प्रकल्पाचे नाव :- बांधकाम
विद्यार्थ्यांचे नाव :- पूर्वराज, यश, राजरत्न, हर्षल
मार्गदर्शक :- लक्ष्मण जाधव सर
उद्देश :- विटा वाळू रेती यांच्या मदतीने बांधकाम करता येणे.
साहित्य :- सिमेंट, विटा, कच, खाडी, पाणी
वापरलेली साधने :- फावडे, थापी, रबरी हातमोजे, मिक्सर, लाइन दोरी, पाईप, Right Angle, मेजरमेंट टेप, कटर, हातोडी, छन्नी, रबरी बूट, खिळे, फळ्या, टिकाऊ, लेवल ट्यूब, टेबल, ओळंबा
कृती :-
(१) पहिल्यांदा पाच इंच खोल खड्डा खणला त्यातील सर्व माती बाहेर काढली व त्यात पीसीसी भरले. त्याचे गुणोत्तर म्हणजे 1:3:3. यात आपण एक पाटी सिमेंट, तीन पाट्या खळी व तीन पाट्या रस्त्ययाला आपण कोबा पण म्हणतो याचा उपयोग म्हणजे याच्या खाली घुस किंव उंदीर सारखे प्राणी खाली फोडू शकत नाही ज्याने बांधकाम पडत नाही.
. (२) आता बनवलेल्या मुरूम वर बांधकाम करण्यासाठी राईट अँगल च्या मदतीने लाईन दोरी ही बादली आणि बांधकामास सुरुवात केली. लाइन दोरीचा उपयोग म्हणजे जर आपल्याला बांधकाम हे सरळ व अचूक पाहिजे असेल तर लांदुरीचा वापर करतात.
. (३) लाईन दोरी बांधून झाल्यावर आता बांधकामाला सुरुवात करायची . सर्वात पहिल्यांदा बालकालून घ्यायचा त्याचे गुणोत्तर म्हणजे 1:4 त्यामध्ये एक पाटी सिमेंट व चार पाट्या क्रश सॅड चा वापर केला जातो. आता हे मिश्रण पहिल्यांदा खाली लावावे व त्यावर वीट लावावी ज्याने वीट ही मजबुतीने लागली जाते आता दुसरी वीट साधारणतः एका इंचाच्या अंतरावर ठेवावी. या अंतरामध्ये तयार केलेले मिश्रण टाकावे. ज्याने तुमच्या दोन विटा जोडल्या जातील असंच करत पहिला थर पूर्ण करायचा व दुसऱ्या थरासाठी लाईन दोरी थोडी वर बांधून दुसरा दराला सुरुवात करायची. बांधकामाचे कोपरे घेताना ओळंबाचा उपयोग करावा.
. (४) आता जर बांधकाम साधारणतः पाच फुटापर्यंत झाले असेल किंवा त्यापेक्षा एक फूट कमी म्हणजेच चार फुटापर्यंत झाले असेल आणि तुम्हाला बांधकाम अजून वरपर्यंत बघायचे असल्यास बिम चा उपयोग करावा. हे बिल बनवण्यासाठी ज्या भिंतीला वाढवायचे आहेत त्या भिंतीला बाजूने फळ्या लावायच्या ज्या साधारणतः चार सेंटीमीटर वर असतील बांधकामाच्या. आता या फळ्यांमध्ये कोब्याला जे मिश्रण आपण वापरले ते ते मिश्रण वापरून बिम तयार करायची व त्याला एक दिवस वाळण्यासाठी तसेच ठेवायचे मग त्यावर बांधकाम सुरू करायचे.
महत्त्वाचा मुद्दा :- बांधकाम केल्यावर प्रत्येक दिवशी त्यावर पाणी मारणे हे गरजेचे आहे व ते दिवसातून तीन वेळा व्हायला पाहिजे कारण याच्या मदतीने भिंत ही मजबूत होतात.
CPM Chart :-
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2025/02/IMG20250207085244-1024x768.jpg)
अनुभव :-
मला हे बांधकाम करताना खूप मजा आली व खूप सार्या नवीन साधने वापरायला शिकलो. भिंत कशी बनतात याबद्दल खूप माहिती भेटली व प्रत्यक्ष भिंत बांधल्याने कळले कि हि गोष्ट करायला पण खूप कौशल्याची गरज असते.
मी केलेली भिंते :-
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2025/02/IMG20250207085108-1-1024x768.jpg)