प्रात्याक्षिक क्रमांक :- 1 गायचे दूध काढणे.
उद्देश :- दूध काढणे .
साहित्य :-दूध काढणी यंत्र ,बकेट पाणी इत्यादी

कुती :-१] गरम पाण्याने सड धुवून घ्या
२] नंतर मशीन त्या सांडाना लावा.

३] नंतर मशीन चालू कर

निरीक्षण :- १] गाईची सड स्वच्छ धुवून घेणे
२] मशीनने दूध कंठतांनी त्याकडे चांगल लक्ष ठेवा
३] मशीनने दूध हे सात मिनिटात निघाले पाहिजे.
8) प्रात्याक्षिक क्रमांक :- 2 दशपर्णी अर्क तयार करणे .
साहित्य :-
अ . क्र | साहित्याचे नाव | प्रमाण |
1 | शेण | 5 kg |
2 | कडूळींब पाला | 2 kg |
3 | एरंड पाला | 2 kg |
4 | सिताफळ पाला | 2 kg |
5 | पांढरा धोतरा | 2 kg |
6 | करंड | 2 kg |
7 | पपई | 2 kg |
8 | लाल कण्हेर | 2 kg |
9 | रुई | 2 kg |
10 | घाणेरी | 2 kg |
11 | गूळ वेल | 2 kg |
12 | निरगुडी | 2 kg |
कृती :-
1)सुरुवातीला 2000 लिटर टाकीमध्ये 200 लिटर पाणी घेतले .

2)त्या पाण्यात वरील दहा प्रकारची पाने प्रमाणात टाकली .

3)त्यावर शेण टाकले .आणि ते सर्व ढवळून घेतले .
प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक क्रमांक :- 3 गाईला धुणे.
उद्देश :- आपल्या गाई स्वच्छ ठेवणे.
साहित्य :- पाइप ,साबण, ब्रश ,पाणी.
कृती :- 1) सर्वप्रथम आपले गाईला पाईपणे भिजून टेवले .
2) साबण लाऊन ब्रशने घासणे, सड स्वच्छ धुणे.
3) जास्त साबण लावू नये.
6) त्याचे घाण स्वच्छ पाण्याने भिजवूनच काढावे .
7) एका जागेवर ज्यास्त ब्रशने घासू नये.



प्रात्यक्षिक क्रमांक :- 4 कंपोस्ट खत तयार करणे.
उद्देश :- झाडांना खत देण्यासाठी कंपोस्ट खत तयार करणे.
साहित्य :- शेन , खराब चारा ,फावडा, प्लॅस्टिक कागद.

कृती :- 1) प्लॅस्टिक कागदावर गवत टाकून त्यावर शेण टाकावे.
2) मग गवत टाकून मग शेण टाकून ,
3) A आकाराची रचना केली .त्यावर पाणीनी भिजून काढलं.

प्रात्यक्षिक क्रमांक :- 5 कंपोस्ट कल्चरच.
उद्देश :- कंपोस्ट बेडवर कल्चर फवारण्यासाठी कल्चर बनवणे .

कृती :- आदी शंभर लिटर पाणी मध्ये एक लिटर कल्चर व एक किलोव गूळ मिक्स केले व ते व्यवस्थित मिक्स

करून ठेवले.
प्रॅक्टिकल क्रमांक :- 6 पोत्यामध्ये झाड लावणे.
उद्देश :- टेरेस वरती झाड लावायचे शिकणे.
साहित्य :- स्लहरी, पोता, कडुलिंबाचे पाला , वीट ,पाईप ,खडी, बी .
कृती :- 1) सर्वप्रथम एका पोत्यामध्ये थोडेसे लाल विटा भरून घ्यावे .
2) त्याचे तुकडे करून भरून घ्यावे .

3) पाईप लावून त्याच्या बाजूने माती टाकावे, स्लहरी टाकावी.
4) माती टाकून त्यावरच कडुलिंबा पाल त्यावर माती व पाईपच्या आत वाळू टाकून पाईप
सावकाश काढून घेणे.

5) कारल्याचे किंवा दोडक्याची बी लावून त्यावर पाणी टाकावे.
प्रात्यक्षिक क्रमांक :- 7 सिडलींग ट्रे भरण.
उद्देश -:- सिडलिंग ट्रे भरायचे शिकणे.
साहित्य -:- सिडलींग ट्रे , कोबीचे बिया, कोकोबिट,पाणी .
कृती :- 1) सर्वप्रथम सिडलीन ट्रेवर कोकोबीट टाकून .
2) त्याच्यावर सेटलिंग ट्रे च्या गठ्ठ्याने दबाव देऊन कोकोबिट आत पॅक बसवायचा .

3) एकेक दाना त्यात टाकत जायचा .
4) त्यावर कोकोपीट टाकून त्यावर अलगद पाणी टाकायचे.

*प्रात्यक्षिक क्रमांक :- 8 वनस्पती प्रसाराच्या पद्धती.
* उद्देश -:- वनस्पती प्रसाराच्या विविध पद्धती बाबत माहिती करून घेणे.
* साहित्य -:- कट्टर, ब्लेड, कलम चिकट टेप ,प्लास्टिकची पिशवी,सुतळी.
* रोप तयार करण्याच्या विविध पद्धतीती.
1) बी सिडलिंग ट्रे. उदाहरण काकडी,मिरची.
2) खोड -:- खोड कट करून लावल्यावर उगणारी झाडे उदाहरण तुती जास्वंद गुलाब.
3) पान -:- पान लावल्यावर त्यातून फुटणारी झाडे उदाहरण ब्रह्मकमळ पानफुटी.
4) मूळ -:- गवताचे प्रकार.
5) झाडांना कलम करणे -:- झाडांना कलम करून त्यातून नवीन झाडाची निर्मिती करणे.
1. पाचन कलम
साहित्य :- सी कटर, ब्लेड, प्लास्टिक कागद,/ कलम पट्टी आंब्याचे झाड.
कृती :- 1) एक ते दीड बर्फाच्या गावरान आंब्याच्या शेंड्याकडील भागाशी कट्टर च्या साह्याने कापावा
2) कापलेल्या खोडाला मध्ये उभा काप घ्यावा.
3) चांगल्या जातीच्या आंब्याची त्याच जाडीची फांदी सी कटरने कापावी.
4) फांदीची सर्व पाने सी कटरने छाटून का टाकावी .
5) हळदीच्या खोडाकडील बाजूला पाचराला आकार द्यावा.
6) ती पाचर गावरान आंब्याच्या खोडामध्ये बसवावी.
7) पूर्ण जोड प्लॅस्टिकच्या पितीने बांधून टाकावा.

2 .डोळा भरणे :- 1) कलमासाठी निवडलेला डोळा फांदीपासून वेगळा करण्यासाठी चाकूच्या साह्याने त्याच्या
कडेने वर्तुळ पाकळीच्या आकाराच्या काप घ्यावा.
2) फुटव्याला इजा होत न होता डोळा फांदीपासून वेगळा करावा.
3) डोळ्यातील फुटवा उघडा ठेवून कलमावर प्लास्टिकची पीत ताणून बांधावी.
उदाहरण -:- गुलाब, संत्री ,मोसंबी.
2. गुट्टी कलम :- 1) कलमासाठी निवडलेल्या फांदीची साधारण एक ते दीड इंच लांबीची गोलाकार साल काढतात.
2) साल काढलेल्याजागी संजीवक लावतात.
3) नंतर त्यावर पल्सर सुतळी किंवा स्पॅग्नो मॉस ओले करून लावतात.
कारण :- कलम तयार करताना त्यात पाण्याचीआवश्यकता असते व ते पाण्यालास्पॉग्नोमॉस मधील पाणी
ज्यावेळी संपते त्यावेळी हवेतील आद्रता शोषून घेते व कलमाची पाण्याची गरज त्यातून भागवली जाते म्हणून
गुड्डी कलम करताना सुतळी वापरतात.
उदाहरण:- डाळिंब ,जास्वंद.


3. दाब कलम :- 1) माती व शेणखत याचे 3;1 या प्रमाणात मिश्रण करून ते कुंडीत घेतात .
2) पेरूच्या झाडाची जमिनी लगताच फांदी कलमासाठी निवडतात.
3) शेंड्या पासून दोन फूट मागील बाजू फांदीचे खालून एक दोन इंच तिरकस कट घेतात.
4) तिरकस काप घेतलेल्या ठिकाणी नारळाच्या कडी घालतात .
5) त्याच संजीव लावून तो भाग कुंडी मधील मातीत दाबून टाकतात.
6) दाबलेल्या भागावर वजन ठेवतात व कुंडीत पाणी घालतात.
उदाहरण -:- कागदी लिंबू , पेरू.
प्रात्याक्षिक क्रमांक 9 गाईचे वजन काढणे
उद्देश :- आपल्या गोट्यातील जनावरांचे वजन काढणे ,ज्याचा उपयोग आपल्याला खाद्य ठरवन्यासाठी होतो .
कृती :- जनावरांचे वजन काढणे हे ,

१. आपल्या जनावरांना दररोज जे खाद्य व पाणी देत असतो याचे प्रमाण ठरवणे यासाठी उपयोग ठरतो .
२. जनावरांची किंमत ठरवने .
३. जनावरांचे गर्भादारणेचे व प्रजननासाठी योग्य वय याविषयी माहिती मिळते .
* ग्रामीण भागात गाईचा वजण करता येईल, येवडा वजनकाटा उपलब्ध नसतो ,म्हणून सूत्राच्या
साहायाने वजन केले जाते .
* मीटर ठेपची आवश्यकता भासते .
.* गाईचे वजन काढण्याचे सूत्र :-
वज : – अ *अ *ब
————–
१०४१०
अ ) छातीचा घेरा .
ब ) लांबी शिंगापासून ते माकड हाडापरीयंत लांबी .
- सोनम गाईचे वजन
- 187 cm
- 157 cm
वजन 187*187*157
———————-
१०४१०
वजन :- 530 kg
- गौरी गाईचे वजन
वजन 155*155*182
———————-
१०४१०
वजन 493 gm
प्रात्याक्षिक क्रमांक-:- 10 दुधातील पाण्याची भेसळ ओळखणे .
उद्देश :- आपल्या दुधात पाण्याची भेसळ आहे ,की नाही हे ओळखणे . भेसाळयुक्त व शुद्ध दुधाची ओळख करणे .
साहित्य -:- दूध 20 ml,पानी 10 ml.
कृती -:- आपल्याला ज्या दुधाची तपासणी करायची आहे ,त्यात दोन्ही नमुन्याचे थेंम आपल्या घट्ट मुठीवर किंवा
काचेच्या पट्टीवर ठेवा ओघळू द्याय .

उपयोग :- 1) विक्रेत्याने दुधात पाणी वापरुन भेसळ केलेली आही की नाही हे ओळखता येते .
आयोडीन टेस्ट कृती :- तपासणी करायच्या दुधात आयोडीन टाकले असता ,ते जर निळ्या रंगाचे झाले तर ते
भेसाळयुक्त आहे असे समजावे .
* दूध आपल्या दोणी हातानं चोळयानंतर जर तेलकट झाले तर भेसाळयुक्त आहे असे समजावे .

* दूध उकळून आटल्यानंतर त्यात जर गाठी तयार झाल्या र भेसाळयुक्त आहे असे समजावे .
लिटमस पेपर टेस्ट :- तपासणी करायच्या दुधामधे सोयापवडर टाकावी व एकत्र करावे .
त्यात लिटमस पेपर बुडऊन जर त्याचा रंग बाधलला तर दूध भेसाळयुक्त आहे असे समजावे .
प्रात्याक्षिक क्रमांक 11 :- फवारणी करणे .

उद्देश :- वगवगळे झाडांवर फवारणी करणे .

साहित्य :- फवारनि करणारी मशीन ,पाणी , ml मध्ये मोजणाची बाटली ,वेगवेगळे फवारणी करणारे अवशाधे .

कृती :- 1) सर्वात आधी 10 लीटर पाणी मध्ये 15 ml पॉलीट्रीन सी 44miksमिक्स करून झाकण लावने .

२) जुने वाळलेले पान काडून टाकणे .



३) सगळं वरती नीट फवारणी करणे .

४) फवारणे मशीन धूऊन ठेवणे .

सेप्टी :- मास्क , हॅन्ड ग्लव्ज.
प्रात्याक्षिक क्रमांक 12 :- सापली लावणे.

उद्देश :- पिकाचे स्वरक्षण करणे.

कृती :- १) चिक्कीच्या आतून प्याक बसून घेणे .

२) त्या बाटलीतून दोरी कडून ,बसून घेणे .




३) झाकण लावून घेणे .
प्रात्याक्षिक क्रमांक :- 13 पिकाला लागणारी अन्नद्रव्ये .
NPK:- नत्र-स्फुरद-पालाश
- 19:19:19 :- पिकाच्या जोमदार वाढीसाठी
- 12:61:00:- फुटवा जास्त येण्यासाठी
- 18:46:00:- पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
- 12:32:16:- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी
- 10:26:26 :- फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी
- 00:52:34:- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी
- 00:00:50:- फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी,फळांचे वजन वाढवण्यासाठी,साईज वाढवण्यासाठी,चांगला रंग येण्यासाठी,टिकाऊपणा वाढवण्यासाठी.
उद्देश :- आपल्या पिकाला लागणाऱ्या विविद्या अन्नद्रव्यांचा अभ्यास करणे व त्यांचे प्रमाण ठरवणे .
पिकांच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये जाणून घेऊन, त्यांचा संतुलित पुरवठा केल्यास पिकाच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ मिळू शकते. त्यासाठी त्याच्या कमतरतेची लक्षणे जाऊन नेमकी उपाययोजना करावी. पिकांचे रासायनिक विश्लेषण केले असता, त्यात सुमारे ९० मूलद्रव्ये आढळतात. मात्र, ती ही सर्वच पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात असे नाही. ज्या अन्नद्रव्यांची कमतरता भासल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होतो, अशी १७ मूलद्रव्ये महत्त्वाची मानली जातात. त्यातील मोठ्या प्रमाणात लागणारी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही अन्नद्रव्ये पिकांना हवा व पाण्यातून मिळतात. उर्वरित १४ अन्नद्रव्ये जमिनीतून मिळत असतात.
* पीकवाढीसाठी आवश्यक मूलद्रव्ये ठरविण्याकरिता महत्त्वाच्या तीन बाबी -:-
1)मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकांची शाकीय वाढ आणि उत्पादन वाढ पूर्णपणे होत नाही.
2) प्रत्येक मूलद्रव्यांची कमतरतेची लक्षणे ही विशिष्ट प्रकारची असतात.
3) मूलद्रव्यांच्या पिकाच्या वाढीमध्ये घटक अन्नद्रव्य म्हणून प्रत्यक्षपणे सहभाग असला पाहिजे.
* पिकांच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये आणि त्यांचे स्राेत -:-
1) हवा आणि पाणी यामधून पुरवठा होणारी अन्नद्रव्ये कार्बन, हायड्रोजन ,O2.
* खतांमधून पुरवठा होणारी अन्नद्रव्ये -:-
1) मुख्य अन्नद्रव्ये -:- नत्र, स्फुरद आणि पालाश .
2) दुय्यम अन्नद्रव्ये -:- कॅल्शिअम, मग्नेशिअम आणि गंधक .
3) सूक्ष्म अन्नद्रव्ये -:- लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन, मोलाब्द, क्लोरीन आणि निकेल.
अ) मुख्य अन्नद्रव्ये यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नत्र, स्फुरद आणि पालाश या सहा अन्नद्रव्यांचा समावेश होतो. ही अन्नद्रव्ये पिकांकडून मोठ्या प्रमाणात शोषली जात असल्याने त्यांना मुख्य अन्नद्रव्ये असे म्हणतात. यापैकी प्राणवायू, हायड्रोजन आणि कर्ब ही अन्नद्रव्ये पिकांना अधिक प्रमाणात लागतात. मात्र, त्यांचा पुरवठाही जमिनीतील पाणी आणि हवा याद्वारे सहजपणे होतो. जैविक क्रियेमध्ये या तिन्ही मूलभूत अन्नद्रव्यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. पिकांच्या एकूण वजनापैकी सुमारे ९४ टक्क्याहून जास्त भाग या तीन अन्नद्रव्यांनी व्यापलेला असतो. याव्यतिरिक्त नत्र, स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये पिकांना मोठ्या प्रमाणात लागतात. जमिनीतील ओलाव्यामध्ये विद्राव्य व मातींच्या कणांवर अधिशोषित असणाऱ्या या अन्नद्रव्यांचा वापर पिकांच्या मुळाद्वारे केला जातो. जमिनीमधून या अन्नद्रव्यांचा होणारा पुरवठा साधारणपणे मध्यम ते कमी प्रमाणात असतो. पिकांची गरज भागविण्यासाठी सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा वापर आवश्यक असतो.
ब) दुय्यम अन्नद्रव्ये कॅल्शिअम, मग्नेशिअम आणि गंधक या तीन अन्नद्रव्यांना वनस्पतींची दुय्यम अन्नद्रव्ये म्हणतात. यांची गरज मध्यम प्रमाणात असते. तेलबिया पिकांखालील जमिनीमध्ये गंधकाची कमतरता मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
क) सूक्ष्म अन्नद्रव्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन, मोलाब्द, क्लोरीन आणि निकेल या आठ अन्नद्रव्यांचा समावेश होतो.
प्रात्याक्षिक क्रमांक :- 14 शेती विभागातील परिमापकांचा अभ्यास .
उद्देश :-शेत जमिनीच्या मोजणीचे विविध एकके समजून घणे व त्यांचा वापर करणे .
* 1 गुंठा -:- 33 * 33 फुट .
1 गुंठा -:- 1089 चौ ,फुट (33 * 33 ).
1 एकर -:- 40 गुंठे .
1 एकर -:- (1089 * 40) 43560 sq ,ft.
1 हेक्टर -:- 100 गुंठे .
1 हेक्टर -:- (1089 * 100 ) 108900 sq,ft.
*1 गुंठा -:- 10 मी * 10 मी . 1 गुंठा -:- 100 sq,m.
1 एकर -:-4000. sq,m. (100 * 40.
1 हेक्टर -:- 100 गुंठे .
1 हेक्टर -:- (100 * 100) 10000 sq,m.
प्रात्याक्षिक क्रमांक :- 15 पिकांना पाणी देण्याची पद्धत
उद्देश :- पिकांना पाणी देण्याची पद्धत समजून घेणे .
१) तुषार सिंचन
साहित्य :- नोझल, पाईप ,सॉकेट , एल टी , कॅप , फिल्टर .
कृती :-
१) सर्व पाईप पसरवणे
२) प्रत्येक दोन पाईप सोजन बसवलं
३) वळण्याचा जाग्यावर एल टी बसवलं
४) मोटरला नोझल बसवला व तिथे मेण पाईप लाईन जोडली नंतर मोटार चालू केली .

- काळजी :- पाईप लाईन करताना पाईप निसरले नाही पाहिजे .
२) ठिबक सिंचन
साहित्य :- स्टॅन्ड , स्किन फिल्टर , मेण लाईन , सबमेन लाईन , एअर वॉल , कॉक ..

कृती
१) मेण पाईप टाकली
२) त्याला सब मेण लाईन ऍरोमॅटच्या साह्याने जोडून घ्यावे .
३) मेण लाईन मध्ये एअर वॉल बसवणे .
४) स्टँड फिल्टर व स्क्रीन फिल्टर बसवणे .
५) मोटार चालू करण्याचे आधी ठिबक प्रत्येक झाडावर बुडापाशी आहे कि नाही ते चेक करा .
काळजी :- पाइपची जोडणी वेवस्थित करून घावी .
३) पाठ पाणी देणे.

साहित्य :- फावडे
कृती :- 1) फावड्याचा साह्याने पापण्यांच्या मार्ग मोकळा करावा .
2) प्रत्येक झाडाला पाणी भिजते कि नाही त्याची काळजी घावी .

* तोटा
१) पाणी जास्त वाया जाते.
२) खात द्यायला अडचण होते.
३) झाडांना खात वेवस्तीत भेटत नाही.
प्रात्याक्षिक क्रमांक 16 :- प्राण्यांना ओळखण्याचा पद्धती
उदेश :- प्राण्यांना ओळखण्याचा पद्धती
कृती :- १) गोंधने – म्हणजे आपण प्राण्यांना ओळखण्यासाठी त्यांच्या शरीरावर ट्याटू कडतो

२) बिला मारणे – म्हणजे आपल्याकडे जास्त प्राणी असल्यास त्यांचावर लक्ष नाही जात किंवा एखादा प्राणी हरवू शकतो म्हणुन त्यांना नंबर दिला जातो .

३) ब्राडींग – म्हणजे आपण जो नंबर देत असतो तो नंबर ग्राम करून त्यांचा अंगावर मारला जातो नंबर गरम करून मारताना 5 सेकंद पर्यंत टच करून ठेवला जातो
काळजी :- ब्रांडिंग करताना 4 सेकंद वर गरम केलेला सिका मांडीवर ठेवला नाही पाहिजे नाहीतर त्यांची मंडी जाळून त्यानं त्रास होईल .
प्रात्यक्षिक क्रमांक 17 :-पोल्ट्री मधील कोंबड्यांचा FCR (Feed corlversion Ratio ) खाद्याचे मास मध्ये होणारे
उद्देश -:- पोल्ट्री मधील पक्षांचे खाद्य व त्यापासून त्याचे मांसात होणारे रूपांतर याची माहिती घेणे.

*.खाद्याचे मासात होणारे रूपांतर

पाइलया दिवशी
1) FCR मधून आपल्याला कळते की, कोंबडीने किती खाद्य खाल्ल्यावर तिथे किती वजन वाढते हे कळते.

2) जसे वजनवाढते जाते, तसा FCR वाढत जातो.
3) जर आपले खाद्य व्यवस्थापन चांगले असेल तर आपल्या तेवढे आपले व्यवस्थापन

4) योग्य आहे हे समजावे FCR हा फक्त व्यवस्थापनाचा नाही तर आपल्या खाद्याची गुणवत्ता
5) पक्षाची गुणवत्ता यावर देखील अवलंबून असतो.

दुसऱ्या दिवशी
FCR चे सूत्र -:-
FCR= वाढलेली वजन/ मिळालली उत्पादनन / दिलेले खाद्य
* प्रात्यक्षिक क्रमांक -:- 18 रोप लागवडीची संख्या ठरवणे.
* उद्देश -:- आपल्या प्लॉट वरील मोजमापाचा वापर करून त्या प्लॉटवर किती रोप बसतील याची संख्या ठरवणे.
* साहित्य- मिटर टेप, नायलॉन दोरी, फक्की, टिकाव, फावडे, इत्यादी.
* रोप लागवडीची संख्या सूत्र –
सूत्र = क्षेत्रफळ
/ झाडातील अंतर
*तुती रोपाची लागवड करण्यासाठी प्लॉट तयार करणे. किचन मागील प्लॉटची लांबी -56ft, रुंदी -18ft प्लॉटचे
क्षेत्रफळ -:- लांबी× रुंदी
-:- 56ft ×18pt
-:- 1008sq. ft
* झाडांतील अंतर -:- 2ft×1.5ft
* तुती रोपाची संख्या -:- 1008/2×1.5=1008/3 =336
*त्या प्लॉटवर एकूण 336 तुतीची रोपे लागतील.
प्रश्न :- एका आंबा पिकासाठी तयार केलेला प्लॉटवर झाडांमधील अंतर आहे 10m×10m वर प्लॉट 40 गुंठे
आहेत तर त्या प्लॉटवर किती आंब्याची झाडे लागतील.
उत्तर:- प्लॉटचे क्षेत्रफळ -: 40 गुंडे प्लॉट =4046-8 sq, metre झाडातील अंतर=(10×10)मी
आंब्याच्या रोपाची संख्या = क्षेत्रफळ/ झाडातील अंतर
=4046.8/ 100
=40.4
40 गुंडे प्लॉटवर 40 आंब्याची झाडे लागतील.
* फळ झाडे लावण्याच्या पद्धती.
1) षटकोन – जंगलात केली जाणारी लागवड.
2)कंटूर लाईन – डोंगरा उतारावर फळा झाडांची लागवड.
3)चौरस-
4) आयत –
* प्रात्यक्षिक क्रमांक 19 :-मूरघास तयार करणे .
उदेश :- मूरघास तयार करण्यास शिकणे .
मूरघासा चे फायदे व तोटे समजून घेणे .
साहित्य :- मका , Rumiferm पावडर , पिशवी , सेलो टेप,
साधने :- टप , बादल्या , कुटी मशीन ,वीळे ,ट्रकटर .
कृती :- .

अट :- कापण्याची योग्य वेळ व दाना दुधावर आल्यावर किंवा कवळा असल्यावर कापणे.
1 मुरघास हात सहा ते दहा महिन्यापर्यंत टिकतो.
2 एक टन कुटीला 100 ग्रॅम रूमीफेरम पावडर लागते.
3 मुरघास मध्ये साठ ते सत्तर टक्के पाणी असते.
प्रश्न :-
1 मुरघास बनवण्याची पद्धत किती व कोणत्या :- मुरघास बनवण्याची पद्धती तीन.
1 ५० किलोची बॅग भरणे.
2 पाचशे ते हजार किलोची बॅग भरणे.
3 जमिनीत खड्डा खोदून त्यावर प्लास्टर करून घेणे नंतर दाबून कुटी भरणे व कल्चर
takne व प्लास्टिक नेता प्लास्टिक ताडपत्रीने झाकणे हा उपाय आहे
2 कोणकोणत्या पिकांचा मुरघास तयार होतो. :- मका, ज्वारी, कडवळ, बाजरी हत्ती
गवत या पिकांचा मुरघास तयार होतो.

अनुभव :- मुरघास कोणत्या पिकांचा बनवायचा ते समजले व कसा बनवायचा ते समजले.
पॅक करण्याची पद्धत समजली व त्याची प्रमाण समजले हा अनुभव आला.
एक बॅग = 43 kg 15 बॅगा भरल्या. तर टोटल मुरघास किती झाला.
43×15= 645 एकूण 645 किलो मोर घास तयार झाला. पाच तासांमध्ये.
.