बियाणे जमिनीत पेरल्यापूर्वी जमिनीतून किंवा बियानातून पसरणारे विविध रोग व किड्याचा प्राधुरभाव टाळण्यासाठी तसेच बियाणांची शेतातील उगवण शमता वाढवण्यासाठी तसेच जोमदार रोपे येण्यासाठी बियाण्यवर वेगवेगळी जैविक व रासायनिक कीटनाशकांची व सवर्धकांची प्रक्रिया केली जाते त्यालाच बिज प्रक्रिया असे म्हणतात

बिज प्रक्रियेचे फायदे

1) जमीनीतुन व बियापासून पसणाऱ्या रोगांचा प्रार्धुभाव टाळता येतो

2) बियाणांची शेतात उगणक्षमता वाढते .

3) रोपाची निरोगी व जोमदार वाढ होते

4)रोग रोपांची संख्या कमी झाल्यामुळे हेक्टरी उत्पादनामध्ये वाढ होणे

5)रोग किडी नियत्रवरील खर्च कमी होतो

6)बीज प्रक्रियेसाठी कमी खर्च येतो

बियांचे प्रकार

  1. मूलभूत बियाणे
  2. पायाभूत बियाणे
  3. प्रमाणित बियाणे
  4. सत्याप्रत बियाण

मुलभुत बियाने : पीक पैदास कराणे नवीन वाण विकसीत केल्यनंतर त्याच्यात देख रेखी खाली मुलभुत बिजप्रादान घेतले जाते यामुळे बियानत कोणत्याही प्रकारची अणुवंशिक अथवा भौतिक प्रकारची भेसळ होत नाही . मुलभुत बियानांची शुद्धता 100% असते मुलभुत बियांनाच्या पिशवीला पिवळ्या रंगाची खुण चिठ्ठी असते

पायाभुत :- पायाभुत बियाने हे मुलभुत बियाना पासुन तयार केले जाते . आणि पायाभुत बियानाच्या पीशवी वर प पांढऱ्या रंगाची खुन चिठ्ठी असते .

प्रामाणित :- हे पायाभुत बियानापासून तयार करतात प्रामाणीत बियांनाच्या पिशवीवर निळ्या रंगाची खुण चिठ्ठी असते .

सत्यप्रत बियाणे :- बियानांची अनुवंशिक शुद्धता उगवण क्षमता भौतीक शुद्धता प्रामाणिक बियाना इतकीच असते सत्यप्रत बिचाना च्या पिशवी वर हिरव्या रंगाची खुन चिठ्ठी असते .

आम्ही केलेली बिजप्रकीया