पपई कॅंडी

कृती:-

1. पहिले एक पपई घेतली त्याला धुवून घेतले व वजन करून घेतले.

2. वजन झाल्यानंतर त्याच्यावरची साल काढून घेतली व वेस्टेजचे पण वजन करून घेतले.

3. पपई पूर्णपणे सोलून घेतल्यानंतर पपईला मध्ये कट केले व त्याला लहान तुकडे करून घेतले व मधी चा गीर काढून घेतला त्याला लहान लहान फोडी त तयार केले आहे व एकदम लहान कँडी चे तुकडे होतील एवढे तयार केले.

4. पपई कापून झाल्यानंतर त्या कॅन्डींना धुवून घेतले जेवढे कॅंडीचे वजन होते तेवढ्या वजनाची साखर वजन करून घेतली

5. साखर घेतल्यानंतर ती पूर्णपणे पाण्यात बुडेल एवढे पाणी घेतले. साखरपाणी घेतल्यानंतर त्याला गरम करून चिकट असा पाक तयार करून घेतला.

6. पाक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॅंडी टाकल्या व पाच मिनिटे नीट पाकात शिजवून घेतल्या.

7. कॅंडी थोडा वेळ थंड करून घेतल्या व त्यांचे चार भाग वेगवेगळे डब्यात घेऊन घेतले. व त्याच्यामध्ये समान पाक ओतून दिला.

8. कॅन्डी मध्ये फ्लेवर आणि कलर टाकून त्याच्यावर मध्ये ढवळून घेतले व फ्रिजमध्ये ठेवले.

9. कॅंडी दुसऱ्या दिवशी काढून घेतली व पाक छाननीने गाऊन घेतला. व कँडी सुकवण्यासाठी कपड्यावर टाकून फॅन खाली ठेवले.

10. कॅंडी थोडी ड्राय झाल्यानंतर त्यांना डब्यामध्ये पॅकिंग करून घेतले. व चांगली राहण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिली.

खर्च:-

साहित्यवजनदरकिमत
पपई2355 Kg7 Rs/kg16.48
साखर1750 Kg40 Rs/kg70
हिरवा रंग2 gm300 Rs/kg0.6
निळा रंग2 ml110 Rs/50 ml4.4
गुलाबी रंग2 ml110 Rs/50 ml4.4
पाईन एप्पल फ्लेवर2 ml42 Rs/20ml4.2
रोज फ्लेवर2 ml42 Rs/20ml4.2
ऑरेंज फ्लेवर2 ml42 Rs/20ml4.2
गॅस चार्जेस30 gm870 Rs/14 kg1.82
फ्रिज चार्जेस1/2 Unit10 Rs/Unit5 RS
115.36
मजुरी 35 %40.37
155.73

चिंच सॉस

कृती:-

1.पहिल्यांदा चीनचा घेतल्या त्यांना निवडून घेतले त्याच्यामध्ये खराब चिंचा काढून टाकल्या

2. पाण्यात धुवून घेतल्या व नीट चांगले साफ करून घेतले. त्याच्यामध्ये काही कीटक बुरशीजन्य पदार्थ तयार होतात त्यामुळे धुवून घ्यावे लागते

3. पाणी गरम केले त्यात चिंचा टाकल्या व 15 मिनिटे शिजवून घेतले व्यवहार वर ढवळत राहिलो

4. चिंचेचे मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये दीड ते तीन लिटर पाणी टाकले व सर्व मिक्सरमध्ये वाटून घेतले.

5. वाटलेल्या मिश्रण हे पुरण वाटायचं चाळणीत घेऊन वरून वाटीने प्रेस करून गाळून घेतले. व काही जे गाऊन पडत नव्हते ते पुन्हा मिक्सरमध्ये पीसून घेतले

6. चिंचेचे मिश्रण तयार झाल्यावर ते मोजून घेतले व त्याच्यामध्ये साखर आणि मसाले घालून उकळून घेतले

7. उकळी आल्यानंतर थोडा सॉस एक वाटी मध्ये काढून घेतला व त्या मध्ये सोडियम सायट्रिक ऍसिड घातले आणि ते मिश्रण मध्ये घालून व्यवस्थित मिक्स केले.

8. चिंचेचा सॉस तयार झाल्यानंतर त्याला थंड होऊन दिले व वजन करून पॅकिंग पाऊच मध्ये पॅक केले व सिल पॅक पण केले.

खर्च:-

साहित्यवजनदरकिमत
चिंच1 Kg80 Rs/Kg80.00
साखर2400 gm40 Rs/Kg96.00
मीठ24 gm15 Rs/Kg0.36
काळ मीठ24 gm40 Rs/Kg0.96
लाल मिर्च16 gm200 Rs/Kg3.20
खजूर1 Kg160 Rs/Kg160.00
गरम मसाला16 gm350 Rs/Kg5.60
सायट्रिक ऍसिड2 gm100 Rs/Kg0.20
सोडियम बेनझोईल7 gm500 Rs/Kg3.50
गॅस30 gm900 /14 Kg10.00
359.82
मजुरी 35%125.93
485.75

खारी

कृती:-

1. पहिल्यांदा सर्व साहित्य घेतले व त्यांचे वजन करून घेतले.

2. मैदा घेतला व त्याच्यामध्ये पाणी टाकून कालवून घेतले व फर्मेंटेशन साठी फ्रीजमध्ये एक तास ठेवले

3. पीठ फर्मेंटेशन झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने चौकोन आकाराचे लाटून घेतले

4. पिठाला चांगले लाटून घेतले 2 वेळा रुमाल पद्धत आणि 2 वेळा रोल पद्धत असे लाटून घेतले.

4. खारी बनवण्यासाठी त्याच्या मापाचे कट करून घेतले

5. ट्रे ला तेल लावून घेतले व त्याच्या मध्ये कट केलेल्या खारी ठेवून दिल्या. व त्याच्यावरती ब्रशने दूध लावून घेतले

6. खारी बेक करण्यासाठी ओव्हन मध्ये ठेवले 35 मिनिट बेक व्हायला लागतात.

खर्च:-

साहित्यवजनदरकिमत
मैदा500 gm40 Rs/kg20
कस्टर्ड पावडर14 gm100 Rs/kg1.40
साखर14 gm40 Rs/kg0.56
मीठ14 gm15 Rs/kg0.21
दूध20 ml40 Rs/kg0.80
मार्गीन डालडा312 gm130 Rs/kg40.56
ओव्हन चार्ज1/2 unit14 Rs/Unit7.00
70.53
मजुरी 35%24.68
95.21

एलोवेरा

कृती:-

1. पहिल्यांदा एलोवेरा ची पाणी घेऊन आलो त्यांना पाण्यात धुवून घेतले चांगले धुतल्यानंतर त्यांना चाकूने वरची साल काढून टाकले

2. चालते काढल्यानंतर त्याच्या मधील गिर काढून घेतला. त्याच्यामधील चिपचिपा पण जाण्यासाठी दोन-तीन पाण्यात धुवून घेतले

3. धुवून घेतलेल्या एलोवेराची वजन करून घेतले त्याचे वजन 1390 ग्रॅम इतके आणि वेस्टेजचे पण वजन करून घेतले

4. रॉकेट स्टो घेतला त्याच्यासाठी लाकडांचे वजन करून घेतले व त्याच्यावर कढई ठेवून त्याच्यामध्ये दूध तापवायला ठेवले

5. दुधाचा खवा बनवला व नंतर त्याच्यामध्ये एलोवेरा टाकला व मिक्स होत पर्यंत त्याला चांगले ढवळून घेतले व त्याच्यामध्ये साखर ऍड केली चिकटपणापर्यंत तापून घेतले

6. एलोवेरा चे मिश्रण झाल्यानंतर एका ट्रेमध्ये घेऊन त्याला थंड करण्यासाठी ठेवून दिले.

7. थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून दिले व दुसऱ्या दिवशी पॅकिंग करण्यासाठी कट करून घेतले व त्यांना बॉक्समध्ये पॅकिंग करून घेतले

अनुभव:-

एलोवेरा बर्फी तयार करताना त्याच्या मध्ये खवा तयार करून नंतर त्याच्यामध्ये एलोरा टाकावे लागते. जर एलोवेरा चांगले धुवून घेतले नाही तर चिकटपणा राहतो आणि त्याच्यामध्ये पण आपण राहतो.

खर्च:-

साहित्यवजनदरकिमत
एलोवेरा (कोरफड)3 Kg10 Rs/kg30.00
दूध2.5 Litr44 Rs/Litr110.00
साखर500 gm40 Rs/kg20.00
इलायची पावडर4 gm2000 Rs/kg8.00
तूप50 gm600 Rs/kg30.00
लाकूड3 Kg15 Rs/kg45.00
पॅकिंग बॉक्स3 box6 Rs/per18.00
261.0
मजुरी 35%91.35
352.35

ज्वारी कुकीज

कृती:-

1. पहिल्यांदा सर्व साहित्य वजन करून घेतले.

2. काढलेल्या साहित्यामध्ये जर पीठ गहू पीठ दूध पावडर कस्टर्ड पावडर नारळ पावडर बेकिंग पावडर हे सर्व मिक्स करून घेतले

3. मिश्रण तयार झाल्यानंतर थोडी कमी पडली त्याच्यासाठी आम्ही मिक्सरमध्ये जी ग्रुप ऑर्डर होती त्याचे थोडे लहान अजून मिश्रण करून घेतले

4. बटर आणि मार्गे यांना मिक्स करून गॅसवर गरम करायला ठेवून दिले व ते पूर्णपणे पागा नंतर थोडे उकळी फुटल्यानंतर त्याला खाली घेऊन पिठाचे मिक्सर त्याच्यामध्ये टाकले

5. मिश्रण टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. व त्याला टेबल वरती घेऊन व्यवस्थित मळून घेतले.

6. मळलेल्या पिठाला लाटण्याने लाटून घेतले व गोलाकार आकाराने कट करून घेतले जोपर्यंत पीठ संपत लेन आहे तोपर्यंत लाटण्याने लाटून आणि गोलाकार कट करून घेतले.

7. बनल्यानंतर त्याला ट्रेमध्ये ठेवले एका ट्रेमध्ये चाळीस कुकीज बसत होत्या. ट्रे ओन मध्ये वीस मिनिटे बांधण्यासाठी ठेवून दिला.

8. कुकीज भाजल्यानंतर त्यांना बाहेर काढले व थंड होण्यासाठी ठेवून दिले कुकी थंड झाल्यानंतर पॅकिंग बॉक्स घेऊन त्यांना पॅकिंग करून घेतले

अनुमान :-

कुकीज बनवतांनी पीठ चांगले म्हणून घ्यावे. लाडतानी सर्वीकडे लाटणे समान फिरवावे. नाहीतर चांगला शेप येत नाही. लाटतांनी किती दाब द्यावा हे पण बघावे. कापताना व्यवस्थित कट करावे. आणि कुकीज काढताना पण व्यवस्थित काढाव्या.

खर्च:-

साहित्यवजनदरकिमत
बटर330 gm220 Rs/kg72.6
मार्गीन330 gm130 Rs/kg42.9
ज्वारी पीठ450 gm50 Rs/kg22.5
गहूपीठ450 gm50 Rs/kg22.5
दूध पावडर30 gm360 Rs/kg10.8
कस्टर्ड पावडर30 gm100 Rs/kg3.0
नारळ पावडर60 gm330 Rs/kg19.8
वेलीना2 ml37 Rs/ml3.6
जागरी( गुळ )460 gm90 Rs/kg41.4
बेकिंग पावडर6 gm350 Rs/kg2.1
ओहन चार्ज1 Unit14 Rs/ Unit14.0
पॅकिंग मटेरियल6 Rs/box36 Rs36.0
291.20
मजुरी 35%101.92
398.12

चिकी

कृती:-

1. पहिल्यांदा सर्व साहित्य वजन करून घेतले.

2. शेंगदाणा जवस ती असे वेगवेगळे घेऊन भाजून घेतले.

साहित्य भाजल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवले व नंतर मिक्सरमध्ये पीसून घेतले.

4. मिश्रण तयार झालेले होते ते एकत्र मिश्रण करून घेतले

5. गुळ घेतला व त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले तुकडे केल्यानंतर पाक करण्यासाठी गॅसवर कढई चढवली व त्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घेतलं कमी फ्लेमवर गुळ याचा पाक तयार करण्यात आला

6. पाक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिक्कीचे मिश्रण टाकले व नंतर सर्व पाक आणि मिश्रण चांगले मिक्स करून घेतले मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्याच्यावरून थोडे तूप टाकण्यात आले.

7. चिक्की ट्रे घेतला व त्याच्या तूप लावून घेतले मिश्रण तयार झालेले त्या मध्ये ओतून घेतले

8. ट्रेमध्ये व्यवस्थित मिश्रण पसरवून घेतले व वरून लाटण्याने प्रेस करून घेतले व नंतर लाटायला सुरुवात केली चांगल्या प्रकारे सगळ्या सगळीकडे लाटून घेतले.

9. लाटल्यानंतर चिक्की कट करण्यासाठी चिक्की कटर घेतले त्याच्याने चिक्की व्यवस्थित आकारामध्ये कट करून घेतली.

10. चिक्की तयार झाली हळू एक एक पीस काढून प्लेटमध्ये ठेवलं व नंतर त्याचे वजन करून बॉक्समध्ये भरून पॅकिंग करून घेतले.

खर्च:-

साहित्यवजनदरकिमत
शेंगदाणा400 gm120 Rs/kg48.0
जवस160 gm120 Rs/kg19.2
तीळ240 gm220 Rs/kg52.8
मोरिंगा पावडर40 gm700 Rs/kg28.0
गुळ60 gm45 Rs/kg27.0
तूप50 gm600 Rs/kg30.0
गॅस200 gm870 Rs/kg12.4
पॅकिंग बॉक्स2 Box5 Rs/Box10.0
227.40
मजुरी 35 %79.59
307.01

बेसन लाडू

कृती:-

1. पहिल्यांदा बेसन पीठ चाळून घेतले व नंतर त्याला कमी गॅस ठेवून हळूहळू भाजून घेतले

2. काही वेळानंतर थोडा थोडा डालडा त्यामध्ये टाकत गेलो नंतर त्याला थोडा तांबूस पडेपर्यंत भाजून घेतले

3. सर्व पीठ व्यवस्थित भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतले व त्याच्या मध्ये पिठीसाखर मिक्स करून घेतले पीठ थंड झाल्यानंतर साखर मिक्स केली.

4. त्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट मिक्स करून घेतले त्याला चांगले मिक्स केले. मिश्रण झाल्यानंतर त्याच्यामध्ये तूप गरम करून टाकले

5. लाडू बनवायला सुरुवात करावी परंतु पीठ आणि तूप जर गरम असले तर लाडू तोपर्यंत लाडू बनवून घ्यावे थंड झाल्यावर चांगले लाडू येत नाही

6. व्यवस्थित लाडूचा आकार तयार झाल्यानंतर त्याच्यावर काजू बदाम आकर्षणासाठी लावावे

7. लाडू तयार झाल्यानंतर बॉक्समध्ये पॅकिंग करून घ्यावे व त्याचे वजन करून घ्यावे.

खर्च:-

साहित्यवजनदरकिमत
बेसन पीठ500 gm96 Rs/kg47.50
डालडा (जेमिनी)250 gm140 Rs/kg62.50
साखर400 gm41 Rs/kg18.45
इलायची पावडर5 gm3000 Rs/kg15.00
गॅस300 gm900 Rs/kg2.55
काजू10 gm800 Rs/kg12.00
पॅकिंग बॉक्स3 Box6 Rs /Box18.00
176.00
मजुरी 35 %61.60
237.00

व्हेज पफ

कृती:-

1. पहिल्यांदा बटाटे उकडून घेतले व नंतर त्याला त्याचे चिलके काढून घेतले.

2. बटाट्याची भाजी तयार करून घेतली आपण जशी बटाट्याची भाजी तयार करतो त्याप्रमाणेच ती वाफेवर शिजवून घेतले

3. मैदा घेतला व त्यात पाणी टाकून व्यवस्थित कालवून मिक्स करून घेतले व त्याला फ्रीजमध्ये ठेवले

4. फ्रिजमध्ये एक तास ठेवल्यानंतर पीठ काढून घेतले. व त्याला व्यवस्थित मळून मिक्स करून घेतले

5. पिठाला लाटण्याने लाटून घेतले त्याच्यामध्ये कोरडे पीठ टाकून सपाट लाटून घेतले. व मार्गींचे चार गोळे तयार करून घेतले.

6. रुमाल पद्धत वापरून घडी मारून घेतली व त्याला मार्गी लावले नंतर रोल पद्धत केली मार्गीन त्याला पण मागील लावले असे चार वेळेस केले आणि चारी गोळे चपाती हिला मार्गीन लावून नंतर पद्धत वापरली.

7. सर्व झाल्यानंतर चौकोनी आकाराचे चार एम एम पर्यंत लाटून घेतले व चार सेंटीमीटर अंतर घेऊन त्याला कट केले व त्या त्रिकोणी आकाराचे चार बाय चार चा तुकडा कट करून घेतला.

8. कट केलेल्या तुकड्यात भाजी भरून त्रिकोणी आकाराचे दुमडून घेतले व त्याच्यावरून दूध लावले दूध लावल्यानंतर ट्रेमध्ये ठेवून ते बेकिंग साठी ओव्हनमध्ये ठेवून दिले ओव्हनमध्ये दहा मिनिटे ठेवल्यानंतर बॅक झाले.

खर्च:-

साहित्य
वजन
दर
किमत
मैदा500 gm3718.50
कस्टर्ड पावडर14 gm1001.40
साखर14 gm400.58
मीठ14 gm150.21
दूध20 ml400.80
मार्गीन डालडा312 gm17053.04
ओव्हन चार्ज1 unit14 unit14.00
67.04
मजूरी 35 %23.46
90.50

रागी कुकी

कृती:-

1. पहिल्यांदा सर्व साहित्य काढून घेतले व त्यांचे वजन करून घेतले.

2. त्यानंतर सर्व पावडर आणि पीठ एकत्र करून घेतले

3. मार्गीन आणि बटर यांना एकत्र करून गरम करण्यासाठी गॅसवर ठेवले.

4. मोजलेले सर्व साहित्य एकत्र करून एका भांड्यात ठेवले.

5. गरम झालेल्या मार्गीन आणि बटर मध्ये पीठ हळूहळू टाकत घेतले व स्वादानुसार त्याच्यामध्ये इलायची पावडर टाकून घेतली व व्यवस्थित मिक्स करून घेतले.

6. फर्मेंटेशन साठी वीस मिनिटे पीठ एकत्रित करून ठेवले फर्मेंटेशन झाल्यानंतर पीठ चांगले म्हणून घेतले चांगले मळल्यानंतर पिठाला लाटण्याने लाटून घेतले व त्याला गोलाकार कट करून घेतले.

7. कट केलेल्या रागी कुकीज एका ट्रे मध्ये घेतल्या व बेक होण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवले ओव्हनमध्ये बेक होण्यासाठी त्याला वीस मिनिटे किंवा पंधरा मिनिटे तसा वेळ लागतो.

8. भाजलेल्या रागीक कुकीजला थंड होण्यासाठी ठेवून दिले थंड झाल्यानंतर त्यांना पॅकिंगसाठी बॉक्समध्ये भरले .

खर्च :-

साहित्यवजनदर
किमत
बटर50 gm220 RS /1 KG11
मार्गीन50 gm130 RS /1KG6.5
राजी/ ज्वारी65 gm40 RS /1KG2.6
वेट(wheat)65 gm30 RS /1KG1.95
बेकिंग पावडर2 gm350 RS /1KG0.7
जागरी पावडर5 gm90 RS /1KG4.5
कस्टर्ड पावडर6 gm100 RS /1KG0.6
मिल्क पावडर6 gm360 RS /1KG2.5
व्हॅलीन इसेन्स1 mi37 RS / 1ML1.8
इलेक्ट्रिसिटी1 unit14 unit14
पॅकिंग बॉक्स6 rs/BOX2 box12
58.15
मजुरी 35 %20.00
margin 25 %19.60
Total98.12

पाव बनवणे

कृती:-

1. पहिल्यांदा साहित्याची वजन करून घेतले. एका भांड्यात मैदा चांगला चालून घेतला.

2. मैद्या मध्ये पाणी ब्रेड इम्प्रोव्हर मीठ चागलं मिक्स करून घेतले . व व्यवस्थित फिट पाच दहा मिनिटे मळून घेतले.

3. पीठ मLल्यानंतर टेबलवर ती काढले व थोडे पीठ घेऊन व्यवस्थित मळून घेतले चांगले पीठ मळल्यानंतर फर्मेंटेशन साठी एक तास पातेल्यात ठेवून दिले

4. एक तास झाल्यानंतर सर्व पीठ टेबलावरती काढून घेतले व नंतर त्याला गरजेनुसार तेल लावत आणि पावाचे गोळे तयार करून घेतले.

5. पावाचे गोळे बनवल्यानंतर ट्रेला तेल लावून ट्रेमध्ये ठेवून दिले ट्रेमध्ये एका वीस पाव बसतात. नंतर फर्मेंटेशन साठी ठेवून दिले

6.बेकिंग:ओव्हन 250°C वर प्रिहिट केले. पाव हलके सोनेरी रंगाचे होईपर्यंत साधारण 7 मिनिटे बेक करा.पाव थंड होऊ द्या:बेक झाल्यावर पाव ओव्हनमधून बाहेर काढा आणि थोड्या वेळासाठी थंड होऊ द्या.

7. पाव बेक झाल्यानंतर त्याला तेल लावून घेतले व पलटी मारून झाकून ठेवले.

खर्च:-

साहित्यवजनदरकिमत
मैदा7 kg40 Rs/kg280 Rs
इस्ट150 gm180 Rs/kg27
मिठ140 gm20 Rs/kg2.8
तेल100 gm150 Rs/kg15
साखर140 gm40 Rs/kg5.6
ओवान चार्ज2 unit/ pre14/unit14
ब्रेड इमपुरवर14 gm590 Rs/kg8.26
352.66
मजुरी88.165
Total440.825