लिंबाचे लोणचे (गोड )

लिंबाचे लोणचे बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-

1 ) लिंबू(400 ग्रॅम)

2) तीनशे ग्रॅम गूळ

3) 3 चमचे राई डाळ

4) 3 चमचे लाल तिखट

5) 1/2 पळी तेल

6) 2 चमचे हळद

7) 2 चमचे मीठ

साधने :-

गॅस , कढई ,परात ,वाटी ,चमचा , चाकू , पक्कड , वजन काटा ,ताट ,पॅकिंग बॉटल. इ

कृती :- 1) प्रथम लिंबू स्वच्छ धुऊन गरम पाण्यात पाच मिनिटे ठेवावे नंतर चाळणीत काढून पूर्ण वाफ गेल्यावर स्वच्छ पुसून घेणे .

2) नंतर त्याचे तुकडे करून त्यात मीठ व हळद घालून मिक्स करावे व एक किंवा दोन दिवस तसेच ठेवून द्यावे पण रोज वर खाली करावे.

3) दोन दिवसानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात थोडे तेल घालावे व ते गरम झाल्यावर गॅस बंद करून प्रथम मेथीचे दाणे व नंतर राईची डाळ घालून चांगले परतून घ्यावे ते चांगले शिजल्यावर त्यात गुळ व मिरची पावडर घालून, गुळ विरघळल्यानंतर सर्व फोडी त्यात घालून घ्याव्यात.

4) मिश्रण सर्व एकजीव करून दहा ते पंधरा मिनिटे बारीक गॅसवर चांगले उकळून द्यावे पण ते सारखे परतत राहावे कारण ते खाली लागू नये म्हणून वीस मिनिटानंतर गॅस बंद करून थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवावे.

लिंबाच्या लोणच्याचे फायदे :-

1)रोगप्रतिकार शक्ती वाढते

2) रक्तदाब नियंत्रित राहतो

3)हाडे मजबूत होतात

4)पचनशक्ती सुधारते

लोणचे कॉस्टिंग :-

क्र मटेरियल वजन दर /kg किंमत
1 लिंबू 1.50 kg 38 रू 57
2 गूळ 1 kg 45 रू45
3 मीठ 50 gm 15 रू0.75
4 हळद 25 gm 200 रू5
5 लाल मिरची पावडर 50 gm 450 रू22.5
6 मोहरी डाल 25 gm 400 रू10
7 गॅस 30 gm (20 min )1110 रू/14200 2.34
8 पॅकिंग बॉटल 6 बॉटल 20 रू/1 बॉटल120
आलेला खर्च 252. 59
मजुरी 35 %91.90
एकूण खर्च 354.49