका पातेल्यात १ कप साखर आणि १/२ कप पाणी घाला. याला मध्यम आचेवर गरम करा आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत उकळा. त्यानंतर, १ तारांचा पाक तयार झाला की नाही हे तपासा.
- पाक तयार झाल्यावर त्यात १/४ कप तूप, वेलदोडा पूड आणि किंचित मीठ घाला. मिश्रण चांगले मिसळा.
- आता भाजलेले शेंगदाणे या मिश्रणात घाला आणि चांगले मिसळा.
- या मिश्रणाला एका ग्रीस केलेल्या थाळीत ओता मिश्रण थोडे थंड झाल्यावर, इच्छेनुसार चौरस किंवा आयताकृती तुकडे कापून घ्या.
- बर्फीला पूर्णपणे थंड होऊ द्या. नंतर थाळीतून काढून पॅकिंग करून ठेवणे.
शेंगदाणा चिक्की
साहित्य:-
- शेंगदाणे :- 1 kg
- गुळ :- 600 gm
- तूप :- 20 gm
कृती:-
१. शेंगदाणे भाजून घेणे.
२. भाजून घेतल्यानंतर भरडून घेणे.
३. गुळ कढइमध्ये वितळून घेणे.
४. वितळुन घेतल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट मिक्स करणे.
५. मिक्स केल्यानंतर चक्कीच्या ट्रे ला तूप लावून घेणे.
६. तूप लावून घेतल्यानंतर ट्रेमध्ये तयार झालेले मिश्रण टाकणे.
७. ट्रे मध्ये टाकल्यानंतर कटरनी कट करून घेणे.
८.पॅकिंग करून ठेवणे.
उपवासाचे प्रिमिक्स
साहित्य:-
- साबुदाणा :- 30 gm
- भगर :- 150 gm
- मीठ :- 4 gm
कृती:-
- साबुदाणा मिक्सर मधून काढून घेणे.
- भगर मिक्सर मधून काढून घेणे.
- मिक्सरमधून काढल्यानंतर एकत्र मिक्स करणे.
- त्यामध्ये मीठ मिक्स करून घेतल्यावर प्रिमिक्स तयार होईल.
- प्रिमिक्स तयार झाल्यावर पॅकिंग करून ठेवावे.
कांदा भजी
साहित्य:-
कांदे, हळद, बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, जीरा, ओवा, तेल, लसुन, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर..!
कृती :-
- कांदे चिरून घेणे.
- चिरून घेतल्यानंतर एका भांड्यात घेणे.
- त्याच्यामध्ये मीठ मिक्स करून घेणे.
- हिरवी मिरची, लसूण बारीक चिरून घेणे.
- बारीक चिरून घेतल्यानंतर ते मिक्स करावे.
- बेसन, चिमूटभर तांदळाचे पीठ,जीरा, ओवा, लाल मिरची पावडर मिक्स करावे.
- मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ टाकावे.
- कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवावे.
- तेल गरम झाल्यानंतर मध्यम आचेवर भजी तळून घेणे.
नान कटाई
साहित्य:-
- मैदा
- पिठी साखर
- डालडा
- फ्लेवर
- कलर
- पॅकिंग बॉक्स
कृती:-
- मैदा, पिठीसाखर, डालडा, फ्लेवर, कलर हे सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करून घेणे .
- मिश्रण मिक्सर मधून काढून घेणे.
- मिक्सर मधून काढल्यानंतर मळून घेणे.
- वेगवेगळ्या shapes मध्ये cut करून घेणे.
- Cut केल्यानंतर ट्रे मध्ये ठेवणे.
- ट्रे 15 minute ओव्हन मध्ये ठेवणे.
- 180°c डिग्रीला भाजणे.
- 15 minute झाल्यानंतर ट्रे ओव्हन मधून काढणे.
- ट्रे मधून तयार झालेली नानकटाई बाहेर काढणे.
- पॅकिंग करून ठेवणे.
खारी
साहित्य :-
- मैदा :- 250 gm
- कस्टर्ड पावडर :- 6.2 gm
- लिली डालडा :- 156 gm
- मीठ :- 6.2 gm
- साखर :- 6.2 gm
- दूध :- 20 ml
- तेल :- 5 ml
- पाणी :- 160 ml
कृती:-
- मैदा, कस्टर्ड पावडर, मीठ, साखर हे मिश्रण एकत्रित करणे.
- पाणी 160 ml घेऊन घट्ट मळून घेणे.
- घट्ट मळून घेतल्यानंतर डालडा घेणे व त्या डालड्यामधून 25 ग्रॅम डालडा वेगळे करणे.
- 25 ग्रॅम डालडा वेगळे केल्यानंतर उरलेल्या डालड्याचे चार भाग करून घेणे.
- मळून घेतलेल्या पिठाला चौकोनी आकारामध्ये लाटून घेणे.
- एक लेयर लाटून घेतल्यानंतर डालडाची एक भाग लावणे.
- परत दोन्ही बाजूंनी लेयर करून घेणे व लाटून घेणे.
- डालडाची एक भाग लावून घेणे व असेच दोन वेळा लाटून घेणे.
- एक कापड भिजून घेणे व त्यामध्ये पीठ ठेवणे.
- कापड 30 मिनिट फ्रिजमध्ये ठेवावे.
- 30 मिनिटानंतर चौकोनी आकारामध्ये लाटून घेणे.
- लाटून घेतल्यानंतर खारीच्या आकारामध्ये कट करून घेणे.
- ट्रे ला तूप लावून घेणे.
- तूप लावून घेतल्यानंतर त्यामध्ये खारीचे पीस ठेवावे.
- खारीचे पीस ठेवल्यानंतर वरून दूध लावावे.
- ओव्हन मध्ये 15 ते 20 minute ठेवावे.
- ओव्हन झाल्यानंतर ट्रे मधून खारी काढावी व पॅकिंग करून ठेवावी.
रक्तदाब ( BLOOD PRESSURE)
• शरीरात रक्त कशा मार्फत वाहिले जाते?
शरीरात रक्त शिरा व धमनी मार्फत वाहिले जाते.
• हृदयाला किती कप्पे असतात?
हृदयाला चार कप्पे असतात.
• शरीरात शुद्ध रक्त कशा मार्फत वाहते?
शरीरात शुद्ध रक्त धमनी मार्फत वाहते.
• शरीरात अशुद्ध रक्त कशा मार्फत वाहते?
शरीरात अशुद्ध रक्त शीरान मार्फत वाहते.
• रक्तदाबाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
रक्तदाबाचा शोध विल्यम हार्वे या शास्त्रज्ञांनी लवला.
• रक्तदाबाचे दोन प्रकार:-
- रक्ताने रक्तव हिऱ्यांतर आतील बाजूने निर्माण केलेल्या दाबास रक्तदाब असे म्हणतात.
- रक्ताने रक्त वाहीण्यातर आतील बाजूने निर्माण केलेल्या दाबास रक्तदाब असे म्हणतात.
शेंगदाणा लाडू
साहित्य :-
- शेंगदाणे :- 500 gm
- गुळ :- 300 gm
- तूप :- 25 gm
कृती:-
- शेंगदाणे निवडून घेणे.
- निवडून घेतल्यानंतर मध्यम आचेवर भाजून घेणे.
- भाजून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेणे.
- त्यामध्ये गूळ व तूप मिक्स करणे.
- मिक्स केल्यानंतर परत मिक्सरमध्ये वाटून घेणे.
- वाटून घेतल्यानंतर गोल आकारात लाडू तयार करून घेणे.
- लाडू तयार झाल्यानंतर पॅकिंग करून ठेवणे.
चिंच – खजूर सॉस
साहित्य :-
- निवडलेली चिंच :- 1200 gm
- निवडलेली खजूर :- 1200 gm
- साखर :- 3 kg
- गरम मसाला :- 20 gm
- चाट मसाला :- 15 gm
- काळे मीठ :- 30 gm
- साधे मीठ. :- 25 gm
- लाल तिखट. :- 20 gm
- सायट्रिक ऍसिड :- 2 gm
- सोडियम बेन्जोएट :- 10 gm
कृती:-
- निवडलेली चिंच दोन वेळा धुवून घेणे.
- धुवून घेतलेली चिंच व खजूर मोजून घेणे.
- चिंच खजूरच्या दुप्पट पाणी टाकणे.
- पंधरा मिनिट शिजवून घेणे व थंड करून घेणे.
- मिक्सरमध्ये वाटून घेणे पुरणाच्या चाळनिने गाळणे. ( गरजेनुसार पाणी टाकणे.)
- तयार स्लरी (पल्प) + साखर + सर्व मसाले घेणे.
- उकळी येई पर्यंत शिजवणे.
- सोडियम बॅन्जोएट व सायट्रिक ऍसिड मिक्स करणे.
- चिंच खजूर सॉस तयार झाल्यावर पॅकिंग+ लेबलिंग करणे.
- थंड व कोरड्या ठिकाणी साठवणे.
पाव
साहित्य:-
- मैदा :- 7 kg
- यीस्ट :- 150 gm
- मीठ :- 120 gm
- साखर :- 120 gm
- तेल :- 100 gm
- ब्रेड इम्प्रूअर :- 14 gm
कृती:-
1) पहिले मैदा आणि मीठ मिक्स करून घेणे.
2) पाणी, साखर, यीस्ट, ब्रेड इम्प्रूअर हे मिक्स करून घेणे.
3) मिक्स करून मैद्यामध्ये टाकणे.
4) पाणी टाकून पीठ मळून घेणे.
5) मळून घेतलेले पीठ फर्मेंटेशन साठी ठेवावे.
6) फर्मिटेशन झाल्यानंतर गोल आकारात गोळे करून घेणे.
7) सर्व गोळे ट्रेमध्ये दहा मिनिट झाकून ठेवावे.
8) दहा मिनिटानंतर सर्व ट्रे ओव्हन मध्ये 280°c मध्ये ठेवावे.
9) ओव्हन झाल्यानंतर पावांना तेल लावून घ्यावे.
photo:-


सोयाबीनचे फुटाणे
साहित्य:- सोयाबीन बी
पाणी
मीठ
साधने :- गॅस, कापड, कढई, झारा
कृती :- 1) सोयाबीनच्या बी मोजून घेणे आणि बारा तास पाण्यामध्ये भिजवणे.
2) सोयाबीन भिजल्यानंतर पाणी नितळून घेणे व सुती कपडयावर दीड ते दोन तास फॅन खाली सुकवणे.
3) कढईमध्ये मीठ गरम करून घेणे व त्या मिठामध्ये सोयाबीन 20 ते 25 मिनिट मध्यम आचेवर भाजून घेणे.
4) भाजलेले सोयाबीन झाऱ्याच्या मदतीने काढणे.
5) काढल्यानंतर पॅकिंग करणे.
ज्वारीची चकली
. साहित्य:- (1) ज्वारी पीठ – 100 gm
. (2) तांदळाचे पीठ – 50 gm
. (3) बेसन – 25 gm
. (4) ओवा – 2 gm
. (5) तेल – 5
. (6) लाल मिरची – 5 gm
. (7) हळद – 2 gm
(8) तीळ – 1 gm
(9) धना पावडर – 2 gm
(10) पाणी – 160 ml
(11) मीठ – 2 gm
. कृती:- 1) ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, बेसन मोजून घेणे व एकत्र मिक्स करणे.
. 2) ओवा, लाल मिरची, हळद, तीळ, धना पावडर, मीठ मोजून घेणे व एकत्र मिक्स करणे.
. 3) कढईमध्ये 160ml पाणी उकळून घेणे आणि दोन चमच oil टाकणे.
. 4) उकळलेल्या पाण्यामध्ये मसाले मिक्स करणे आणि पीठ मिक्स करणे.
. 5) मिक्स केल्यानंतर दहा मिनिट झाकून ठेवावे.
. 6) तेल कढईमध्ये तापण्यासाठी ठेवावे.
. 7) साच्याने चकली तयार करून घ्यावे, तापलेल्या तेलात चकली सोडावी.
. 8) चकली चांगल्या पद्धतीने तळून घ्यावी.
आवळा सुपारी
साहित्य :- आवळे – 5 kg
. जीरा – 100 gm
. हिंग – 50 gm
. ओवा – 50 gm
. मीठ – 300 gm
. काळे मीठ – 100 gm
. काळी मिरी – 200 gm
. गॅस – 30 gm
. कृती :- 1. सर्व आवळे धुवून घेणे आणि उकळून घेणे.
. 2. उकळल्यानंतर बिया बाजूला काढणे आणि आवळ्याचे तीन पिस करणे.
. 3. तीन पिस केलेल्या आवळ्याना परत चाकूच्या मदतीने तीन पिसमध्ये कट करून घेणे त्यानंतर सर्व फोडी एका भांड्यात ठेवणे.
. 4. मीठ टाकून फोडींना वरखाली करून मिक्स करून घेणे
. 5. मिक्स केल्यानंतर ते झाकून ठेवावे आणि रात्रभर तसेच सोडावे.
6. सकाळी पंधरा मिनिट झाकण काढून ठेवावे.
7. सर्व मसाले मटेरियल मोजून घेणे आणि मिक्स करणे.
8. सर्व फोडींना मसाला लागावे म्हणून चमचनी वरखाली करून मिक्स करणे.
. 9. मिक्स केल्यानंतर परत झाकण लावून ठेवावे आणि दिवसभर तसेच सोडावे.
. 10. 8-9 तासानंतर ड्रायरला ठेवावे.
. Costing:-


मोरींगा चिक्की
साहित्य:- मोरिंगा पावडर – २० gm
. शेंगदाणे – २००gm
. तीळ – १२० gm
. जवस – ८० gm
. गूळ – ४०० gm
. तूप – २५ gm
. साधने :- गॅस, कडई, मिक्सर, लाटणे, कटर, चिक्की ट्रे, पॅकिंग बॉक्स.
. कृती:- 1. सर्वात आधी शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे निवडून घेऊ नंतर मध्यम आचेवर भाजून घेणे.
. 2. भाजलेले शेंगदाणे, तीळ, जवस, वेगवेगळे मिक्सर मध्ये बारीक करून घेणे आणि मिश्रण एकत्र करणे.
. 3. मिश्रणामध्ये मोरींगा पावडर घालून मिक्सरच्या मदतीने एकत्र करणे.
. 4. जेवढे मिश्रण तयार झाले आहे तेवढेच गूळ मोजून घेणे आणि बारीक चिरून घेणे.
. 5. चिक्की ट्रे ला, लाटण्याला आणि कटर ला तूप लावून घेणे.
6. कडईमध्ये मध्यम आचेवर गूळ वितळून घेणे.
. 7. वितळलेल्या गुळामध्ये उरलेले तूप आणि मोजून घेतलेले मिश्रण घालून एकत्र करणे.
8. तयार झालेले चिक्की चे मिश्रण मिश्रण चिक्की ट्रे वर घालून लाटण्याच्या मदतीने लाटून घेणे.
9. त्याच्यावर थोडे तीळ टाका आणि कटरच्या मदतीने चिक्की कापून घेणे.
. 10. बॉक्स मध्ये पॅक करून ठेवणे.

PROJECT
2024 – 2025
विभागाचे नाव :- Foodlab
प्रोजेक्टचे नाव :- आवळा सुपारी
प्रोजेक्ट करणाऱ्याचे नाव :- Alanka Pawar
साथीदाराचे नाव :- Kirti Pawar
मार्गर्शन करणाऱ्याचे नाव :- Reshma Madam
प्रस्तावना :- काही फळ आपल्याला सीजननुसार खायला भेटतात उदा. आवळा..!! आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पोट साफ राहतं. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए देखील आढळतं, जे डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आवळा रोज खाल्ल्याने दृष्टी सुधारते आणि मोतीबिंदू सारख्या समस्यांचा धोका कमी होतो.आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा उत्तम औषध आहे.
• आवळा सुपारी बनवायची असेल तर :-
साहित्य :-
आवळे – 5 kg.
जीरा – 100 gm.
हिंग – 50 gm.
ओवा – 50 gm.
मीठ – 300 gm.
काळे मीठ – 100 gm.
काळी मिरी – 200 gm.
गॅस – 30 gm.
कृती :-
1. सर्व आवळे धुवून घेणे आणि उकळून घेणे.
2. उकळल्यानंतर बिया बाजूला काढणे आणि आवळ्याचे तीन पिस करणे
. 3. तीन पिस केलेल्या आवळ्याना परत चाकूच्या मदतीने तीन पिसमध्ये कट करून घेणे त्यानंतर सर्व फोडी एका भांड्यात ठेवणे.
4. मीठ टाकून फोडींना वरखाली करून मिक्स करून घेणे.
5. मिक्स केल्यानंतर ते झाकून ठेवावे आणि रात्रभर तसेच सोडावे.
6. सकाळी पंधरा मिनिट झाकण काढून ठेवावे.
7. सर्व मसाले मटेरियल मोजून घेणे आणि मिक्स करणे.
8. सर्व फोडींना मसाला लागावे म्हणून चमचनी वरखाली करून मिक्स करणे.
9. मिक्स केल्यानंतर परत झाकण लावून ठेवावे आणि दिवसभर तसेच सोडावे.
10. 8-9 तासानंतर ड्रायरला ठेवावे.
• आवळ्याचे / आवळा सुपारीचे सेवन केल्यास होणारे फायदे :-
- डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.
- आवळ्याच्या फायद्यांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि तुरट गुणधर्म समाविष्ट आहेत जे शरीराची प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतात.
- भारतीय गूसबेरी पांढऱ्या रक्त पेशी देखील वाढवते ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात मदत होते.
- लघवी साफ न होणे, आम्लपित्त, चक्कर येणे, पोट साफ न होणे अशा अनेक तक्रारींवर आवळा अत्यंत गुणकारी आहे
- नियमितपणे आवळा खाल्ल्यास किंवा आवळ्याच्या रसाचं सेवन केल्यास शरीरातील रक्ताभिसरणाचे कार्य सुरळीत होतं.
- आवळ्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते. त्यामुळे लहान मुलांना आवळा द्यावा.
Photos :-


