हायड्रोपोनिक शेती :-
हायड्रोपोनिक शेती म्हणजे पाण्यावरची शेती .या शेती मध्ये फक्त पाण्याचा वापर केला जातो. या पद्धतीत मातीचा वापर केला जात नाही.
हायड्रोपोनिक शेती मधे घेतली जाणारी पिके :-
गाजर, मुळा, सिमला, मिरची, वाटाणा, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, टरबूज, अननस, सेलेरी, तुळस, टोमॅटो, भेंडी, औषधी वनस्पती, पालक, काकडी, लांब दाड्याची फुले इ. रोपे चांगल्या प्रकारे वाढवता येतात.
DWC पद्धत
- या पद्धती मध्ये सुरुवातीला आम्ही पाण्याच्या टाक्या बांधून घेतल्या त्या मध्ये पाणी सोडले नंतर थर्माकॉल ला होल करून त्या मध्ये lettuce लावला. या पध्दत मध्ये पाणी स्थिर असते.या दोनी टाक्यांन मध्ये सगळे मिळून ११८ रोपटे आहेत. रोपांची वाढ होण्या साठी पाण्या मध्ये पाण्या मध्ये विरघळणारे खते टाकावे लागतात आणि पाण्याचा पीएच ,ईसी नियंत्रणात ठेवावा लागतो.
NFT पद्धत
या पद्धत मध्ये स्टॅन्ड तयार करून त्या वरती पाईप लावून त्याला होते होल करून रोपे लावले जातात. तेथे एक पाण्याची टाकी लावलेली असते ज्या मध्ये पाण्यात विरघळणारी खते टाकलेली असतात खतान मुळे रोपांची वाढ होते.
हायड्रोपोनिक शेतीचे फायदे
हाइड्रोपोनिक शेती ही खुप सोपी आहे . ह्या शेतिचे खूप फायदे आहे .
उदा…
–केवळ १०० फुट जागेत २०० रोपे लावता येतील. त्याचबरोबर बाहेरील वातावरणातुन येणाऱ्या किडी पासुन पिकाला संरक्षण मिळते.
परिणामी, वेळेची आणि मजुरांची बचत होते.
कमीत कमी जागेमध्ये नियंत्रित पद्धतीने व भरपूर पोषक घटकांच्या उपलब्धतेमुळे भाज्यांचे व फळांचे चांगले उत्पादन घेता येते.