1. मैदा = 500 gm
  2. कस्टर्ड पावडर = 14 gm
  3. साखर = 14 gm
  4. मार्गरीन = 320 gm
  5. दूध = 2ml
  6. तेल = 2ml
  7. पाणी = 160ml
  8. बटाटे, हळद, मिरची पावडर, मीठ, जीरा, लसूण, आल, तेल.

कृती:-

  1. मैदा, कस्टर्ड पावडर, साखर हे मोजून घेणे व मिक्स करणे.
  2. मिश्रण मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी टाकून घट्ट पीठ मळून घेणे.
  3. मळून घेतल्यानंतर 50 ग्रॅम मार्गरीन (डालडा) घेऊन मळून घेणे.
  4. हे झाल्यानंतर एक कापड भिजवून घ्या व घट्ट पिळून घ्या.
  5. कापडामध्ये मळून घेतलेले पीठ ठेवा.
  6. त्यानंतर फ्रिजमध्ये एक ते दीड तास ठेवा.
  7. एक दीड तासानंतर बाहेर काढा आणि लाटण्याच्या साह्याने चौकोनी आकारामध्ये लाटून घ्या.
  8. लाटून घेतल्यानंतर left and right side ने लेयर करून घ्या,
  9. समोरच्या side ने आणि मागच्या side ने लेयर करून घ्या.
  10. लेयर करून घेतल्यानंतर लाटण्याने चौकोनी आकारांमध्ये लाटून घ्या.
  11. 25 ग्रॅम मार्गरिन घ्या व त्याचे चार गोळे करा.
  12. लाटून घेतलेल्या लेयर वर एक गोळे लावा.
  13. मार्गरीन लावल्यानंतर समोरून roll करत येणे आणि right side ने fold करून घेणे आणि लाटण्याने लाटून घेणे.
  14. असेच step दोन वेळा repeat करणे.
  15. बटाट्याची भाजी बनवून घ्या.
  16. चौकोनी आकारामध्ये लाटून घेतलेली पीठ कटरने छोट्या छोट्या चौकोनी आकारात कट करून घ्या.
  17. ट्रे ला तेल लावा.
  18. कट करून घेतल्यानंतर त्यामध्ये बटाट्याची भाजी भरा आणि फोल्ड करून ट्रेमध्ये ठेवा.
  19. ट्रेमध्ये ठेवल्यानंतर ब्रश ने वरून दूध लावून घ्या.
  20. ओव्हन 180°c डिग्रीला ठेवणे.
  21. सर्व ट्रे ओव्हनमध्ये 15 ते 20 मिनिट ठेवावे.
  22. 20 मिनिट झाल्यानंतर व्हेज पफ बाहेर काढून घ्या.
  23. डिश मध्ये ठेवा आणि सॉस सोबत enjoy करा.