मोटार रिवाइंडिंग

प्रस्तावना

इलेक्ट्रिक मोटार ही विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करणारे यंत्र आहे. मोटार दीर्घकाळ वापरामुळे किंवा ओव्हरलोडमुळे जळू शकते. अशावेळी मोटारचे कॉइल पुन्हा वळणे (Rewinding) आवश्यक असते. मोटार रिवाइंडिंग प्रक्रियेमुळे मोटार पुन्हा कार्यक्षम होते.

उद्देश

  • मोटार रिवाइंडिंग प्रक्रिया समजून घेणे.
    • जळालेल्या कॉइलची तपासणी करणे.
  • योग्य गेज वळण वापरून मोटार पुन्हा तयार करणे.

साहित्य1

  • जळालेली मोटार
  • कॉपर वायर (योग्य गेज)
  • इन्सुलेशन पेपर
  • व्हर्निश (Varnish
  • मेगर / मल्टीमीटर
  • स्क्रूड्रायव्हर, प्लायर्स

कृती

  1. मोटारचे कव्हर उघडून जळालेली कॉइल काढली
  2. स्लॉट साफ करून इन्सुलेशन पेपर लावला
  3. जुन्या कॉइलप्रमाणेच टर्न्स मोजून नवीन कॉपर वायरने वळण दिले
  4. कॉइल योग्यरित्या जोडली व कनेक्शन केले
  5. व्हर्निश लावून वाळवले.
  6. मेगरने इन्सुलेशन टेस्ट केली
  7. मोटार जोडून ट्रायल घेतली