. आज मी तुम्हाला बीज प्रक्रियेबद्दल माहिती देणार आहे ज्यामध्ये आपण बीज प्रक्रिया कशी करतात हे बघणार आहोत व मी माझा अनुभव आपल्याला सांगणार आहे.

. बीज प्रक्रिया म्हणजे बीजोपचार किंवा बियाण्यांची योग्य प्रकारे प्रक्रिया करणे. यामध्ये पेरणीपूर्ती बियाण्यांवर केलेल्या विविध उपचारांचा समावेश होतो. ही प्रक्रिया बियाण्यांमध्ये रोगजंतूंचा नाश करून त्यांना उगवण्यासाठी सशक्त बनवते. बियाण्यांना विशिष्ट रासायनांनी,जैविक घटकांनी आणि उकळलेल्या पाण्याने प्रक्रिया केली जाते. ज्यामुळे त्यांचे उगवण क्षमतेचे प्रमाण वाढते आणि पीक चांगले येते.

. रासायनिक बीज प्रक्रिया :-

. रासायनिक बीज प्रक्रिया म्हणजे पेरणीपूर्वी येड्यांवर रासायनिक पदार्थांनी. या प्रक्रियेत बियाण्यांवर विशिष्ट रसायनांचे लेप दिले जाते, जेणेकरून त्यांचे संरक्षण होईल आणि त्यांची उगवण क्षमता वाढेल. रासायनिक बीज प्रक्रियेमुळे बियाणांचे बुरशी, बॅक्टेरिया आणि किडींपासून संरक्षण होते. उदाहरणार्थ = कार्बो-डायझीम, थायराम किंवा मॅन्कोझेब यांसारखी रसायने बियाण्यांना लागणारे रोगजंतू नष्ट करून त्यांचे संरक्षण करतात. ज्यामुळे उगवलेले पिक अधिक सशक्त होते.

. आम्ही केलेली बीज प्रक्रिया पुढील प्रमाणे :-

पहिल्यांदा छोटा बटाट्यांना उन्हात पसरवून ठेवले. व दुसरीकडे एक लिटर पाण्यामध्ये दोन चमचे कार्बो-डायझिंग टाकले. मग या तयार झालेल्या रसायनाला बटाट्यांवर फवारले. मग बटाट्यांना उलटे करून त्यांच्या मागच्या बाजूवरही हे रसायन फवारले. या रसायनामुळे बटाट्यांना बुरशी लागणार नाही किंवा त्यांच्यावर कीड लागणार नाही. व त्यांना वाढीसाठी मदत करेल.