2022 – 2023
विभागाचे नाव :- फूड लॅब
प्रोजेक्टचे नाव :- लिंबाचा squash
प्रोजेक्ट करणाऱ्याचे नाव :- गौतम ढेबे
साथीदाराचे नाव :- रवी वऱ्हे
मार्गदर्शकाचे नाव :- रेशमा मॅडम
प्रस्तावना : –
उन्हाळ्यात पेय म्हणून वेगवेगळ्या फळाचा सिरप squash म्हणून सरबत वापरला जातो. पण उन्हाळ्यात रसदार फळंही महाग असतात. ( लिंबू , संतरा , मोसंमबी , कलिंगड ) पण हिवाळ्यात हीच फळ स्वस्त दरात बाजारात मिळतात कारण हिवाळा हा थंडीचा ऋतु आहे . हिवाळ्यात रसदार फळांची मागणी कमी असते. पण हेच उन्हाळ्यात पहिले तर जास्त भाव असला तरी ही फळे सारबतासाठी विकत घेतली जातात म्हणून हिवाळ्यात स्वस्त असलेली फळाचा squashतयार करून त्यात जास्त प्रमाणत साखर वापरुन तो squash जास्त काळ टिकवता येतो साखर ही नैसर्गिक परिझरवेशन म्हणून पदार्थ जास्त काळ टिकवण्यासाठी शुद्ध साखर अथवा मीठ याचा वापर केला जातो
उदेश :- शुगर परिझरवेशन चा वापर करून वेगवेल्या फळाचा squash तयार करून ठेवणे
साध्य :- या प्रोजेक्ट मधून आम्हाला असे साध्य करायचे आहे . की आपला माल जास्तीत जास्त कसा पोहचेल .आणि आपल्याला कसा नफा होईल हे साध्य करायचे आहे
साहित्य :- लिंबू , साखर ,पाणी ,
साधने :- टोप , चाकू , कविलात ,गॅस ,प्लास्टीक जार ,लिंबाचा रस काढण्याचे यंत्र
निरीक्षण :- वेगवेगळ्या प्रोडक्ट बनवताना एकाच पदार्था पासून दूसरा पदार्थ तयार करता येतो .
उन्हाळा या ऋतु मध्ये याची जास्त मार्केटिंग होते .
लिंबाचा squash लवकरत लवकर बनवता येतो
लिंबाचा रस मानवाच्या शरीरास भरपूर उपयोगी असतो
लिंबापेक्षा लिंबाचा squash जास्त दिवस टिकतो
अडचण :- आम्हाला लिंबाच्या रस काढण्याच्या यंत्राने लिंबातून पूर्ण रस काढला जात नसल्याने लिंबाच्या फोडीतील रस हाताने काढावा लागला
दूसरा कोणताही पदार्थ टाकल्याने squashची चव बदली जात होती
प्रॅक्टिकलमद्धे squash बनवला होता विद्यार्थ्याने तो प्रोडक्ट ग्राहक स्वीकारतील का हा प्रश्न अडचण करत होता
फायदे :- लिंबाच्या रसाने खालेले अन्न पचायला लागते व पोट साफ होते
वजन कमी करण्यासाठी .
त्याने रोगप्रतिकार शक्ति वाढते
लिंबा मध्ये जीवन सत्व असतात महणून उपयोगी .
कृती :-
- सर्व प्रथम ताजे पिवळसर लिंबू निवडले .
- व पातळ सालीची लिंबू घेतले .
- नंतर स्वछ्य धुवून घेतले
- एका लिंबाचे दोन भाग केले
- यंत्राच्या साह्याने लिंबाचा रस काढून घेतला
- काढलेला रस गाळून घेतला
- लिंबाच्या रसाचे वजन केले
- मग साखरेचा पाक तयार करून घेतला.
- त्या पाकात लिंबाचा रस मिक्स केला
- तयार झालेल्या squash मध्ये सोडीयम बेजऑइड हे प्रीझर वेशन घालावे
- Squash बोटल मध्ये भरून स्टोअर केला
अनुभव :- लिंबाचा squash बनवण्यास शिकलो
हे एक प्रकारचे फळ पेय आहे ज्यामध्ये कमीत कमी 25% फळांचा रस किव्हा लगदा आणि 40 ते 50% एकूण विद्रव्य घन पदार्थ असतात . त्यात 1.0% आम्ल आणि 350 पीपीएम सल्फर डायऑक्साईड किव्हा 600 पीपीएम सोडियम बेर झोएट देखील आहे . सर्व करण्यापूर्वी ते पातळ केले जाते .
squash बनवण्यासाठी आंबा , संत्री आणि अननसाचा वापर व्यावसायिकरित्या केला जातो . हे लिंबू , चुना , बेल , पेरू , लीची , नाशपाती , जर्दाळु , पुमेलो , कस्तूरी खरबूज , पपई इत्यादीपासून देखील तयार केले जावू शकते . पोटॅशियम मेटाबिसल्फाईट संरक्षक म्हणून वापरुन किव्हा जामून , पॅशन- फ्रूट , पीच , फळसा , प्लम , तुती , रास्पबेरी , स्ट्रॉबेरी , ग्रेपफ्रूट ई ., सोडियम बेंझोएट संरक्षक म्हणून .
कॉस्टिंग :-
अ.क्र | मटेरियल | प्रमाण | दर | किंमत |
1 | लिंबू | 6 kg | 20 rs / 1 kg | 120 |
2 | साखर | 5 kg | 37 rs / 1 kg | 185 |
3 | गॅस | 360 gm | 1050 rs/ 14200 gm | 26.61 |
4 | कॅन्ड | 2 नग | 50 rs / 1 नग | 100 |
Total = | 431.61 | |||
मजुरी | 35% = | 151.06 | ||
एकूण | Total = | 582.67 |