प्रकल्पाचे नाव: हायड्रोपोनिक तंत्रज्ञान

विद्यार्थ्याचे नाव : विशाल सुरूम

सहभागी विद्यार्थी : 1.ऋतिक टेमकर .

                                  2. आकाश कोंकणे

मार्गदर्शक : श्री भानुदास दौंडकर सर.


उद्देश

  • शेतीतील नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घेणे.
  • माती विना शेती करणे.
  • कमी जागेत जास्त उत्पन्न घेणे.
  • वेगवेगळ्या हायड्रोपोनिक्सचे प्रकार समजून घेणे.

नियोजन

  1. सर्वप्रथम प्रकल्प समजून घेतला.
  2. उद्देश समजून घेतला.
  3. साहित्य साधने गोळा केली.
  4. जागा निश्चित केली.
  5. पिक निश्चित केले.
  6. प्रकल्पावर काम सुरू केले.

न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक (NFT):

  • ही एक प्रकारची हायड्रोपोनिक प्रणाली आहे जी पौष्टिक-समृद्ध पाण्याची पातळ फिल्म वनस्पतींना पोषक द्रव्ये वितरीत करण्यासाठी वापरते. 
  • वनस्पतींची मुळे सतत पोषक द्रावणात बुडलेली असतात, ज्यामुळे त्यांना वाढण्यासाठी आवश्यक असलेले सर्व काही मिळते.
  • यामध्ये pH हा 6.5 असावा. 
  • तसेच TDS हा 1000 ppm ते 1200 ppm दरम्यान असावा लागतो. 

आवश्यक पोषक घटक :

खत मात्रा 
19:19:193 gram
KNO3 3 gram 
NH4NO3 ( NH3 = 1.4 gram + HNO3 = 2.6gram )2 gram
MgSO42 gram 

NFT चे फायदे

1.कमी पाणी आणि पोषक तत्वांचा वापर.

2.मुळे आणि सेटअप निर्जंतुक करणे सोपे आहे. 3.मुळांची गुणवत्ता आणि आरोग्य पाहण्यास सोपे. 4.सातत्यपूर्ण प्रवाहामुळे मुळांच्या भागात मीठ जमा होण्यास प्रतिबंध होतो.

5. पुनर्परिवर्तन, त्यामुळे किमान भूजल दूषित. 

6.खूप मॉड्यूलर आणि विस्तारण्यायोग्य.

7. वाढीसाठी जास्त मटेरियल लागत नाही.


खर्च

अ. क्रसाहित्य किंवा साधनेनगदरकिंमत
1.हायड्रोपोनिक्स कप25010 रुपये 2500 रुपये 
2.कोको पीट1.750Kg12.5 रुपये 218.75 रुपये 
3.पालक रोप2500.25 रुपये 62.5 रुपये 
एकूण2781.25 रुपये 

कृती :

  1. सर्वप्रथम जुना हायड्रोपोनिक स्वच्छ करून घेतलं.
  2. प्रकल्पासाठी आम्ही NFT म्हणजेच न्यूट्रियन फिल्म टेक्निक ही पद्धत वापरली.
  3. हायड्रोपोनिक्स कप स्वच्छ करून घेतले.
  4. प्रत्येक कपात कोको पीट भरून घेतले.
  5. सिडलींग ट्रे मधील पालकची रोपे हायड्रोपोनिक्स कप मध्ये लावली.
  6. न्यूट्रियंट वॉटर ची सायकल सुरू केली.
  7. रोपांचे निरीक्षण केले.

निरीक्षण

  • रोपांची वाढ जलद होते.
  • प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात मिळते.
  • बाजारात किंमत चांगली मिळते.


अनुभव :

माती विना शेती कशाप्रकारे केली जाते ते समजले. कमी जागेत जास्त उत्पन्न आपणही घेऊ शकतो असा आत्मविश्वास मिळाला तसेच शेतीसाठी भरपूर जागा पाहिजे असं काही ना नसून नवीन तंत्रज्ञान वापरून आपण शेती करू शकतो हे समजलं. नवीन तंत्रज्ञान शिकण्यास मिळाले. यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते तसेच जागाही कमी लागते.