मातीचा वापर न करता, पाण्यात विरघळवलेल्या आवश्यक अन्नद्रव्यांच्या (Nutrient Solution) साहाय्याने वनस्पती वाढवण्याच्या पद्धतीला हायड्रोपोनिक्स म्हणतात.
Hydro = पाणी
Ponics = शेती
हायड्रोपोनिक्सचे फायदे
पाण्याची 80–90% बचत होते.
झाडांची वाढ जलद होते.
मातीची आवश्यकता नसते.
कीड व रोगांचे प्रमाण कमी असते.
स्वच्छ व ताजी भाजीपाला मिळतो.
कमी जागेत जास्त उत्पादन घेता येते.
वर्षभर शेती करता येते.
उत्पादनाची गुणवत्ता चांगली मिळते.
हायड्रोपोनिक्समध्ये घेतली जाणारी पिके
लेट्युस
पालक
मेथी
कोथिंबीर
स्ट्रॉबेरी
टोमॅटो
काकडी
ढोबळी मिरची
पुदिना
इतर पालेभाज्या
आवश्यक पोषक अन्नद्रव्ये
हायड्रोपोनिक्समध्ये झाडांना खालील अन्नद्रव्ये दिली जातात.
नायट्रोजन (N) – पानांची वाढ
फॉस्फरस (P) – मुळांची वाढ व फुलधारणा
पोटॅशियम (K) – उत्पादन व रोगप्रतिकारक क्षमता
कॅल्शियम (Ca) – पेशींची मजबुती
मॅग्नेशियम (Mg) – हरितद्रव्य निर्मिती
लोह (Fe) – हिरव्या रंगासाठी आवश्यक
pH चे महत्त्व
योग्य pH : 5.5 ते 6.5
योग्य pH असल्यास झाडांना अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होतात.
pH जास्त किंवा कमी झाल्यास अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते.
EC (Electrical Conductivity)
EC म्हणजे पाण्यात विरघळलेल्या अन्नद्रव्यांचे प्रमाण मोजण्याची पद्धत.
बहुतांश भाज्यांसाठी EC : 1.5 ते 2.0 mS/cm योग्य मानले जाते.
EC जास्त असल्यास झाडांना नुकसान होऊ शकते.
EC कमी असल्यास वाढ मंदावते.
ऑक्सिजनचे महत्त्व
मुळांना ऑक्सिजन आवश्यक असतो.
DWC (Deep Water Culture) मध्ये Air Pump वापरला जातो.
NFT (Nutrient Film Technique) मध्ये वाहत्या पाण्यामुळे मुळांना ऑक्सिजन मिळतो.