1.प्राण्याचे दुध काढणे व स्वच्छता करणे



गाई चे दुध काडीने
1)गाईची स्वच्छता= गाईची बसायची जागा स्वच्छ असावी व दुधाची वेळा(
(12 तास ग्याप आसावा ) वेळ बदलू नये.
(2) दुध काढणारा माणूस
= हातपाय स्वच्छ
= व्यसन नसावे
(3) दुधाची किटली, बादली, माप स्वच्छ असावं.
दुध काढण्याचे प्रकार
1) हाताने
2) मशीनच्या सहाय्याने
( गाई गोठ्याची स्वच्छता )
गाईचा गोठा का साफ ठेवावा
1) गाईचा गोठा साफ नसेल तर गाईला वेगवेगळे आजार होतात त्यामुळे दुध उत्पादणात कमतरता येते व गाईच्या औषधाचा खर्च वाढतो.
2)गोठा साफ ठेवण्याचे फायदे
गोठा साफ असल्यावर गाईल आजार होतं नाहीत गाई निरोगी राहतात व दुध चांगल देतात व कासेचे आजार होत नाहीत.
3) गाईच्या कासेला होणारे आजार व लक्षणे.
दगडी यात गाईची कास कडक होते.
मस्टडी गाईची कास सुजते.
- फळबाग पिंकाचा अभ्यास करणे

फळबाग पिंकाचा अभ्यास करणे ते शीकलो
लागवडीची पद्धती
चौरस पद्धत,आयत पद्धत, त्रिकोण पद्धत,षटकोन पद्धत, डोगर उतार पद्धत.
चौरस पद्धत
3 बाहे 3 झाडे लावणे
आयत पद्धत
झाडां मधील अंतर ओळीत मधील अंतर वेगळे
त्रिकोण पद्धत
त्रिकोण आकारात झाडे लावणे व त्यात जास्त झाड बसतात.
षटकोन
षटकोन आकारात झाडे लावणे ही पद्धत अवघड जाते
डोगरी पद्धत
डोगरावर बाजून चर खणून झाडे लावतात
3.गाईचे वजन काढणे



गाईचे वजन काढणे
कृती= माकड हाडापासून शेपटी पर्यंत इंच मोजून छातीचा घेरा मोजला
गाईच्या वासराचे वगाईचे वजन)
4.मुरघास बनवन

मुरघास बनवन मक्या पासुन
उद्देश= ज्यावेळी जनावरासाठी हिरवा चारा कमी पडायला लागतो त्यावेळी आपण आपल्या जनावरांनसाठी मूरघास बनवून साठवून ठेवू शकतो व अडचणीच्या वेळी तो चारा जानवरांना देऊ शकतो.
साहित्या= गुळ, मीठ, मीनरल मिक्चर, मक्याची कुटी
कृती= मक्याची कुटी त्यानंतर 3 टनच्या बॅगेत ते भरून त्यात मीठ गुळ आणि मीनरल पावडरचा थर दिला व मुरघास बॅगेत दाबून बसवला व हवाब हवाबंद केला.
5.शेतीचे मोजमाप करणे


शेतीचे मोजमाप करणे
गुंठा 33×33 फुट =1089 चौ फुट
एकर =40 गुंठे =40×1089=43560 89ft
हेक्टर = 100 गुंठे =1089×100=108900चौ फूट.
- रोप लागवडीची संख्या ठरवणे

- रोप लागवड करने
- 7. मती परीक्षण
1)माती ही पृथ्वी वरील एक थर आहे
2) माती हे खनिज, हवा, पाणी, सेंदय पदार्थ आणि अनेक जीवाणू चे मिश्रण आहे.
3) माती ही झाडाला पोषण देण्याचे व आधार देण्याचे काम करते
4) मातीचा PH 7 ते 9 दरम्यान असावा.(Patentied on Hydragen)
5) माती परीक्षण नागरणीच्या आगोदर करणे
6) हंगामी पिके =20cm भाजीपाला = 30 cm फळपीके = 100cm
( माती परीक्षण का)
1) जमिनीची सुपीकता टिकवते
2) सतुलित खतांचा वापर आणि खताची बचत
3) अन्न द्रव्यांचा समतोल राखणे
( मातीचा नमूना केव्हा घ्यावा)
1) मातीचा नमूना पीक काढणी नंतर आणि नांगरणीच्या आधी घ्यावा
2) पिकांमधील 2 ओळ ओळीच्या मधून माती घ्यावी
( माती परीक्षण म्हणजे काय)
1)माती परीक्षण म्हणजे जमिनीतील अंगभूत रसायने आणि जैविकांचे
विश्लेषण होय
2) माती परीक्षणामध्ये जमिनीचा पिकांना निरनिराळी अन्नद्रव्य पुरवठा करण्याची क्षमता म्हणजेच सुपीकता आणि आरोग्य तपासले जाते
(माती परीक्षणाचे फायदे)
1) माती परीक्षण केल्याने जमिनीतील अन्नद्रवे आणि जमिनीचे दोष समजतात आणि त्याप्रमाणे नियोजन करता येते
2) जमीन अम्लारी किंवा विग्लारी हे समजते त्यानुसार पिंकाची निवड आणि खतांचे नियोजन करता येते
(नमुना तपासणी साथी देताना घेण्याची काळजी)
1) नमुना क्रमांक
2) नमूना घेतल्याची दिनांक
3) शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव
4) गाव,पोस्ट,जिल्हा, तालुका
5) सर्वे किंवा गट क्रमांक
6) नमुन्यांचे क्षेत्र
7) बागायत किंवा चिरायत
8) मागील हंगामातील पिके आणि वान
9) पुढील हंगामातील पीक आणि वाण
10) जमिनीचा उतार किंवा सपाट
11) पाण्याचा निचरा बरा किंवा वाईट
8.जागा व रोपांची संख्या काढणे

जागा व रोपांची संख्या काढणे
9 . FCR काढणे


- बिज् प्रक्रिया

बीज प्रक्रिया म्हणजे काय?
पेरणीपूर्वी बियांवर जी प्रक्रिया केली जाते त्याला बीज प्रक्रिया म्हणतात.
बीज प्रक्रिया करण्याचे फायदे
1) बिया यांचा कडकपणा जातो.
2) बियांची उगवण क्षमता वाढते
3) जमीन असणारे बुरशीजन्य रोग पिकाला लागत नाहीत
4) बियांची साठवन क्षमता वाढते
( बीजप्रक्रियाची प्रकार )
1) भौतिक पद्धत= एका बादलीत पाणी भरून बी त्याच्यामध्ये टाकले
2) रासायनिक पद्धत = मँगोझेप कार्बनडाझीन सर्फर या रसायनांचा वापर करून बीजप्रक्रियेसाठी केला जातो.
कशाची काळजी घ्यावी= हात मोजे घालावे, मास्क लावावा, हात पाय स्वच्छ धुवावे.
उदा = ज्वारीच्या 10kg बीयान्याला 20gm गंधक चोळावे
उदा= कांदे किंवा भाताची रोपे M45 च्या द्रावणास बुडवून करपा टाळता येतो.
याचा फायदा = उगवण क्षमता वाढते जमिनीत असणारी आजार पिकास होत नाही व रोपे कमी मरतात.
(जैविक बीज प्रक्रिया )
ट्रायकोडोमा जैविक बुरशीनाशकाचे काम करतो रायझोबिअम हे डुई दल
पिकांमध्ये नत्र स्थिरकरणाचे काम करते.
फायदे = माणसाला व निसर्गाला कोणताही धोका नसतो.
- पिकांना पाणी देण्याची पद्धत
( पाणी देण्याच्या पद्धती)
1) पारंपारिक पद्धत
2) आधुनिक पद्धत
( पारंपारिक पद्धत )
मोकाट पद्धत, सपाट वाफा पद्धत, सरी वरभा पद्धत, वाफा पद्धत.
(आधुनिक पद्धत)
1) ठिबक सिंचन इंन लाईन व आऊट लाईन इन लाईन हे मल्चिंग पेपरच्या आत व आऊट लाईन झाडाच्या मुळाजवळ.
लॅटल = ठिबकचा पाईप शेवटच्या टोकाला लागणारे साधन एडकॅप.
पाणी देण्यासाठी ड्रपर.
2) तुषार सिंचन = गार्डन मध्ये उपयोगी येते आणि ज्या ठीकाणी दाट पीक आहे तेथे जास्त उपयोग होतो.
1)ठिबक सिचन म्हणजे काय
पीकांचा झाडाच्या मुळाशी लहानशा नळी द्वारे थेंब थेंब किवा बारीक घारेणे
पाणी देण्याची आधुनिक पद्धत होय.
शोध कोणी लावला = ठिंबक चा शोध इस्राईल मधील सीमचा ब्लास यांनी लावला.
साहित्या = PUC पाईप, ग्रोमेक, टी, एल, जॉईडर, रबर,ड्रीपर, एडकॅप, कैक, पिन.
फायदे = पाण्याची बचत होते, झाडाला पाहिजेल तेवढेच पाणी जाते, तण वाढ कमी होते, पाणी जमीनीत न जाता झाडाच्या मुळापाशी जाते.
( तुषार सिंचन )
PUC पाइपला जोडलेला स्पीकलर नोइल द्यारे पाण्याचा दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाते त्या स तुषार सिंचन म्हणतात.
फायदे = श्रम खर्च कमी करते, उत्पन्न वाढण्यास मदत, 30% ते 50% पाण्याची बचत, सर्व प्रकारच्या मातीसाठी, वापरले जाते, विद्रव्य खते व रासायनिक खते वापण्यास शक्य होते.
- वजनावरून खादय देणे


वजनावरून खादय देणे गाईचे शेळीचे
13. किड नियंत्रण

. किड नियंत्रण झाडावर कोण ती कीड आली
1) भौतिक पद्धत
नांगरणी खोल करणे, आधीच्या झाडाचे अवशेष न ठेवणे कुरतडलेले पाने तोडूण जाळून टाकणे.
2) रासायनिक पद्धत
रसायनाच्या वापर करून किडीवर नियत्रण केले जाते उदा: डायमीथोइट (केमीकल) चिकट सापळे. फळमाशी ला आकर्षित करण्यासाठी केला जातो
3) जैविक पद्धत
जैविक घटकांचा वापर करून किडीवर नियंत्रण केले जाते उदा: दशपर्णी अक्र ब्युवेरीआ बसथाना ( उण्णी, थ्रीप्स) यासारख्या किडीवर नियंत्रण करणे
- 15.पालन शेळी


पालन शेळी व शेळीपालन प्रकार
शेळीपालन प्रकार
1) मोकाट शेळीपालन
मोकाट शेळीपालनात खाद्याचा खर्च होतं नाही पण चाऱ्या साठी लांब जावे लागते व त्याना रानात चरण्यासाठी मोकळ्या सोडतात व आजार होतात.
2) अर्ध बंदीस्त शेळीपालन
यामध्ये शेळ्याना गोठ्यात खाद्य टाकल जात अर्धा दिवस हे रानात मोकळ्या सोडतात.
3) बंदिस्त शेळीपालन
शेळ्याचं खादय एका ठिकाणी दिलं जात व शेळ्यावर लक्ष देणे सोपे जाते आणि शेळ्या कमी आजारी पडतात.
16.शेळीच्या जाती

शेळीच्या जाती
(1) उस्मानाबादी महाष्ट्रातील उगमस्थान जुळे देण्याची क्षमता 70% ते80% 10% शेळ्या 3 किवा 4 पिल्लाना जन्म देतात कोणात्याही वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता असते.
(2) संगमनेरी = महाराष्ट्रतील संगमनेर जिल्हातील उगमस्थान जुळे देण्याचे प्रमान 50% 40% शेळ्या एकाच पिलाला जन्म देतात.
(3) कोकण कन्याळ = डॉ बाळासाहेब सांवत कृषी विद्यापीठ तयार केलेली जात कोकणातील उष्ण आणि दमट वातावरणात तग धरुन राहते.
(4) आफ्रिकन बोर = मांस उत्पादनासाठी ही जात प्रचलीत आहे चांगली काळजी घेतल्यास 200gm प्रती दिवस प्रमाणे करडे वाढतात.
(5) सानेन = जगात दुधाची राणी म्हणून ओळखली दिवसात 2 ते3 लिटर दुध देते.
( शेळ्याचे शेड कसे असावे )
1) गोठा उंच ठिकाणी असावा
2) पाण्याचा निचरा होणारी जमीन
3) बाजूला झाडे असावी
4) गोठ्यावर जाण्याचारस्ता असावे
5) गोठ्या शेजारी लाईटची सोय असावी
6) गोठा A आकारात बांधावा
( शेळीचे आयुष्या )
शेळीचे आयुष्य 12 ते 15 वर्ष असते त्यातील 8 वर्ष चांगले उत्पादन देते शेळीचा गर्भ काळ 5 महीन्याचा असतो 150 दिवस असतात.
पहिल्यादां माजावर येण्याचा काळ 4 ते 5 महीने.
शेळीचे वय 10 ते15 महीण्याचा होईल इतक्यात गाभन करावी
- आद्रता चेबर

1) भाजीपाला नर्सरी मध्ये बियांची उगवत लवकर येणे काय केले जाते.
बियाचे ट्रे एकावर एक ठेऊन त्यावर कापडाने झाकून त्याच्यावर बल्ब लावला जाते यालाच भट्टी लावणे असे म्हणतात.
झाडे उगवण्यासाठी लागणारे घटक = पाणी, आर्द्रता, उष्णता.
(वनस्पती प्रसाराच्या पद्धती )
1) बीया = झाडाच्या बीया लावल्या नंतर अनेक रोप तयार होते वनस्पती प्रसाराचा मुख्य घटक आहे.
2) झाडांची फांदी = झाडाचा पान, पानफुटी, ब्रम्हकमळ
( काही वनस्पतीचा प्रसार मुळान पासुन होतो )
रताळ, बटाट, बांबू
- हायड्रोपोनिक्स


हायड्रोपोनिक्स मंजे कमी जागेत् शेती करने
हायड्रोफोनिक शेती ही मातीशिवाय रोपे वाढवण्याची एक पद्धत आहे वनस्पतीला वाढवण्यासाठी लागणारी आवश्यक द्रव्य पाण्यातून दिली जातात. घरामध्ये टेरेसवर घराबाहेर केले जाऊ शकते त्यामध्ये पालेभाज्यांपासून टोमॅटोपर्यंत विविध भाजीपाला व फळ पिके घेऊ शकतो.
साहित्य = पाईप,मोटर, पाणी, खत, स्टाँड, कप, कोकोपीठ.
हायड्रोपोनिक्स चे प्रकार
DWC, वीक सिस्टीम, NFT, एरो फोनिक्स, एफ आणि स्लो.
फायदे = पाण्याची बचत, जागेची बचत, उत्पन्न जास्त मिळते, माती दूषितता, जलदवाढ.
- पोल्ट्री




(अंडी देण्याऱ्या कोंबड्याच्या जाती)
1)व्हाईट लेग हॉर्न
वैशिष्ट्य = हा पक्षी वजनाने हलका असतो
दिसायला रुबाबदार, फ्रेश, सडपातळ व उंच असतो
अंडी उत्पादन =13 ते 14 महीने अंडी देण्याचा काळ जोरात असतो
300 ते 324 अंडी वर्षाला देतो
अंडे 50 ते55 ग्रॅम वजनाचे भरते
85% उत्पादन क्षमता असते
2) BV300( व्यंकी)
वैशिष्ट = हा पक्षी अतीशय काटक आहे
सहसा हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारांना बळी पडत नाही
दिसायला रुबाबदार, फ्रेश सडपातळ व उंच असतो
अंडी उत्पादन 13 ते14 महिने अंडी देण्याचा काळ जोरात असतो
350 पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतात
अंडे55 ते60 ग्रॅम वजनाचे भरते
15% उत्पादन क्षमता असते
3) बोन्स
वैशिष्ट = हा पक्षी वजनदार असतो
हा पक्षी BV300 एकढा कणखर नाही
दिसायला रुबाबदार फ्रेश सडपातळ व उंच असतो
अंडी उत्पादन =13 ते14 महिने अंडी देण्याचा काळ जोरात असतो.
350 पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतात
अंडे 65 ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचे भरते
90% उपाह उत्पादन क्षमता असतो
4) हायलाईन
वैशिष्ट = हा पक्षी वजनाने हलका असतो
हा पक्षी कनखर असतो
दिसायला रुबाबदार, फ्रेश, सडपातळ व उंच असतो
अंडी उत्पादन =13 ते14 महिने अंडी देण्याचा काळ जोरात असतो
350 पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतात
अंडे 50 ते 55 ग्रॅम वजनाने भरते
85% उत्पादन क्षमता असते
( अंड्यावरील कोंबड्यांचे शेड )
लेअरच्या कोंबड्या पिंजऱ्याची उंची सात ते आठ फूट उंच असते दोन पोलचे अंतर 10 ते 20 फूट असते कोंबड्यांना खाद्य खाण्यासाठी गव्हाण पिंजऱ्याला बांधलेली असते विस्टेंशी संबंध येत नाही
( ब्रूडिंग )
ब्रूडिंग का करायची = कोंबडीला जिवंत राहण्यासाठी ब्रूडिंग केली जाते कारण वातावरणातील तापमान पिल्लांना सूट होत नाही यासाठी ब्रूडिंग करावी.
ब्रूडिंग कशी करावी = सुरुवातीला भाताची साळ टाकून दोन इंचाचा थर लावून त्याच्यावर त्याच्या बाजूला चिक गार्ड पेपर लावून वरती बल्ब व झाप लावणे व सर्व बाजूंनी काळा कागद लावावा आतील हिट बाहेर येणार नाही याची काळजी घ्या

( बॉयलर पक्षी )
बॉयलर चे खाद्य खाद्य प्रकार
पक्षाचे वय
0-7 दिवस प्री स्टार्टर
7 ते 21 दिवस स्टार्टर
22 ते 42 दिवस फिनिशिंग

- पिकांना लागणारे खते


खताचे प्रकार व पिकांना लागणारे खते
रासायनिक खते, जैविक खते, जिवाणू खते
रासायनिक खते = रासायनिक खतांचा वापर करून झाडांना लागणारे नत्र स्फुरद पालाश गंधक अन्नद्रव्यांना एकत्र करून घन पदार्थात रूपांतर केले जाते.
काही अन्नद्रव्य मिश्र स्वरूपात असतात काही संयुक्त स्वरूपात असतात
रासायनिक खताचे प्रकार
संयुक्त खतं खते यामध्ये खतामधून एकच घटक पिकांना मिळतो
युरिया (46% नायट्रोजन )
- पोलिहाउस

1) पोलीहाउस म्हणजे काय
पोलीहाउस म्हणजे पॉलिथिन पासून बनवलेले संरक्षणात्मक छाया घर होय खरंतर पॉलिहाउसचा उपयोग उच्च किंमतीच्या कृषी उत्पादनासाठी केला जातो याची रचना साधारणतः अर्धवर्तुळकार चौरस किंवा आयत आकारात असते.
2) पोलीहाउसचे प्रकार किती व कोणते
ग्लास हाउस,शेडनेट हाउस, पॉलीहाउस
3) ग्रीन हाउस व पोलीहाउस फरक काय
ग्रीन हाउस काचेच्या किंवा पॉली कार्बोनेट पॅनल्सचे बनलेले असतात तर पॉलीहाउस प्लास्टिकच्या शीटिंगचे बनलेले असतात.
ग्रीनहाउस=हरितगृह म्हणजे वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी सर्व भिंती व पूर्ण छात्र पारदर्शक असणारी असते.
4)पॉली हाउस चे फायदे
पॉलीहाउस मधील पीके भरभर वाढतात व जास्त उत्पन्न मिळते व त्याच्या वर कमी रोग पडतात.
वातावरणाचा जास्त फरक पडत नाही.
(हवामान नियत्रणावर आधारीत प्रकार)
1)GH1= नैसर्गिक रित्या हवेशीर पॉलीहाउस
2)GH2= फॅन आणि पॅड असतात
3)GH3 = ॲटोमायझेशन फॅन आणि पॅड आणि फोगर
14. पीकना नुकसान करणारे घटक
( किडी, रोग, वायरस, जंगली प्राणी, सरपनारे प्राणी, पक्षी.
1) पक्षी = पक्षी दाणेदार दाणे खाऊन पीकांचे नुकसान करतात.
2)मूशक वर्गीय प्राणी = उंदीर व ससा मुळ्या खातो केव्हा जमीनी खालील पिके खातो व किटक खातो ( उदा:- गहू, भुयमूग,गाजर )
3) जंगली प्राणी = हत्ती, रानडुक्कर, रानगवे हे रात्रीच्या वेळी पीके खातात व तुडवतात व नुकसान करतात.
4) व्हायरस= व्हायरस हा थ्रीप्स मुळे येतो.
5) कीड = दोन प्रकार रस शोषणारी कीड व पाने खाणारी कीड
(1) रस शोषणारे कीड ही पानावर बसून सोडेच्या सहाय्याने पानाचा रस शोषुन घेतात उदा:- थ्रीप्स, मावा, तुडतुडे.
(2) पाने खाणारी कीड= पानावर बसुन पाने खातात उदः – नाकतोडा
(अळी)= नाग अळी ही पानातील आतील गाभा गर खातात.
(अमेरिकन लष्करी अळी)=ही पीकाचा खोडातील गाभा खातात.
( फळ पोखरणारी अळी ) = काही अळ्या फळातील गाभा खातात.
22.ऊती संवर्धन (Tissue culture)
वनस्पती उती संवर्धन
रोपट्यातील अथवा झाडातील काही महत्त्वपूर्ण पेशी टिकवण्यासाठी तात्या वाढविण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जातो याला प्लांट टिशू कल्चर असे म्हणतात.
वनस्पतीच्या वाढीसाठी काही पोषक द्रव्य आवश्यक असतात पोषक द्रव्यात सर्वसाधारणपणे सोडियम व पोटॅशियम आयन ऊर्जेसाठी ग्लुकोज ( शर्करा प्रक्रियेसाठी विकरे आवश्यक अमिनो आम्ले काही संप्रेरके पाणी आणि कार्बन डायऑक्साइड मिश्रित हवा यांचे मिश्रण असते यालाच वृद्धी मिश्रण म्हणतात.
वनस्पती उती संवर्धन म्हणजे वनस्पतीच्या पेशी उती किवा अवयवाची निर्जंतुक स्थितीमध्ये निगा राखण्यासाठी किवा वाढवण्यासाठी वापरल्या
जाणाऱ्या तंत्राचा संग्रह आहे.
वनस्पती उती संवर्धनाचे फायदे
वनस्पतीचे अवयव कीटक आणि बुरशी रोधक पोषक द्रवे विकसीत केली
जाते हे खास करून चांगल्या फुलांच्या, फळांचे उत्पादन किंवा इतर इष्ट गुणधर्म असतेल्या वनस्पीचे क्लोन तयार करते.
बियाने नसलली फळे बियाणे नसलेली फळे बियाण्याच्या उत्पादनासाठी आवश्यक परागीभवन न करता अनेक वनस्पतीचे निर्मिती होते. या तंत्रात जनुकीय बदल केले जातात संपूर्ण रोप एकाच पेशीतून बांधता येते या तंत्रामुळे रोग प्रतिरोधक कीटक आणि मजबूत प्रतिरोधिक जाती निर्माण होऊ शकतात. प्रत्येक पेशीत संपूर्ण विकसित करण्याची ताकद असते याला पूर्ण निर्मिती क्षमता असे म्हणतात. या पद्धतीने वनस्पतीचे पुनर्वापर करता येतो.
महाराष्ट्रातील प्रमुख तने व तन नियंत्रण
जखम जोडी, नकटी,धोतरा,काँग्रेस, गाजर गवत,पाथरी,सदाफुली, दीपमाळ, लांडगा,खांदा खुळी,तरोटा, कुरडू,काळी कामुनी,काटे, तांदूळजा चुपके,लव्हाळा, उंदीर कारणी, अमरवेल,हारळी,आघाडा, रुचकी, हजारदांनी, मोठी दुधी ,शिप्पी.
- नर्सरी तंत्रज्ञान






नर्सरी म्हणजे काय
असे ठिकाण ज्या ठिकाणी निरोगी आणि उच्च दर्जाची लागवड केली जाते तसेच त्यामध्ये फळे भाजीपाला रोपांची निर्मिती केली जाते व काळजीपूर्वक ती रोपे वाढवली जातात आणि ती रोपे लागवड योग्य केली जातात 15 ते 45 दिवसांमध्ये ही रोपे लागवडी योग्य केली जातात तसेच त्या रोपांना त्या ठिकाणी त्या रोपांची लागवड केली जाते याला नर्सरी म्हणतात.
महत्व = रोप जास्त रोगांना बळी पडत नाहीत.
रोपवाटिकेमध्ये वाढवली जाणारी रोपे कोणती.
फुले,फळझाडे,भाजीपाला, शो ची झाडे, वनस्पती.
नर्सरी चे फायदे
1) रोपांच्या गुणवत्तेची खात्री नेहमी रोपवाटिकेमध्ये करता येते.
2) रोपवाटिकेमध्ये उच्च दर्जाची रोपे तयार करता येतात.
3) रोपवाटिकेमध्ये वेगवेगळे कलम करून उच्च दर्जाची फळबाग पिके वाढवता येतात.
4) कमी जागी जास्त रुपये निर्मिती करू शकतो.
24 MOBILE APP
Plantix App
वेगवेगळ्या झाडांची माहिती मिळते.
झाडांवरील रोग व त्यावरील लक्षणे व उपाय यांची माहिती मिळते.
साहित्य – फावडा , घमेला पॉलिथिन
कृती – (१) कंपोस्ट खत तयार करणे विषयी माहिती घेतली.
(२) कंपोस्ट खत तयार करण्यासाठी सर्वात पहिले जमिनीवर एक पॉलिथिन ठेवली.
(३) सात इंची उंचीवर पाला पाचोळा टाकल्या व वरून शेणखताची स्लरी टाकली.
(४) व पुन्हा पाला पाचोरा टाकल्या व शेणखत स्लरी टाकली.
(५) नंतर पाणी सिंपळले याप्रकारे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी ठेवले.
